Post Header
आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसासाठी तयार व्हा! १५ फेब्रुवारी ला आम्ही ११वा वार्षिक आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस साजरा करण्यासाठी पुन्हा विविध रसिकगटातून एकत्र येणार आहोत. आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस हा २०१४ मधे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरच्या १० लाखाव्या रसिककृतीचा सत्कार करण्यासाठी स्थापित केला गेला. यात आम्ही सर्व प्रकारच्या रसिककृत्या – कथा, कला, रसिकध्वनिफीत, मासिकं इत्यादी – रसिकगटाचा मूलभूत भाग म्हणून त्यांना मान्यता देतो आणि साजरा करतो.
या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसाचे विषयसूत्र रसिकसमाज हे परीसंस्था आहेत ही रसिकगटातल्या विविधतेच्या कल्पनेला संमान देते व त्यात भर घालते: फक्त विविध प्रकारच्या रसिककृत्या नसून, लोकांच्या रसिकगटात भाग घेण्याच्या पद्धती सुद्धा अनेक आहेत. जसे की वाचणे, टिप्पणी करणे, रसिक ज्ञानकोश वर काम करणे, कला करणे, लिहिणे इत्यादी! विविध रसिक एकत्र काम करून अनोखा परीसंस्था निर्माण करतात आणि आम्ही या वर्षी ते आपल्याबरोबर साजरा करू इच्छितो. आतापासून आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसापर्यंत, आम्ही अनेक उपक्रम आयोजित करत आहोत ज्यात आपण जरूर भाग घ्या:
- आमच्या Feedback Fest (प्रतिक्रिया उत्सव) मधे भाग घ्या आणि (कल्पित) समाज आणि त्या समाजातील प्रभाव याबद्दलची आपली आवडत्या कथेची शिफारस करा. किंवा आपल्या रसिकगटाच्या परीसंस्थेवर परिणाम झालेल्या कथेची शिफारस करा! कसं वाटतंय? फेब्रुवारी १३ला आमच्या Feedback Fest पोस्टची वाट बघा!
- AO3वर रसिकसमाजावर केंद्रित आपल्या स्वतःच्या कृत्यांसाठी आमची International Fanworks Day 2025 (आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२५) टाचणखूण वापरा!
- #IFD2025 किंवा #IFDChallenge2025 टाचणखूण वापरुन रसिकगट परिसंस्थेचे आपले अनुभव सोशल मिडियावर सांगा
आम्ही आपल्या योगदानाची आतुरतेने वाट बघत आहोत! अर्थातच, जर आपल्याला इतर तऱ्हेने सहभाग घ्यायचा असेल, तर मोकळ्या मनाने घ्या. जर आपण किंवा आपले रसिकगट स्वतःचे आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस उपक्रम आयोजित करणार असाल, आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्याबद्दल इतरांना सांगून त्याचे प्रसार वाढवू शकू! यासाठी वरील दिलेलेल्या टाचणखुणा वापरा.
आम्ही लवकरच आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२५ साठी इतर उपक्रम जाहीर करू त्यामुळे आमच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवा.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.
