Post Header
२००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) चाहत्यांसाठी, चाहत्यांद्वारे चालवले जाते. जगभरातील विविध पिढ्यांमधील चाहत्यांकडून आमच्या प्रकल्पांमध्ये वाढती रस आणि पाठिंबा पाहून आम्ही आनंदाने भारावून गेलो आहोत, आणि OTW सदस्य आणि देणगीदारांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत, ज्यामुळे आमच्या प्रकल्पांच्या दैनंदिन खर्चाची पूर्तता करताना राखीव निधी उभारण्यास मदत झाली आहे. आमच्या कोणत्याही प्रकल्पात समस्या येतात तेव्हा हे निधी, तुमची दयाळूपणा आणि पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, जसे की गेल्या काही महिन्यांत Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ला आलेला डाउनटाइम आणि मंदावलेला अनुभव. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही महत्त्वाची पावले उचलत आहोत आणि या काळात तुमच्या पाठिंब्याबद्दल आणि संयमाबद्दल आम्ही आभारी आहोत.
आमचे स्वयंसेवक AO3 स्थिर ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करत असले तरी, या काळात चाहत्यांची सामर्थ्य आणि लवचिकता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. तुमच्या उदार देणग्या आणि सततच्या पाठिंब्यामुळे, आम्ही AO3 आणिआमचे उर्वरित प्रकल्प, आमच्या स्वयंसेवकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या ना-नफा-ना-तोटा संस्थेच्या स्वरूपात चालू ठेवू शकलो आहोत. या पार्श्वभूमीवर, आम्ही तुम्हाला या वर्षीच्या आमच्या पहिल्या सदस्यता मोहिमेत देणगी देण्यासाठी आणि सदस्य होण्यासाठी प्रोत्साहित करतो!
नेहमीप्रमाणे, आम्ही विविध देणगी भेटवस्तू तयार केल्या आहेत:
प्रवासात असताना AO3 वरील तुमचे प्रेम दाखवायचे आहे का? US$१०० च्या देणगीवर, तुम्ही आता तुमच्या नोट्स लिहून ठेवू शकता आणि तुमच्या बॅगेत ५.५"×७.५" (१४ cm x १९ cm) आकाराच्या AO3 नोटबुकसह रसिकगटचा एक तुकडा घेऊन जाऊ शकता!
US$४५ ची देणगी देऊन, तुम्ही आमच्या स्टिकर स्टॅशमधून निवडक वस्तू मिळवू शकता (आश्चर्यासाठी तयार राहा)!
तुम्ही US$१० किंवा त्याहून अधिक देणगी देऊन OTW चे सदस्य बनू शकता. लक्षात ठेवा की OTW चे सदस्य असणे आणि AO3 खाते असणे हे एकसारखे नाही—OTW सदस्य वार्षिक OTW बोर्ड निवडणुकीत मतदान करू शकतात आणि त्यांची माहिती AO3, फॅनलोर किंवा आमच्या इतर कोणत्याही प्रकल्पांवरील त्यांच्या कोणत्याही खात्यांशी जोडलेली नाही.
तुम्ही आवर्ती देणगी देखील सेट करू शकता आणि तुमच्या आवडीच्या भेटवस्तूसाठी बचत करू शकता. तुमची सध्याची देणगीची रक्कम पुरेशी नसली तरीही, तुम्हाला हवी असलेली भेटवस्तू निवडल्यानंतर, तुमच्या भविष्यातील देणग्या एकूण देणग्यांमध्ये जोडल्या जाऊ शकतात. तुमच्यापैकी जे अमेरिकेत आहेत ते नियोक्ता जुळणीद्वारे तुमचे योगदान दुप्पट करू शकतात: हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे का हे जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या मानव संसाधन विभागाशी संपर्क साधा.
देणग्या कशा खर्च केल्या जातात याबद्दल तुम्हाला उत्सुकता आहे का? अधिक जाणून घेण्यासाठी मागील बजेट पोस्ट किंवा आमच्या वार्षिक अहवाल पहा. देणग्या आणि सदस्यत्वाबाबत तुमचे इतर कोणतेही प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्या वाविप्र पृष्ठाला भेट देऊ शकता किंवा अर्थपुरवठा आणि सदस्यता समितीशी संपर्क साधू शकता.
फॅनलोर, Open Doors (रसिक-मुक्तद्वार प्रकल्प), Legal Advocacy (कायदेविषयक मदत), Transformative Works and Cultures - TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), आणि AO3 सारखे आमचे प्रकल्प चालू ठेवण्यासाठी आमचे सदस्य आणि त्यांचे देणगे आमच्यासाठी महत्त्वाचे असले तरी, जर तुम्ही आर्थिक योगदान देऊ शकत नसाल तर निराश होऊ नका! या समुदायाच्या अविरत पाठिंब्याची आणि वचनबद्धतेची आम्ही प्रशंसा करतो: मग ते AO3 वरील एखाद्या कामाचे प्रकाशन असो किंवा त्यावर टिप्पणी सोडने, फॅनलोरवर संपादन असो किंवा धोक्यात असलेल्या रसिक-कृती संग्रहांबद्दल रसिक-मुक्तद्वार प्रकल्पशी संपर्क साधणे असो. स्वयंसेवा संधींमध्ये अधिक सहभागी कसे व्हावे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचे स्वयंसेवा पृष्ठ पाहू शकता.
OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदे-विषयक मदत सहित अनेक प्रकल्पांची नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन-चलित, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दाता-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाईटवर. स्वयंसेवक अनुवादकांची टीम, ज्यांनी ही पोस्ट अनुवादित केली आहे, त्यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, भाषांतर पृष्ठ पहा.
