AO3 News

Post Header

Published:
2025-11-15 16:17:10 UTC
Original:
2024 OTW Board Election Statistics
Tags:

OTW निवडणूक बातम्या

आता २०२४ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२४ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १४,९५९ पात्र मतदार होते. त्यापैकी ३,४१५ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २७.८% होते.

आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ४,२४७ ते ३,४१५ पर्यंत, जे -१९.६% घट दर्शवते.

निवडणूक समिती, निवडणुकीत मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आमच्या पात्र सदस्यांशी संपर्क ठेवण्यास वचन-बद्ध आहे. ज्यांना संचालक मंडळात निवडले जाईल, त्यांचा OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या प्रकल्पांच्या दीर्घकालीन हितासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव असू शकतो आणि आमच्या सदस्यांनी त्यामध्ये आपले मत मांडावे, अशी आमची इच्छा आहे.

ज्यांना प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांच्या संख्या जाणून घेण्यामध्ये स्वारस्य आहे, त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की आमची निवडणूक प्रक्रिया, बोर्ड सदस्यांना एकत्रितपणे कार्य करता यावे म्हणून त्यांचा समान गट निवडण्यासाठी योजली आहे, व त्यामुळे आम्ही ही माहिती प्रसारित करीत नाही. सामान्य नियम म्हणून, आम्ही कोणत्या असफल उमेदवारांस सर्वात कमी मते मिळाली आहेत हे देखील उघड करणार नाही, कारण भविष्यात परिस्थिती आणि सदस्यांचे रस भिन्न असू शकतात, व तेव्हा निवडणूक पुन्हा लढण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त करू इच्छित नाही.

पुन्हा एकदा, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे खूप आभार! पुढच्या वर्षी पुन्हा व्हर्च्युअल पोल-मध्ये आपणांस भेटण्याची आम्ही आशा करतो.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

OTW सदस्यत्व मोहीम, १७-१९ ऑक्टोबर २०२५

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम आता संपली आहे आणि आम्हाला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की आपल्याला एकूण US$२८८,६९२.२८ देणगी मिळाली आहे. आम्ही खास करून खुश आहोत की ७,३३९ दात्यांनी देणगी देऊन त्यांचे OTW सदस्यत्व चालू ठेवले किंवा नवीन सदस्य झाले, ज्यानेकरून आमचा ४,५०० सदस्यांचा ध्येय पूर्ण झाला.

या देणग्या एकूण ७९ देशातल्या ८,७५३ लोकांनी दिल्या: त्या सर्वांना धन्यवाद आणि मोहिमेबद्दल प्रसार केलेल्या आपल्यापैकी सर्वांनाही धन्यवाद. OTW हे त्याच्या जगभरातल्या वापरकर्त्यांशिवाय शक्यच नसते, आणि की आपण सतत आमच्या पाठीशी आहात ही आमच्यासाठी एक गर्वाची व आनंदाची गोष्ट आहे! रसिककृती आणि रसिक संस्कृतीच्या इतिहासाला पाठिंबा आणि पोहच देणे व त्यांचे संरक्षण करणे या आमच्या चलित कामगिरीला सर्वात महत्त्वाची लोकं - म्हणजे रसिक - यांच्याकडून प्रतिसाद मिळत आहे हे बघून आम्ही खूप संतुष्ट आहोत.

जर आपल्याला देणगी द्यायची होती किंवा सदस्य व्हायचे होते पण आपण अजून ते केले नसेल तर चिंता करू नका! OTW वर्षभर देणग्या स्वीकारते आणि आपण US$१० किंवा जास्तीची देणगी देऊन सदस्य होऊ शकता. सदस्यत्व नेहमी आपल्या देणगीच्या तारखेपासून एक वर्षासाठी चालते त्यामुळे आपण आत्ता देणगी दिली तर आपण २०२६ OTW संचालक मंडळाच्या निवडणूकीत मत देऊ शकता जे ऑगस्ट मधे होतात. आणि आमची खास धन्यवाद म्हणण्यासाठीची भेट आपण कधी देणगी द्याल तेव्हा उपलब्ध होते.

पुन्हा एकदा आमच्या दात्यांना, स्वयंसेवकांना आणि सगळ्यांना जे OTW आणि त्याच्या प्रकल्पांना मदत करतात, या सर्वांना धन्यवाद. भविष्यात अजून कोणते टप्पे आम्ही गाठू हे बघायला आम्ही आतुरतेने वाट बघतो.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

OTW सदस्यता मोहीम, १७ - १९ ऑक्टोबर २०२५

Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) वाढत राहतोय व नवीन टप्पे गाठतोय. केवळ या एका वर्षात, आपण नव्वद लाख वापरकर्ते, दहा लाख मँडरीन चिनी रसिककृती, आणि १ करोड़ ५० लाख रसिककृती झाल्याचा आनंद साजरा केला—आपण कधी विचार केलाय का, की हे सगळं चालू ठेवण्यासाठी पडद्यामागे काय काम होत असे?

आपली उदार देणगी ज्या ठिकाणांना पोचते, त्यापैकी एक आहे आमची तांत्रिक व्यवस्था समिती. ही समिती AO3चा माहितीसाठा व त्याच्या शोध प्रणालींना चलित ठेवणाऱ्या सर्व्हर्सना अपग्रेड करण्याचा कठीण कामात व्यस्त आहेत, जेणे करून या सतत वाढणाऱ्या वापरकर्ते व क्रियाकलापाला आम्ही सांभाळू शकू.

तांत्रिक व्यवस्था समिती OTW's (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ)च्या प्रकल्पांना चलित ठेवणारी पायाभूत सुविधा व त्या सोबत अंतर्गत प्रणालींची देखभाल करते. याच्यात आमचे तीन सर्व्हर रॅक्स, पुष्कळ सर्व्हर्स, आणि नेटवर्किंक उपकरणे समाविष्ट आहेत, जे आपण इथे खाली पाहू शकता. आमची सर्व-स्वयंसेवक टोळी या सर्व्हऱ्सचे नियमितपणे निरीक्षण करते आणि शक्य तितक्या लवकर आउटेजला प्रतिसाद देऊन सर्व्हिस पुनर्संचयित करते. या सोबत, ते नित्यक्रमित अपग्रेड आणि व्यवस्थापना करतात जेणेकरून OTWचे प्रकल्प उपलब्ध राहतील ह्याची खात्री असेल. काहीदा ते AO3च्या पायाभूत व्यवस्था बाबत शवविच्छेदन आणि सादरीकरण AO3_तांत्रिक_व्यवस्था AO3 खात्यावर प्रकाशित करतात.

AO3 सर्व्हर रॅक्स.

आम्ही या सदस्यता मोहीमेसाठी बरेच देणगी भेट वस्तु सुद्धा तयार केले आहेत! दर वेळी सारखे, आमचा US$४५ स्टिकर संच आहे. US$७५च्या पातळीवर आमची या वर्षाची पिन (फुलपाखरूच्या रूपात AO3चा लोगो!) आणि AO3 व OTWच्या लोगोजची एक नवी फिरणारी कीचेन. या महिन्यात, आम्ही आमच्या जुन्या डफल बॅगेच्या जागी एक पाण्याची बाटली + पिन काॅम्बो ठेवला आहे.

इंद्रधनुशच्या रंगाची फुलपाखरू पिन ज्यात फुलपाखरू शरीरासठी AO3चा लोगो वापरला आहे चांदीची गोलाकार कीचेन ज्याला दोन फिरणारे गोल कड्या आहेत जे विरोधी दिशेत जातात. एका बाजूला AO3चा लोगो कोरला आहे आणि दुसऱ्या बाजूला OTWचा लोगो. काळ्या बूचसह लाल धातूची इन्सुलेटेड पाण्याची बाटली. त्याच्यावर पांढऱ्या रंगात अक्षरात 'archiveofourown.org' असे दिले गेले आहे. 'own' मधले 'o' AO3चा टाळ्या लोगो आहे, आणि 'org'मधले 'o' OTWचा लोगो आहे.

जर आपल्याला भेट हवी असेल पण एका वेळीच सर्व देणगी नाही द्याची असेल, आपण असे करू शकता की एक आवर्ती देणगी लावून आपल्या पसंतीच्या भेटीकडे बचत करू शकता. देणगी पत्रावर आपल्या पसंतीची भेट निवडा, आणि जर आपण एकाच वेळी त्या भेटीसाठी देणगी द्यायला नाही निवडले, तर आपोआप ते आवर्ती देणगी म्हणून सेट होईल. जे कोणी आपण अमेरिकेत आहात, आपण एमप्लाॅयर मॅचिंग द्वारे आपले यागदान दुप्पट करू शकता: आपल्या HR विभागाशी संपर्क साधून माहिती करा की हा पर्याय आपल्या उपलब्ध आहे की नाही.

US$१० व त्याहून जास्तीची देणगी द्वारे आपण OTWचे सदस्य सुद्धा बनू शकता. OTWचे सदस्य संचालक मंडळ—OTWची प्रशासकीय शाखा—याच्या निवडणुकांमध्ये मत घालू शकतात. जर आपल्यास पुढच्या वर्षाची निवडणूक, जे पुढच्या वर्षी ऑगस्ट मध्ये होणार, त्यात मत घालाचे असेल तर आपल्याकडे जून ३०, २०२६ पर्यंत वेळ आहे सदस्य बनण्यासाठी.

जरी आमची ही आशा आहे की आपण ही संधी साधून आम्हास देणगी द्याल व OTW मध्ये सामील व्हाल, तरी आम्ही या समुदायाच्या सदस्यांकडण जो पाठिंबा मिळतो, कुठल्याही तऱ्हेचा, त्यासाठी आभारी आहोत! तुम्ही AO3वर रसिककृती तयार करता, शेएर करता, त्यावर टिप्पणी करता किंवा टाळ्या देता; फॅनलोरचं संपादन करता; Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) वाचता; किंवा Legal Advocacy (कायदेविषयक मदत) मधली माहिती पसरवता, तर आपण सर्व जण OTW आणि त्याचा प्रकल्पांना आकार देण्यात मदत करता. आपला वेळ, आपली ऊर्जा, व आपल्या प्रतिबद्धतासाठी आम्ही आभारी आहोत!

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

Published:
2025-09-01 19:57:11 UTC
Original:
2025 OTW Election Statistics
Tags:

OTW निवडणूक बातम्या

आता २०२५ ची निवडणूक संपली असल्यामुळे, आम्हाला आमची मतदानाची आकडेवारी आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे!

२०२५ च्या निवडणुकीसाठी आमच्याकडे १५,१३८ पात्र मतदार होते. त्यापैकी २,१९७ मतदारांनी मतदान केले, जे संभाव्य मतदारांच्या २२.८% आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत आमचे यावर्षीच्या मतदार कमी आहे, ज्यांचे मतदान २२.८% होते.

आम्ही टाकलेल्या मतपत्रिकांच्या संख्येत घट देखील दिसून आली; ३,४१५ ते २,१९७ पर्यंत, जे ३५.६% घट दर्शवते.

निवडणूक समिती, निवडणुकीत मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, आमच्या पात्र सदस्यांशी संपर्क ठेवण्यास वचन-बद्ध आहे. ज्यांना संचालक मंडळात निवडले जाईल, त्यांचा OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) च्या प्रकल्पांच्या दीर्घकालीन हितासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव असू शकतो आणि आमच्या सदस्यांनी त्यामध्ये आपले मत मांडावे, अशी आमची इच्छा आहे.

ज्यांना प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांच्या संख्या जाणून घेण्यामध्ये स्वारस्य आहे, त्यांनी कृपया लक्षात घ्यावे की आमची निवडणूक प्रक्रिया, बोर्ड सदस्यांना एकत्रितपणे कार्य करता यावे म्हणून त्यांचा समान गट निवडण्यासाठी योजली आहे, व त्यामुळे आम्ही ही माहिती प्रसारित करीत नाही. सामान्य नियम म्हणून, आम्ही कोणत्या असफल उमेदवारांस सर्वात कमी मते मिळाली आहेत हे देखील उघड करणार नाही, कारण भविष्यात परिस्थिती आणि सदस्यांचे रस भिन्न असू शकतात, व तेव्हा निवडणूक पुन्हा लढण्यापासून आम्ही त्यांना परावृत्त करू इच्छित नाही.

तथापि, यावर्षी फक्त ३ उमेदवार होते, म्हणून ही माहिती उघड करणे अटळ आहे.

पुन्हा एकदा, निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे खूप आभार! पुढच्या वर्षी पुन्हा व्हर्च्युअल पोल-मध्ये आपणांस भेटण्याची आम्ही आशा करतो.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

Published:
2025-08-21 20:22:59 UTC
Original:
2025 OTW Election Results
Tags:

OTW निवडणूक बातम्या

यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. आम्ही आमच्या निर्गमित बोर्ड संचालक, जेनिफर हेन्स आणि झिशीन झांग, त्यांच्या कार्यकाळातील सर्व कामांसाठी आभार मानू इच्छितो. त्यासह, आम्ही २०२५ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत.

खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृतपणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत:

  • एलिझाबेथ विल्टशायर
  • हार्लन लिबरमॅन-बर्ग

औपचारिक-रित्या, बोर्डाची उलाढाल १ ऑक्टोबर पासून सुरू होणार. आम्ही मंडळाच्या नवीन सदस्यांना त्यांच्या सत्राबद्दल शुभेच्छा देतो.

अशा पद्धतीने, निवडणुकीचा हंगाम संपुष्टात आला आहे. बातम्यांचा प्रसार करून, उमेदवारांना प्रश्न विचारून आणि मतदान करून सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आम्ही आभार मानतो! आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा आपण सर्वांना भेटण्यास उत्सुक आहोत.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

Published:
2025-08-15 02:13:46 UTC
Original:
2025 OTW Board Voting Now Open!
Tags:

OTW निवडणूक बातम्या

निवडणूक खुली आहे!

प्रत्येक नवीन OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) सदस्य जे जुलै १, २०२४ ते जून ३०, २०२५ मध्ये दाखल झाले आहेत त्यांना मतपत्रिका प्राप्त झाली असेल. जर तुम्हाला मिळाली नसेल तर तुमचे स्पॅम फोल्डर आधी तपासा, व नंतर आमच्याशी या तर्फे संपर्क करा संपर्क फाॅर्म. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल कि आपली देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली गेली आहे कि नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरील संपर्क फॉर्म वापरून व "Is my membership current/Am I eligible to vote?(माझे सभासदत्व चालू आहे का/मी मतदान करण्यास पात्र आहे का?)" हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.

निवडणूक ऑगस्ट १८, २०२५ या दिवशी चालू असेल, २३:५९ UTC; ही वेळ तुमच्या साठी कुठली असेल हे जाणून घेण्यासाठी, वेळ क्षेत्र कन्व्हर्टर हे पहा.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

Published:
2025-07-27 13:52:24 UTC
Original:
OTW Members – Check Your Email for Voting Instructions
Tags:

OTW निवडणूक बातम्या

यावेळी, मतदानास पात्र असलेल्या OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) च्या सर्व सदस्यांना २०२५ च्या मतदानाच्या सूचनांशी जोडलेला ईमेल मिळाला असेल. विषय "Voting Instructions for Organization for Transformative Works (OTW) Board Election" (OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) बोर्ड निवडणुकीसाठी मतदान सूचना) होता. कृपया लक्षात घ्या की ज्याला हा ईमेल प्राप्त झाला नाही तो यावर्षी मतदार यादी मध्ये नाही आणि त्यांना मतपत्रिका प्राप्त होणार नाही.

मतदान सूचना ईमेलमध्ये मतपत्रिकेच्या चाचणी आवृत्तीचा दुवा आहे. कृपया पृष्ठ योग्य प्रकारे प्रदर्शित होईल आणि उमेदवार दृश्य आहेत याची खात्री करण्यासाठी त्या दुव्याचे अनुसरण करा. नसल्यास, कृपया खात्री करा की आपण ajax.googleapis.com आणि/किंवा bootstrapcdn.com वरून जावास्क्रिप्ट अवरोधित करत नाही आहात.

जर आपण OTW सदस्य असल्यास आणि हे ईमेल प्राप्त न झाल्यास, कृपया पुढील गोष्टी करा:

  1. आपले स्पॅम फोल्डर तपासा.
    • जर आपण Gmail वापरत असल्यास, आपला सामाजिक टॅब तपासा.
    • जर ईमेल कचरा म्हणून चिन्हांकित केले असेल तर ते चिन्हांकन काढा. अन्यथा, आपल्याला आपली मतपत्रिका प्राप्त होणार नाही, कारण ती देखील स्पॅममध्ये जाईल.
  2. जर कोणताही ईमेल नसेल तर आपली देणगी पावती उघडा आणि तारीख तपासा.
    • या निवडणुकीत मतदान करण्यासाठी, आपली पावती दिनांक १ जुलै २०२४ आणि ३० जून २०२५ दरम्यान असणे आवश्यक आहे.
    • जर आपण चेकद्वारे पैसे दिले असल्यास, आपली सदस्यता चेकच्या आगमनाच्या तारखेद्वारे मोजली जाते. देणगी पावतीची तारीख यूटीसी वेळेप्रमाणे दिली जाते. कृपया आपल्या पावतीची तारीख तपासा. जर आपली देणगी पावती ३० जून नंतरची असेल, तर आपण मतदान करण्यास पात्र नसाल. जर आपल्याला खात्री नसेल की आपण देणगी अंतिम मुदतीच्या आधी दिली आहे वा नाही, तर कृपया आमच्या वेबसाईट वरच्या संपर्क फॉर्म हे वापरून व "Is my membership current/Am I eligible to vote?" ("माझी सदस्यता वर्तमान/मी मतदान करण्यास पात्र आहे का?") हे निवडून आमच्या अर्थपुरवठा व सदस्यता समितीशी संपर्क करा.
  3. जर आपली देणगी पात्र कालावधी दरम्यान केली गेली असेल तर सदस्य होण्यासाठी आपण बॉक्स चेक केला असल्याची खात्री करा. जे कमीतकमी US$१० देतात त्यांच्यासाठी सदस्यत्व ऐच्छिक असते; केवळ सदस्य मतदान करू शकतात.
  4. जर आपण सदस्य असाल, तर आपण OTW कडून कोणतेही ईमेल, किंवा गेल्या वर्षीच्या मतपत्रिकेच्या निवडी विषयी OTW चे ईमेल, कचरा म्हणून चिन्हांकित केले नाही, याची खात्री करा. जर आपण असे केले असल्यास आणि या वर्षी मतदान करू इच्छित असल्यास आपण खालील चरण ५ अनुसरण करणे आवश्यक आहे.
  5. जर आपण पात्र कालावधी दरम्यान कमीतकमी US$१० दान केले असल्यास आणि सदस्य होण्यासाठी आपण बॉक्स चेक केला असल्यास, कृपया निवडणूक संपर्क फॉर्म भरा आणि "Is my membership current/Am I eligible to vote?" हा विषय निवडा. देणगी देताना आपण वापरलेला ईमेल निश्चितपणे समाविष्ट करा.
    • Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) किंवा फॅनलोरचा सदस्य होण्यास सदस्यतेचा कोणताही संबंध नाही. कृपया आम्हाला आपले AO3 किंवा फॅनलोर सदस्यनाम देऊ नका– हे नाव कोणाचे आहे हे जाणून घेण्याचा आपल्याकडे कोणताही मार्ग नाही आणि आम्हाला ते जाणून घ्यायचे नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आपल्या मतदानाच्या सूचना ईमेल बाउन्स झाल्या, कचरा म्हणून चिन्हांकित झाल्यास, किंवा आपण निवड रद्द केल्यास आपल्याला यावर्षीच्या निवडणुकीसाठी मतपत्रिका प्राप्त होणार नाही आणि पुढील वर्षाची मतपत्रिका कदाचित मिळणार नाही. तसेच, मागच्या वर्षी या पैकी काही घडले असेल तर तुम्हाला या वर्षी मतपत्रिका प्राप्त होणार नाही. म्हणून, आपण यापूर्वी OTW ईमेलची निवड रद्द केली असेल किंवा त्यांना कचरा म्हणून चिन्हांकित केले असेल आणि मतदान करू इच्छित असाल तर निवडणूक संपर्क फॉर्म भरा आणि "Is my membership current/Am I eligible to vote?" विषय निवडा.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Post Header

Published:
2025-07-25 20:59:36 UTC
Original:
2025 OTW Elections Candidates Announcement
Tags:

OTW निवडणूक बातम्या

उमेदवार घोषणा

OTW (परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या २०२५ चे उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार):

  • सी. रायन एस.
  • एलिझाबेथ डब्ल्यू.
  • हार्लन एल.बी.

कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि 3 उमेदवार आहेत, २०२५ वर्षाची निवडणूक स्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील.

निवडणूक समिती OTW च्या सर्व सदस्यांना उमेदवारांची ओळख करून देण्यास उत्सुक आहे! या नोंदी मध्ये उमेदवारांनी लिहिलेल्या संक्षिप्त जीवनचरित्राची आणि व्यासपीठाची दुवा समाविष्ट आहे. मतदान करण्याचा काळ व मतदान कसे करता येईल या बद्दल माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.

तोवर, तुमच्या संदर्भासाठी निवडणुकीच्या कार्यक्रमांची कालरेषा इथे उपलब्ध आहे. उमेदवारांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी व तुमचे प्रश्न प्रस्तुत कसे करावे या साठी पुढे वाचा!

व्यासपीठ आणि जीवनचरित्र

आम्ही प्रत्येक उमेदवाराला त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र, ज्यात त्यांचा व्यावसायीक व रसिक म्हणून अनुभव असेल, आम्हाला प्रदान करण्यास सांगितले, व त्याच बरोबर त्यांच्या कालावधीतील त्यांचे ध्येय यांवर व्यासपीठ लिहावयास सांगितले. खालील प्रश्नांची उत्तरे देवुन सामिल व्हा:

  • तुम्ही मंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यायचे का ठरवले?
  • तुम्ही कुठली कौशल्ये आणि/किंवा अनुभव मंडळास प्रदान करू शकता?
  • OTW साठी एक किंवा दोन ध्येय निवडा जी तुम्हाला महत्वाची वाटतात व ज्यासाठी तुम्ही तुमच्या कालावधीत काम करण्यास इच्छुक असाल. तुम्हाला ही ध्येय मौल्यवान का वाटतात? तुम्ही बाकीच्यांबरोबर काम करताना ती ध्येय कशी पूर्ण कराल?
  • OTW च्या प्रकल्पांसदर्भात तुम्हाला काय अनुभव आहे आणि संबंधित समितींना समर्थन देण्यासाठी व अधिक बळकट करण्यासाठी तुम्ही कसा सहयोग द्याल? विविध श्रेणीतील प्रकल्पांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा, पण मुक्तपणे अशांवर भर द्या ज्यांचा तुम्हाला अनुभव आहे.
  • तुम्ही तुमच्या मंडळाचे काम व OTW मधल्या तुमच्या इतर भुमिकांमधे कसा समतोल साधाल, किंवा मंडळाच्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तुमच्या सद्ध्याच्या भूमिकेचे हस्तांतरण कसे कराल?

तुम्ही दोन्ही उमेदवारांची या प्रश्नांवर उत्तरे व त्यांचे जीवनचरित्र खालील दुवेला अनुसरून वाचू शकता.

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.

Comment

Pages Navigation