Post Header
एक अनधिकृत Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) Android ॲप नुकताच Google Play वर रिलीझ करण्यात आले. या प्रकाशनामुळे विषय परत प्रकाशझोतामध्ये आला आहे म्हणून, आम्ही AO3 च्या ॲप डेव्हेलपमेंटची वर्तमान स्थिती सांगण्याची ही संधी घेत आहोत.
“तुम्ही ॲप बनवण्याबद्दल विचार केला आहे का?” हे आमच्या वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे; परंतु मोबाइल ॲपच्या विकासामध्ये प्रत्यक्षात "एक" ॲप असे नसते. वेगवेगळ्या मोबाईल प्लॅटफॉर्मवर ते ॲप असणे आवश्यक आहे - Android, iOS आणि Windows Mobile हे तीन सर्वात वरचे- आणि इतर प्लॅटफॉर्मच्या बऱ्याच आवृत्त्यांसाठी जे अज़ूनही वापरात आहेत.
आपल्याला अप्रतिबंधित कामे ब्राउझ करण्यापेक्षा अधिक काहीही करण्याची परवानगी मिळवून देणारे ॲप बनवण्यास सुरुवात करणे शक्य होण्याआधी, आम्हाला एक सार्वजनिक API विकसित करणे आवश्यक आहे - निश्चितपणे आमचा रोड-मॅप यावर, परंतु अजून बरेच प्रमुख रीलीझ नंतर. मग, आम्हाला फोन आणि टॅबलेट दोन्हीसाठी भिन्न, प्रतिसाद वापरकर्ता इंटरफेस तयार करण्याची आवश्यकता आहे. एक लहान, सरळमार्गी प्रकल्पासारखा हा प्रकार वाटत असला तरी, तो सहजपणे विविध कौशल्य-संचांसह अनेक स्रोत, समर्पित विषयांची गरज असलेल्या गोष्टीमध्ये उत्क्रांत होतो. जरी आम्ही पूर्वी म्हटले आहे की आम्ही मोबाइल AO3 ॲप रिलीझ करू इच्छितो, तरी आवश्यक संसाधने उपलब्ध नाहीत.
AO3 विकसित करणारे कोडर्स स्वयंसेवकांच्या आधारे तसे करतात आणि वाढीसाठी शक्य तितका जास्त वेळ देतात - परंतु तो वेळ मर्यादित आहे आणि AO3 सहजतेने चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे. एकतर संघ AO3 मध्ये वेळ सुधारणा करण्यास घालवेल किंवा ऍप्लिकेशन्सची प्रगती करण्यासाठी घालवेल - दोन्हीचे समर्थन करण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक आमट्यांकडे नाहीत.
तसेच, फक्त सुरुवातीचा विकास संसाधन-केंद्रित नसेल. प्रत्येक प्लॅटफॉर्मच्या नवीन आवृत्त्या प्रकाशीत करण्यासाठी कार्य करणे चालू ठेवते हे सुनिश्चित करण्यासाठी ॲपची देखभाल आणि ते सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे - नवीन आणि सुधारित AO3 वैशिष्ट्यांचा समावेश करण्यासाठी ॲप वर्धित करणे हे ही आहेच! एखाद्या समर्पित संघाने ॲपला दीर्घ काळासाठी व्यवस्थापित करणे आवश्यक असल्यामुळे, आपण काही राखीव देणग्यांद्वारे तिथे विशिष्ट निधी वापरू शकतो असेही नाही.
परंतु एखाद्या ॲप्लिकेशनासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे हे बघताना, कोडींग आणि चाचणी संसाधने ही फक्त वरवरची सुरुवात आहे. खालील संघांकडून संसाधने देखील आवश्यक असतील:
- प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आलेले कोणत्याही तांत्रिक समस्येस मदत करण्यासाठी समिती-संवाद समितीस कर्मचारी घेणे, व प्रशिक्षित आणि सुसज्ज करणे आवश्यक आहे,
- आमच्या दस्तऐवजीकरण कार्यसंघास ॲपसाठी समर्थन दस्तऐवज सतत तयार आणि अद्यतनित करावे लागतील आणि
- ॲपला इंग्रजी नसलेल्या भाषिकांसाठी उपलब्ध करण्याकरिता अनुवाद संघाला दस्तऐवजीकरणाचे भाषांतर आणि सतत अद्यतनित करावे लागेल.
आम्हाला सध्या उपलब्ध असलेल्या संसाधनांपेक्षा हे खूप वाढीव आहे व, यामुळे आमच्या संघ-सदस्यांना रोड-मॅप च्या समर्थनार्थ काम करण्यापासून दूर देखील काढले जाईल.
आमचा संघाचे ध्येय, AO3 शक्य तितक्या अधिक लोकांना उपलब्ध करणे हे आहे. हे प्राप्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे AO3 ची एका एकल, उत्तरदायी आवृत्ती तयार करण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करणे, जे शक्य तितक्या अधिक डिव्हाइसेसवर कार्य करते (आणि उत्तम कार्य करते!). सर्व आकार-उकाराच्या डिव्हाइसेसवर हे कार्य करते हे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही कायमच समर्पित आहोत, आणि साइटचा मोबाईल प्रतिसाद आणि सर्वप्रकारे उपयुक्तता वाढविण्यासाठी संसाधने केंद्रित करणे सुरू ठेऊ. याचा अर्थ असा की एक स्टॅन्डअलोन ॲप AO3 च्या वाटचालीत सध्या तरी शक्य नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने नोंद करावयाची तर, जर तृतीय-पक्ष ॲप किंवा वेबसाइट आपल्या AO3 लॉगइन माहितीसाठी विनंती करत असेल, तर कृपया सावधगिरीने पुढे जा आणि आपण ही माहिती आपल्या स्वत: च्या जोखमीवर प्रदान करीत आहात हे लक्षात घ्या. वर्तमानात सुरक्षेबद्दल चिंता नसली तरी, आपल्या खात्त्याबरोबर कुठल्याही वेळी छेडछाड झाली आहे असे आपल्याला वाटत असल्यास कृपया आपला संकेतशब्द बदलणे सुनिश्चित करा.
