Archive FAQ > संकलने

संकलन म्हणजे काय?

संकलन म्हणजे कार्यांचा आणि/किंवा वाचनखूणा यांचा एका विषयाप्रमाणे बांधलेला संच. उदाहरणार्थ, त्या मध्ये एक आव्हान या साठी निर्मित सर्व कार्य, एका वर्षात पोस्ट केलेली सर्व कार्य, किंवा एका नात्यासाठी, पात्रासाठी, किंवा रसिकगटासाठी टाचणखूण केलेल्या आपल्या सर्व शिफारसी असू शकतात. आपण संबंधित संकलने पालक-संकलनाच्या मध्ये एकत्र करून जोडू शकता; सूचनांसाठी, मी उप-संकलन कसे निर्माण करू शकतो? हे बघा.

प्रॉम्प्ट मीम्स आणि भेट देवाणघेवाणया संकलनांमध्ये सादर केल्या जातात. आपण या बद्दलची अधिक माहिती आमच्या प्रॉम्प्ट मीम आणि भेट देवाणघेवाण वाविप्र मध्ये बघू शकता.

संकलन कसे निर्मित करावे या बद्दलच्या क्रमाक्रमाच्या सूचनांसाठी, आमच्या संकलन निर्मिती शिकवणी याचा संदर्भ घ्या.

मी संकलने कशी शोधू?

सर्व संकलनांची यादी शोधण्यासाठी, "Browse" (शोधा) निवडा व नंतर पृष्ठाच्या वरील भागातील मेन्यू मधील मूलभूत साईट पृष्ठमांडणी (लोगो च्या खाली) मधून "Collections" (संकलने) निवडा. त्यानंतर आपण मूलभूत साईट पृष्ठमंडणी मध्ये पृष्ठाच्या उजवीकडे किंवा मोबाईल वर "Filters" (चाळा) बटण वापरून सापडला जाणाऱ्या "Sort and Filter" (वर्गीकरण करा व चाळा) फॉर्म मध्ये सापडणारे फील्ड्स वापरून यादी अजून मर्यादित करू शकता. डेस्कटॉप वर (किंवा मोबाईलवर साईट हेडर मधील संकलने ह्या खाली) पृष्ठाच्या वरील उजवीकडील भागात "Open Challenges" (मुक्त आव्हाने) बटण असेल जे वापरून आपण मुक्त प्रॉम्प्ट मिम्स आणि भेट देवाणघेवाण शोधू शकाल.

आपल्या मालकीचे वा आपण सांभाळणारे संकलन यासह, जर आपण एखादे विशिष्ट संकलन शोधत असाल, तर मी विशिष्ट संकलन कसे शोधू? याचा संदर्भ घ्या.

एखाद्या संकलनामध्ये सामील केलेली माझी कार्य मी कशी शोधू?

आपली सर्व कार्य जी संकलनांमध्ये आहेत ती आपण आपल्या "Collected Works" (संकलित कार्य) पृष्ठावर बघू शकता. जर आपण लॉगड-इन असाल, तर या पृष्ठावर आपली आप्रदर्षित आणि/अथवा निनावी कार्य दिसतील, पण ती इतर वापरकर्त्यांना उघड केली जाणार नाहीत. हे पृष्ठ बघण्यासाठी:

  1. आपण लॉगड-इन असताना, "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" या पृष्ठाच्या वरच्या भागातील मेन्यू मधून "My Works" (माझी कार्य) निवडा.
  2. डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजवीकडील (किंवा मोबाईल वर "1-20 of # Works by (# मधील १-२० कार्य) [वापरकर्तानाम] शीर्षकाच्या खाली) असलेले "Works in Collections" (संकलनांमधील कार्य) बटण निवडा.

आपली संकलनांमध्ये सामिल झालेली वा सामिल होण्यास निमंत्रित झालेली, जी आपण अजून स्वीकारलेली नसतील किंवा नाकारलेली असतील त्यांसह, सर्व कार्य बघण्यासाठी:

  1. लॉग-इन करा व "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" हे अभिवादन निवडून आणि मेन्यू मधून "My Dashboard" (माझा दर्शनीफळा) निवडून, किंवा आपली खाते-रेखाचित्र प्रतिमा निवडून, आपल्या दर्शनीफळा यावर जा.
  2. पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाईल च्या वरच्या भागात सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने (#)) निवडा.
  3. आपल्या Collections (संकलने) पृष्ठावरून, डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजव्याबाजूस असलेले (किंवा मोबाईल वर "[वापरकर्तानाम]ची संकलने" या शीर्षकाखालील "Manage Collected Works" (संकलित कार्य व्यवस्थापित करा) बटण निवडा.
    • कुठलीही कार्य जी निमंत्रित केली आहेत पण संकलनाचा भाग होण्यास स्वीकारलेली नाहीत ती "Awaiting Approval" (स्वीकारण्यास प्रतीक्षेत) पृष्ठावर सूचित केली असतील.
    • संकलनांमध्ये सामील केलेली कार्य शोधण्यासाठी "Approved" (स्वीकारलेली) बटण निवडा. या मध्ये कुठल्याही संकलनांमधील अप्रदर्शित आणि/किंवा निनावी कार्य किंवा वाचनखूणा सूचित असतील.
    • संकलनांमधील जी कार्य आपण नाकारलेली असतील, ती शोधण्यासाठी "Rejected"(नाकारलेली) बटण निवडा. नाकारलेल्या कार्यांबद्दल अधिक माहितीसाठी नाकारलेली व काढलेली या मध्ये काय फरक आहे? हे बघा.

संकलनांमधून कार्य कशी नाकारायची किंवा काढायची ह्याबद्दल अधिक माहितीसाठी, पुढील पृष्ठांचा संदर्भ घ्या:

संकलनांमध्ये सामिल झालेल्या माझ्या टाचणखुणा मी कसे शोधू?

संकलनामध्ये सामिल झालेल्या आपल्या टाचणखुणा शोधण्यासाठी:

  1. लॉग-इन करा व "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" अभिवादन निवडून, मेन्यू मधून किंवा आपली रेखाचित्र-प्रतिमा निवडून, "My Dashboard" (माझा दर्शनीफळा) निवडा व आपल्या दर्शनीफळा वर जा.
  2. डेस्कटॉप वर पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाइलवर वरच्या भागात सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने) निवडा.
  3. आपल्या Collections (संकलने) पृष्ठावरून, डेस्कटॉप वर वरच्या उजव्या बाजूस (किंवा मोबाईलवर "[वापरकर्तानाम] ची संकलने" च्या खाली) असलेले "Manage Collected Works" (संकलित कार्य व्यवस्थापित करा) बटण निवडा.
    • संकलनमध्ये सामिल झालेल्या टाचणखुणा आणि कार्य शोधण्यासाठी, "Approved" (स्वीकारलेली) बटण निवडा.
    • आपण संकलनांमधून अमान्य केलेल्या टाचणखुणा आणि कार्य शोधण्यासाठी "Rejected" (नाकारलेली) बटण निवडा. नाकारलेल्या कार्यांबद्दल अधिक माहितीसाठी, नाकारलेली व काढलेली या मध्ये काय फरक आहे? हे बघा.

आपल्या इतर टाचणखुणांबरोबर संकलनांमध्ये सामील झालेल्या आपल्या सर्व टाचणखुणा आपण आपल्या टाचणखुणा पृष्ठावर बघू शकता. हे पृष्ठ कसे शोधावे यावरील अधिक माहितीसाठी, मी माझ्या टाचणखुणा कसे बघू शकते? याचा संदर्भ घ्या.

मी एखादे विशिष्ट संकलन कसे शोधू?

जर आपण असे संकलन शोधत असाल ज्याचे आपण मालक किंवा व्यवस्थापक आहात:

  1. लॉग इन करा व पृष्ठाच्या वरच्या भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. हे आपल्याला आपल्या मालकीच्या किंवा आपण व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनांच्या यादी वर घेऊन जाईल, कुठलीही आव्हाने आणि उपसंकलने यांसकट.
    • जर आपण आपल्या दर्शनीफळा वर असाल, आपण पृष्ठाच्या बाजूस सापडणाऱ्या किंवा मोबाईल वर वरच्या बाजूस असणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने) सुद्धा निवडू शकता.
  2. यादीमधून आपल्याला हवे असलेले संकलन निवडा.

जर आपण असे संकलन शोधत असाल जे आपल्या मालकीचे नाही वा जे आपण व्यवस्थापित करीत नाही:

  1. मूलभूत साईट पृष्ठमांडणी (साईट चिन्हाच्या खाली) यातील पृष्ठाच्या वरच्या भागातील मेन्यू मधून "Browse" (शोधा) निवडा आणि नंतर "Collections" (संकलने) निवडा.
  2. विशिष्ट संकलन वा आव्हानाच्या शोधा साठी "Sort and Filter" (वर्गीकरण करा व चाळा) वापरा. आपण हे मूलभूत पृष्ठमांडणी मध्ये स्क्रीन च्या उजव्या बाजूस, किंवा मोबाईल वर "Filters" (चाळा) बटण निवडून शोधू शकता.

आपण विशिष्टपणे आव्हानांसाठी शोधू व चाळू शकता. अधिक माहितीसाठी मी भेट देवाणघेवाण कुठे शोधू शकते? किंवा मी प्रॉम्प्ट मिम्स कुठे शोधू शकते? हे बघा.

जर एखादे कार्य संकलनाचा भाग असेल, तर कार्याच्या ब्लर्बमध्ये त्या संकलनाची दुवा असेल.

मी एखाद्या संकलनामध्ये कसा शोध घेऊ?

एका संकलनाचा दर्शनीफळा अधिकात-अधिक पाच कार्य आणि पाच टाचणखुणा दाखवू शकतो. संकलनामधील इतर कार्य किंवा टाचणखुणा बघण्यासाठी, पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाईल वर वरच्या बाजूस असलेल्या मेन्यू मधून "Works (#)" (कार्य) or "Bookmarked Items (#)" (टाचणखुणीत गोष्टी) निवडा. या पृष्ठावर जास्तीत-जास्त प्रत्येकी २० गोष्टी दिसू शकतात, व अजून शोधण्यासाठी आपण वरील किंवा खालील भागातील दिशादर्शन बटण वापरू शकता.

एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय?

Open (खुले)
संकलन नवीन मजकूरासाठी खुले आहे. कार्य किंवा टाचणखुणा संकलनामध्ये कोणीही सामील करू शकतात.
Closed (बंद)
संकलन नवीन मजकूरासाठी बंद आहे. संकलनाच्या मालका किंवा व्यवस्थापकाशिवाय इतर कोणीही कार्य किंवा टाचणखुणा त्यात सामील करू शकत नाही.
Moderated (व्यवस्थापित)
फक्त संकलनाचे सदस्यच मालकाच्या किंवा व्यवस्थापकाच्या होकाराशिवाय मुक्तपणे कार्य व टाचणखुणा सामील करू शकतात. इतर कोणतेही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वापरकर्ते तरीही कार्य किंवा टाचणखुण प्रस्तुत करू शकतात, पण संकलनामध्ये दिसण्याआधी मालकाने किंवा व्यवस्थापकांनी त्यासाठी संमती देणे आवश्यक आहे.
Unmoderated (अव्यवस्थापित)
या संकलनासाठी प्रस्तुत केलेला मजकूर आपोआप समाविष्ट होण्यास मंजूर होतो.
Unrevealed (अप्रदर्षित)
हे सेटिंग वापरून संकलनामध्ये सामील केलेली सर्व कार्य निर्माता, संकलन मालक आणि व्यवस्थापक, आणि AO3 साईट प्रशासक सोडून सर्व वापरकर्त्यांपासून लपलेली राहतील. हे बऱ्याचवेळी भेट देवाण-घेवाण यासाठी वापरले जाते जिथे भेट दिलेली कार्य विशिष्ट तारीख, जसेकी सुट्टी भेट देवाण-घेवाण, या दिवशी उपलब्ध होते. अप्रदर्षित संकलनामध्ये एखादे कार्य घालणे म्हणजे आपले कार्य संकलन प्रदर्शित होत नाही तोपर्यंत दडलेले राहिल, आणि AO3 भर "Mystery Work" (गूढ कार्य) या शीर्षकासह, आणि "This is part of an ongoing challenge and will be revealed soon!" (हे एका चालू असलेल्या संकलनाचा भाग आहे व लवकरच प्रदर्शित केले जाईल!) असे त्याचे वर्णन दिसेल याची नोंद असुद्या
Anonymous (निनावी)
हे सेटिंग वापरून संकलनामध्ये सामील केलेल्या सर्व कार्यांच्या निर्मात्यांची नावे खुद्द निर्माता, संकलन मालक आणि व्यवस्थापक, आणि AO3 साईट प्रशासक सोडून इतर सर्व वापरकर्त्यांपासून लपलेली राहतील. निनावी संकलनामध्ये एखादे कार्य घालणे म्हणजे आपले स्यूडोआयडी संकलन निर्माते प्रदर्शित करण्याआधी दडलेले राहील, आणि AO3 भर, "by Anonymous" (निनावी) या उपशीर्षकासह दिसेल, याची नोंद असू द्या. आपली निनावी कार्य शोधण्या संदर्भात अधिक माहिती साठी, एखाद्या संकलनामध्ये सामील केलेली माझी कार्य मी कशी शोधू? याचा संदर्भ घ्या

जर ही सेटीन्ग्स बदलली, तर नवीन सेटीन्ग्स फक्त त्याच कार्यांना लागू होतील जी बदलानंतर संकलनामध्ये सामील केलेली आहेत. त्या संकलनामधील टाचणखुणीत कार्यांवर "अप्रदर्षित" आणि "निनावी" पर्यायांचा काहीही परिणाम होत नाही.

 

लक्षात ठेवा की निनावी किंवा अप्रदर्शित संकलने निर्धोक निनावीपण नाही देऊ शकत. संकलनाचे मालक किंवा व्यवस्थापक, निनावी किंवा अप्रदर्शित संकलनाची स्तिथी कधीही बदलू शकतात. जर संकलनाच्या मालकाने, व्यवस्थापकाने किंवा कार्याच्या निर्मात्याने एक कार्य निनावी किंवा अप्रदर्शित संकलनातून काढलं तर त्याची अप्रदर्शित किंवा निनावी स्तिथी पण जाईल. अधिक माहितीसाठी माझ्या मालकीच्या संकलनातील कार्य मी कसे उघड करू किंवा त्यांचे निनावीपण कसे घालवू? आणि मी संकलनामधून एखादे कार्य किंवा वाचनखूण कसे काढू? वाचा.

मी संकलन कसे निर्माण करू?

संकलन निर्माण करण्यासाठी:

  1. जेव्हा आपण लॉग्ड-इन असाल, तेव्हा "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" हे अभिवादन निवडून आणि मेन्यू मधून "My Dashboard" (माझा दर्शनीफळा) निवडून, किंवा आपली खाते-रेखाचित्र प्रतिमा निवडून, आपल्या दर्शनीफळा वर जा.
  2. पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाईल च्या वरच्या भागात सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने (#)) निवडा.
  3. डेस्कटॉप वर वरच्या उजव्या बाजूस (किंवा मोबाईल वर [वापरकर्तानाम] ची संकलने ह्या शीर्षकाच्या खाली) असलेले "New Collection" (नवीन संकलन) बटण निवडा.
  4. आपल्या संकलनाचे तपशील फॉर्म मध्ये भरा.
  5. "Submit" (प्रस्तुत करा) बटण निवडा.

आपल्या मालकीच्या संकलनांमध्ये आपण उप-संकलनेही निर्माण करू शकता. अधिक माहितीसाठी मी उप-संकलन कसे निर्माण करू? हे बघा.

कृपया आपले संकलन निनावी किंवा आप्रदर्षित करणे निवडत असताना ते काळजीपूर्वक करा, व ही सेटीन्ग्स तेव्हाच वापरा जेव्हा आपल्या संकलनाचा हेतू त्यातून साध्य होत असेल. कोणतेही कार्य जे निनावी किंवा आप्रदर्षित म्हणून सामील केलेले असेल ते तसे फक्त त्या संकलनापुरते मर्यादित राहत नसून, अक्ख्या Archive of our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) भर ते तसेच दिसेल. या पर्यायांच्या व त्यांच्या परिणामांच्या पूर्ण तपशिलांसाठी एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय? याचा संदर्भ घ्या.

मी एखाद्या संकलनात बदल कसा करू?

संकलनामध्ये बदल करण्यासाठी, आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठाकडे मार्गस्थ व्हा. या पृष्ठावर कसे जावे याबद्दल जर आपण साशंक असाल, तर मी संकलन सेटीन्ग्स पृष्ठावर परत कसे जाऊ? याचा संदर्भ घ्या. तिकडून, आपण सर्व तपशिलांमध्ये बदल करू शकाल जे आपण ते संकलन निर्माण करताना निश्चित केले असतील.

याची नोंद असू द्या कि आपण संकलनाचे नाव कधीही बदलू शकत असलात तरी नाव बददलेत तर संकलनाच्या कुठल्याही विद्यमान दूवा काम करणार नाहीत कारण ते नाव URL चा भाग असते.

संकलन सेटीन्ग्स वरील उपलब्ध पर्यायांविषयी अधिक माहितीसाठी, शिकवणी: संकलन निर्माण करणे याचा संदर्भ घ्या.

मी परत माझ्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठावर कसे जाऊ?

आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठावर जाण्यासाठी:

  1. लॉग इन करा व पृष्ठाच्या वरच्या भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळा वर असाल, तर दिशादर्शनी समासातून (मोबाईल वर पृष्ठाच्या वरच्या भागात सापडेल) आपण "Collections (#)" (संकलने) सुद्धा निवडू शकता.
  2. प्रदान यादीतून आपल्याला हवे असलेले संकलन निवडून त्या संकलनाच्या दर्शनीफळ्यावर जा.
  3. पृष्ठाच्या बाजूस सापडणाऱ्या, किंवा मोबाईल वर वरच्या बाजूस असलेल्या, मेन्यू मधून "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) निवडा.

मी "Challenge Settings" (आव्हान सेटीन्ग्स) पृष्ठावर परत कसे जाऊ?

आपल्या "Challenge Settings" (आव्हान सेटीन्ग्स) पृष्ठावर जाण्यासाठी:

  1. लॉग इन करा व पृष्ठाच्या वरच्या भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळा वर असाल, तर दिशादर्शनी समासातून (मोबाईल वर पृष्ठाच्या वरच्या भागात सापडेल) आपण "Collections (#)" (संकलने) सुद्धा निवडू शकता.
  2. प्रदान यादीतून challenge (आव्हान) निवडा.
  3. पृष्ठाच्या बाजूस सापडणाऱ्या, किंवा मोबाईल वर वरच्या बाजूस असलेल्या, मेन्यू मधून "Challenge Settings" (आव्हान सेटीन्ग्स) निवडा.

मी माझ्या संकलनामध्ये प्रतिमा कशा सामील करू?

आपण दोन प्रकारच्या प्रतिमा आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठावरून सामील करू शकता: एक शीर्षक व एक चिन्ह.

शीर्षक प्रतिमा, एका फलकाप्रमाणे, आपल्या संकलन पृष्ठाच्या वरच्या बाजूस प्रदर्शित होते. ती प्रतिमा gif, jpg, jpeg or png असू शकते, पण खुद्द Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर होस्ट होऊ शकत नाही. म्हणून, आपल्या संकलनावर शीर्षक-प्रतिमा घालण्यासाठी, आपल्याला ती इतर कुठेतरी प्रतिमा-सामायिकरण साईट वर होस्ट करावी लागेल. शीर्षक-प्रतिमा घालण्यासाठी, प्रतिमेची URL "Custom header URL" (सानुकूलित शीर्षक-प्रतिमा URL) फील्ड मध्ये पेस्ट करा. URL फाईल-टाइप एक्स्टेंशन .jpg, .jpeg, .png, किंवा .gif वापरून संपणे आवश्यक आहे. प्रतिमा जशी आहे तशी प्रदर्शित होईल; जर तुमच्या स्क्रीन ची रुंदी प्रतिमेच्या आकारापेक्षा छोटी असेल तर प्रतिमा कापली जाईल, व परत दिसेल जर उपलब्ध जागा प्रतिमेपेक्षा मोठी असेल तर.

चिन्ह म्हणजे १०० गुणिले १०० ची पिक्सेल प्रतिमा असते जी AO3 वर आपल्या संकलनाचे दृश्य प्रतिनिधित्व करते. हे चिन्ह आपल्या संकलन पृष्ठावर शीर्षक-प्रतिमेच्या खाली आणि, जेव्हा वापरकर्ते संकलने शोधत असतील तेव्हा, आपल्या संकलनाच्या ब्लर्ब च्या शेजारी दिसते. आपण मोठ्या किंवा छोट्या प्रतिमा अपलोड करू शकता, पण त्या १०० गुणिले १०० पिक्सेल च्या आकारात रूपांतरित केल्या जातील, आणि ज्या प्रतिमा चौरस नसतील त्या विकृत होतील. प्रतिमा jpg, jpeg, png, or gif या स्वरूपात असणे आवश्यक आहे.

चिन्ह घालण्यासाठी, "Upload a new icon" (नवीन चिन्ह अपलोड करा) च्या बाजूचे किंवा खालचे बटण निवडा. या बटणाचे नाव आपल्या ब्रॉउसर वर अवलंबून असेल; उदाहरणार्थ, ते "Browse" (शोधा) किंवा "Find file" (फाईल शोधा) असू शकते. आपल्याला हवे असलेले चिन्ह आपल्या उपकरणावर निवडा. ती प्रतिमा आपल्या उपकरणावर संग्रहित असणे गरजेचे आहे; आपण दुसरीकडे होस्ट केलेले चिन्ह अपलोड किंवा दूवीत करू शकत नाही.

संकलन चिन्ह आमच्या वापरकर्ता चिन्ह धोरण सेवेची नियमावली ला धरून असणे गरजेचे आहे, व त्या बद्दल अधिक माहिती आपण नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे बघू शकता.

आपण आपल्या चिन्हासाठी आल्ट टेक्स्ट सुद्धा घालू शकता. प्रतिमेला टेक्स्ट पर्याय प्रदान करणे हा आल्ट टेक्स्ट चा हेतू आहे. प्रतिमा दर्शनी नसेल किंवा जे सहाय्यक तंत्रज्ञान वापरत असतील त्यांना ह्यामुळे मजकूर स्पष्ट होतो. चिन्ह आल्ट टेक्स्ट हे २५० वर्णांवर सीमित असते. प्रतिमा निर्मात्याला नावलौकिक देण्यासाठी कृपया आल्ट टेक्स्ट चा वापर करू नका कारण वापरकर्त्यांना आल्ट टेक्स्ट किंवा चिन्ह दोन्हीपैकी एकच दर्शित होते, दोन्ही नाही.

हे बदल लागू होणार नाहीत जोपर्यंत आपण "Submit" (प्रस्तुत करा) (नवीन संकलन निर्माण करत असताना) किंवा "Update" (अद्यतनित करा) (विद्यमान संकलनात बदल करताना) निवडत नाही. हे बटण पृष्ठाच्या खालच्या भागात असते.

मी संकलनांचे संकलन करू शकतो का?

आपल्या मालकीच्या संकलनांमध्ये तुम्ही उपसंकलनांचा एक स्तर निर्माण करू शकता, पण आपण उप-संकलनांचे उप-संकलन निर्माण करू शकत नाही. म्हणजे, आपण या प्रकारचा संकलन वृक्ष निर्माण करू शकता:

  • एस ऍटॉर्नी हॉलिडे कथा
    • अभिनव त्रयी कालरेषा - व्हॅलेन्टाईन्स
    • अभिनव त्रयी कालरेषा - ख्रिसमस
    • दुसरी त्रयी कालरेषा - व्हॅलेन्टाईन्स
    • दुसरी त्रयी कालरेषा - ख्रिसमस

आपण या प्रकारचा संकलन वृक्ष निर्माण करू शकत नाही:

  • एस ऍटॉर्नी हॉलिडे कथा
    • अभिनव त्रयी कालरेषा हॉलिडे कथा
      • अभिनव त्रयी व्हॅलेन्टाईन्स
      • अभिनव त्रयी ख्रिसमस
    • दुसरी त्रयी कालरेषा हॉलिडे कथा
      • दुसरी त्रयी व्हॅलेन्टाईन्स
      • दुसरी त्रयी ख्रिसमस

अधिक माहितीसाठी मी उप-संकलन कसे निर्माण करू? याचा संदर्भ घ्या.

मी उप-संकलन कसे निर्माण करू?

  1. जेव्हा आप लॉग्ड-इन असाल, तेव्हा पृष्ठाच्या वरच्या भागातील (साईट लोगो च्या खाली) मेन्यू मधून "Browse" (शोधा) आणि नंतर "Collections" (संकलने) निवडा.
  2. पृष्ठाच्या वरच्या भागाच्या जवळील "New Collection" (नवीन संकलन) बटण निवडा.
  3. आपल्या संकलनांचे तपशील वापरून फॉर्म भरा आणि पालक संकलनाचे नाव "Parent collection (that you maintain)" (पालक संकलन (ज्याचे आपण व्यवस्थापन करता)) फिल्ड मध्ये भरा.
  4. "Submit" (सबमिट) बटण निवडा.

उप-संकलन निर्माण करण्यासाठी आपण पालक संकलनाचे मालक किंवा व्यवस्थापक असणे गरजेचे आहे याची कृपया नोंद असू द्या. पालक संकलनाचे सर्व मालक आणि व्यवस्थापक त्यातल्या उपसंकलनांचे मालक आणि व्यवस्थापक म्हणून सामील केले जातात.

जर आपण उप-संकलन निर्माण करताना परिचय, वाविप्र, आणि नियम फिल्ड्स मोकळे ठेवले, तर ती माहिती पालक संकलनामधून प्राप्त केली जाईल. जर आपल्याला हे व्हायला नको असेल तर, या फिल्ड्स मध्ये इतर माहिती सामील करा, किंवा एक अंतर-रहित जागा ( ) फिल्ड रिकामी ठेवण्यासाठी घाला.

संकलनावरच्या मेन्यू मधील दर्शनीफळा वर पालक संकलनाची दूवा असते.

संकलनामध्ये कार्य कोण सामील करू शकेल?

संकलनामध्ये कार्य सामील करण्याची आपली क्षमता, कोण कार्याचा मालक आहे, कोण संकलनाचा मालक आहे, आणि संकलनाच्या सेटीन्ग्स वर अवलंबून आहे. आपण आपली स्वतःची कार्य स्वतःच्या संकलनांमध्ये नेहमीच घालू शकता, आणि आपण कधीच इतर कोणाच्या कार्याला आपल्या मालकीच्या नसलेल्या किंवा आपण व्यवस्थापित करीत नसलेल्या संकलनामध्ये आमंत्रित करू शकत नाही. पण, आपण त्यांची कार्य वाचनखूण म्हणून सामील करू शकाल. अधिक माहितीसाठी, एखाद्या संकलनामध्ये कोण वाचनखूण सामील करू शकेल? हे बघा.

आपण आपली कार्य आपल्या मालकीच्या नसलेल्या एखाद्या संकलनामध्ये घालू शकता की नाही हे संकलनाच्या सेटीन्ग्स वर अवलंबून आहे, जे संकलनाच्या ब्लर्ब मध्ये किंवा त्याच्या दर्शनीफळा च्या वरच्या बाजूस सापडतील. या सेटीन्ग्स वरील अधिक माहितीसाठी एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय? हे बघा.

जर संकलन आपल्या मालकीचे असेल किंवा आपण ते व्यवस्थापित करीत असाल:

आपल्या मालकीच्या अथवा आपण व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये आपण कार्य निमंत्रित करू शकता, जरी ते संकलन बंद असेल तरी. निनावी आणि/किंवा अप्रदर्षित संकलनांमध्ये आपल्या मालकीची नसलेली कार्य आपण सामील नाही करू शकत.

जर कार्य आपल्या मालकीची असतील, तर ती लगेचच संकलनामध्ये सामील केली जातील.

जर कार्य दुसऱ्या कोणाची असतील आणि त्यांच्या निर्मात्यांनी "Automatically agree to your work being collected by others in the Archive" (संग्रहामध्ये आपोआप आपले कार्य इतरांच्या संकलनामध्ये सामिल होण्याची सहमती असणे) हे प्राधान्य सक्षम केले असेल तर ती ही लगेचच संकलनामध्ये सामिल केली जातील. जर त्यांनी हे प्राधान्य सक्षम केले नसेल तर त्यांना निमंत्रणाची एक ई-मेल सूचना प्राप्त होईल व प्रत्युत्तरात्मक होकार किंवा नकार दिला जाऊ शकतो.

जर संकलन आपल्या मालकीचे नसेल किंवा ते आपण व्यवस्थापित करीत नसाल:

कोणीही आपली स्वतःची कार्य कोणत्याही खुल्या संकलनामध्ये सामिल करू शकतात. जर संकलन व्यवस्थापित असेल आणि आपण त्या संकलनाचे अधिकृत सदस्य नसाल, तर त्या कार्यांना व्यवस्थापकाची मंजुरी लागेल. आपले कार्य संकलनात सामिल केले जाईल जर ते संकलनाच्या मालकाकडून किंवा व्यवस्थापकाकडून निमंत्रित असेल. संकलनात माझे कार्य सामील करण्याचे निमंत्रण मी कसे स्वीकारू किंवा नाकारू? याचा संदर्भ घ्या.

आपण आपोआप कार्य संकलनांमध्ये सामिल करायला मंजुरी देऊ शकता. हे प्राधान्य स्वीकारायचे व नाकारायचे कसे यावरील माहितीसाठी, प्रत्येक वेळी मंजुरीची पुष्टी न देता मी इतरांना माझी कार्य संकलनामध्ये सामील करण्याची परवानगी कशी देऊ? याचा संदर्भ घ्या. कृपया याची नोंद असू द्या की हे फक्त निनावी किंवा अप्रदर्षित नसलेल्या संकलनांनाच लागू होते. निनावी आणि/किंवा अप्रदर्षित संकलनांमध्ये फक्त आपणच आपली कार्य सामिल करू शकता.

कार्य निर्माते व संकलन व्यवस्थापक कधीही कार्य संकलनामधून काढू शकतात. अधिक माहितीसाठी, मी एखाद्या संकलनामधून कार्य किंवा वाचनखूण कशी काढू? याचा संदर्भ घ्या.

मी एखाद्या संकलनामध्ये कार्य सामील कसे करू?

आपल्या मालकीच्या किंवा आपण व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये आपले कार्य सामील करण्यासाठी:

  1. कार्य पृष्ठावरून "Edit" (बदल करा) हे बटण निवडा, आणि खाली "Associations" (सहयोग) विभागाकडे जा.
  2. "Post to Collections / Challenges" (संकलने/ आव्हाने) फील्ड मध्ये संकलनाचे नाव घाला. आपण संकलनाचे नाव घालणे सुरू करू शकता, आणि स्वयंपूर्ण-यादी मध्ये आपल्याला निवडता येतील अशी संकलने दिसतील. आपण एकच कार्य अनेक संकलनांमध्ये सामिल करू शकता.
  3. आपले बदल लागू करण्यासाठी "Post" (पोस्ट करा) निवडा. आपले कार्य आपोआप संकलनामध्ये सामील केले जाईल.

आपले कार्य इतर कोणाच्या संकलनामध्ये सामील करण्यासाठी:

  1. कार्य पृष्ठावरून "Edit" (बदल करा) हे बटण निवडा, आणि खाली "Associations" (सहयोग) विभागाकडे जा.
  2. "Post to Collections / Challenges" (संकलने/ आव्हाने) फील्ड मध्ये संकलनाचे नाव घाला. आपण संकलनाचे नाव घालणे सुरू करू शकता, आणि स्वयंपूर्ण-यादी मध्ये आपल्याला निवडता येतील अशी संकलने दिसतील. आपण एकच कार्य अनेक संकलनांमध्ये सामील करू शकता.
  3. आपले बदल लागू करण्यासाठी "Post" (पोस्ट करा) निवडा.
    • जर संकलन अव्यवस्थापित असेल किंवा आपण संकलनाचे सदस्य असाल, तर आपले कार्य लगेचच त्यामध्ये सामील केले जाईल.
    • जर संकलन व्यवस्थापित असेल आणि आपण त्याचे सदस्य नसाल, तर संकलनात सामील होण्याआधी तुमचे कार्य मंजूर व्हावे लागेल.

आपल्या मालकीच्या किंवा आपण व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये इतर कोणाचे कार्य सामिल करण्यासाठी:

  1. कार्याच्या किंवा अध्यायाच्या अंताला जा व "Add To Collections" (संकलनात सामिल करा) हे बटण निवडा.
  2. संकलनाचे नाव "Collection name(s)" (संकलन नाव (नावे)) फील्ड मध्ये घाला. आपण संकलनाचे नाव घालणे सुरू करू शकता, आणि स्वयंपूर्ण-यादी मध्ये आपल्याला निवडता येतील अशी संकलने दिसतील.
  3. आपल्याला हवे असलेले संकलन(ने) निवडा, आणि मग "Add" (सामिल करा) बटण निवडा. कार्य निमंत्रित आहे किंवा आपल्या संकलनात सामील झाले आहे याच्या खात्रीसाठी एका संदेशासह पृष्ठ रिफ्रेश होईल.
    • जर कार्याच्या निर्मात्याने त्यांचे कार्य आपोआप संकलनामध्ये सामिल करण्यास परवानगी दिली असेल, तर कार्य लगेचच सामील केले जाईल.
    • जर तसे नसेल, तर त्यांना एक ईमेल प्राप्त होईल ज्यात त्यांना सूचित केले जाईल की त्यांचे कार्य तुमच्या संकलनात सामील होण्यासाठी निमंत्रित आहे, व त्यांना त्यांच्या Collection Items (संकलन वस्तू) पृष्ठामधून ते निमंत्रण स्वीकारावे किंवा नाकारावे लागेल.

कृपया याची नोंद घ्या कि आपण जी कार्य आपल्या मालकीची नाहीत ती निनावी किंवा अप्रदर्षित संकलनामध्ये सामील करू शकत नाही. ह्या सेटीन्ग्स वरती अधिक माहितीसाठी, एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय? हे बघा.

जर आपण एखाद्या संकलनाचे मालक किंवा व्यवस्थापक नसाल तर त्या संकलनासाठी तुम्ही दुसऱ्यांचे कार्य निमंत्रित करू शकत नाही. पण आपण त्यांचे कार्य कदाचित वाचनखूण म्हणून सामील करू शकाल. अधिक माहितीसाठी, संकलनामध्ये वाचनखूण कोण सामील करू शकेल? हे बघा.

आपली कार्य संकलनामध्ये सामील करण्याच्या निमंत्रणांचे व्यवस्थापन करताना मदतीसाठी, प्रत्येक वेळी मंजुरीची पुष्टी न देता मी इतरांना माझी कार्य संकलनामध्ये सामील करण्याची परवानगी कशी देऊ? आणि संकलनात माझे कार्य सामील करण्याचे निमंत्रण मी कसे स्वीकारू किंवा नाकारू? याचा संदर्भ घ्या.

संकलनामध्ये वाचनखूण कोण सामील करू शकेल?

आपल्या वाचनखुणा एखाद्या खुल्या संकलनामध्ये कोणीही सामील करू शकतं. जर संकलन व्यवस्थापित असेल आणि आपण संकलनाचे अधिकृत सदस्य नसाल, तर वाचनखुणांना व्यवस्थापकाच्या मंजुरीची गरज असेल. मालकाच्या किंवा व्यवस्थापकाच्या प्रस्तुत वाचनखुणा आपोआप च सामील होतात, जरी संकलन व्यवस्थापित किंवा बंद असले तरी. विविध संकलन सेटीन्ग्स च्या व्याख्यांसाठी, एखादे संकलन खुले किंवा बंद, व्यवस्थापित किंवा अव्यवस्थापित, अप्रदर्शित, किंवा निनावी असणे म्हणजे काय? याचा संदर्भ घ्या.

वाचनखुणांना कार्याची सेटीन्ग्स वारसाहक्काने प्राप्त होतात, संकलनाची नाही. उदाहरणार्थ, एका प्रदर्शित संकलनामधील एखाद्या अप्रदर्षित, निनावी कार्यासाठीची वाचनखूण एक निनावी रहस्यमय कार्य म्हणूनच दिसेल, आणि एका अप्रदर्षित आणि निनावी संकलनामधील एक प्रदर्शित कार्य, त्याच्या कार्य निर्मात्यासह आणि शीर्षकासह दिसेल.

वाचनखुणा या Archive of Our Own - AO3 (आपला स्वतःचा संग्रह) यामधील किंवा बाहेर च्या कार्यांच्या सुद्धा असू शकतात, आणि कार्याच्या निर्मात्याची मंजुरी त्यासाठी गरजेची नाही.

वाचनखुणांवरील अधिक माहितीसाठी, कृपया वाचनखुणा वाविप्र याचा संदर्भ घ्या.

मी संकलनामध्ये एक वाचनखूण कशी सामील करू?

जेव्हा आपण वाचनखूण निर्मित करीत असाल किंवा त्यात बदल करीत असाल तेव्हा आपण वाचनखूण एका संकलनात सामील करू शकता. आपण आपल्या My Bookmarks (माझ्या वाचनखुणा) पृष्ठावरील कुठलीही वाचनखूण "Add to Collection" (संकलनामध्ये सामील करा) बटण निवडून संकलनामध्ये सामील करू शकता.

आपण संकलनाचे नाव घालणे सुरु करा, आणि स्वयंपूर्ण-यादी मध्ये आपल्याला निवडता येतील अशी संकलने दिसतील. यादीतून इच्छित संकलन(ने) निवडा, व नंतर "Edit" (बदल करा), "Create" (निर्मित करा), किंवा "Add" (सामील करा) निवडा.

वाचनखुणांवरील अधिक माहितीसाठी, कृपया वाचनखुणा वाविप्र याचा संदर्भ घ्या.

संकलनात माझे कार्य सामील करण्याचे निमंत्रण मी कसे स्वीकारू किंवा नाकारू?

मूलभूत पणे, जेव्हा कोणीही आपण निर्माण केलेले कार्य त्यांच्या मालकीच्या किंवा ते व्यवस्थापित करत असलेल्या संकलनामध्ये सामील करण्यासाठी निमंत्रित करेल तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला ते स्वीकारावे किंवा नाकारावे लागेल. आपोआप आपली कार्य संकलनांमध्ये सामील व्हावी कि नाही हे आपण आपल्या प्राधान्यांमधून निवडू शकता. अधिक माहितीसाठी, प्रत्येक वेळी मंजुरीची पुष्टी न देता मी इतरांना माझी कार्य संकलनामध्ये सामील करण्याची परवानगी कशी देऊ? हे बघा.

एखाद्या संकलनाचे निर्माते किंवा व्यवस्थापक जर आपले कार्य एका संकलनामध्ये निमंत्रित करत असतील आणि आपण आपोआप मंजुरी निश्चित केली नसेल, व जर आपण आपल्या प्राधान्यांमधून ईमेल सूचना बंद केली नसेल, तर आपल्याला निमंत्रण सूचित करणारी एक ईमेल येईल. आपली सूचना प्राधान्ये कशी बदलावी या माहितीसाठी, टिप्पणी सूचना प्राप्त होण्याची पद्धत मी मी कशी बदलू? याचा संदर्भ घ्या.

संकलनांमधील निमंत्रणांचे पुनरावलोकन आणि ती स्वीकारणे किंवा नाकारणे:

  1. लॉग-इन करून "Hi, (नमस्कार) [सदस्यनाम]!" हे अभिवादन निवडून आणि मेन्यू मधून "My Dashboard" (माझा दर्शनीफळा) निवडून, किंवा आपली खाते-रेखाचित्र प्रतिमा निवडून, आपल्या दर्शनीफळा यावर जा.
  2. पृष्ठाच्या बाजूस दिसणाऱ्या किंवा मोबाईल वर वरच्या भागात सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने) निवडा.
  3. दर्शनीफळा पृष्ठावर वरच्या उजवीकडच्या भागातील (किंवा मोबाईल वरील "[सदस्यनाम] ची संकलने" शीर्षकाच्या खालचे) "Manage Collected Works" (संकलित कार्य व्यवस्थापित करा) बटण निवडा. कुठलीही कार्य जी निमंत्रित असतील पण स्वीकारलेली नसतील ती "Awaiting Approval" (स्वीकारण्यासाठी प्रलंबित) पृष्ठावर सूचित दिसतील.
  4. कार्याचे पूर्ण ब्लर्ब दिसण्यासाठी "Details" (तपशील) निवडा.
  5. मेन्यू निवडा आणि आपल्या निर्णयानुसार "Approved" (स्वीकारा) किंवा "Rejected" (नाकारा) निवडा, आणि मग पृष्ठाच्या खालच्या भागातून "Submit" (प्रस्तुत करा) बटण निवडा.

कार्याच्या मंजुरी सेटिंग मधील आधीचा निर्णय बदलण्यासाठी:

  1. लॉग-इन करा व "Hi, (नमस्कार) [सदस्यनाम]!" हे अभिवादन निवडून आणि मेन्यू मधून "My Dashboard" (माझा दर्शनीफळा) निवडून, किंवा आपली खाते-रेखाचित्र प्रतिमा निवडून, आपल्या दर्शनीफळा यावर जा.
  2. पृष्ठाच्या बाजूस दिसणाऱ्या किंवा मोबाईल वर वरच्या भागात सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने) निवडा.
  3. दर्शनीफळा पृष्ठावर वरच्या उजवीकडच्या भागातील (किंवा मोबाईल वरील "[सदस्यनाम] ची संकलने" शीर्षकाच्या खालचे) "Manage Collected Works" (संकलित कार्य व्यवस्थापित करा) बटण निवडा.
  4. दर्शनीफळ्यावर वरच्या उजव्या बाजूकडे (किंवा मोबाईल वरील "[सदस्यनाम] ची संकलने" शीर्षकाच्या खाली) असलेले "नाकारा" किंवा "स्वीकारा" बटण निवडा.
  5. आपल्याला जे कार्य सुधारित करायचे आहे त्यापर्यंत स्क्रोल करा आणि कार्याच्या शीर्षकाच्या खालच्या "तपशील" बटणाच्या उजवीकडील मेन्यू मधून कार्याची नवीन स्थिती निवडा, किंवा "Remove" (हटवा) चेकबॉक्स चेक करा आणि "प्रस्तुत करा" निवडा.

अधिक माहितीसाठी नाकारलेले आणि हटवलेले या मध्ये काय फरक आहे? याचा संदर्भ घ्या.

एखाद्या संकलनामधून मी कार्य किंवा वाचनखूण कसे हटवू?

जर आपण संकलनाचे मालक किंवा व्यवस्थापक असाल:

  1. जेव्हा आपण लॉग्ड-इन असाल, पृष्ठाच्या वरच्या बाजूच्या मेन्यू मधून "Hi, (नमस्कार) [सदस्यनाम]!" "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळा वर असाल, तर आपण दिशादर्शन समासामधून (जेव्हा आपण मोबाईल वापरत असाल तेव्हा पृष्ठाच्या वरच्या भागात सापडणारे) "Collections (#)" (संकलने (#)) सुद्धा निवडू शकता.
  2. यादीतून आपल्याला व्यवस्थापित करायचे असेल ते संकलन निवडा.
  3. पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाईल मध्ये वर सापडणारे "Manage items" (वस्तू व्यवस्थापित करा) निवडा.
  4. अश्या गोष्टी ज्या मंजुरीसाठी आहेत, मंजूर आहेत किंवा नाकारलेल्या आहेत त्यांचे पुनरावलोकन करण्यासाठी दर्शनीफळ्यावर पृष्ठाच्या वरच्या उजव्या बाजूस (किंवा मोबाईल वर "[संकलन नाव] Items in (मधील वस्तू)" च्या खाली) असलेली बटणे वापरा
  5. एकदा आपल्याला ते कार्य किंवा वाचनखूण सापडले जे आपल्याला यादीतून हटवायचे आहे, कि "Remove" (हटवा) चेकबॉक्स निवडा.
  6. आपले बदल लागू करण्यासाठी "Submit" (प्रस्तुत करा) बटण निवडा. त्या वस्तू संकलनामधून ताबडतोब हटवल्या जातील.

आपण एकावेळी अनेक वस्तू हटवू शकता.

जर आपण कार्याचे निर्माते असाल:

  1. कार्याच्या पृष्ठावरून "Edit" (बदल करा) बटण निवडा आणि "Associations" (सहयोग) विभागाकडे स्क्रोल करा.
  2. "Post to Collections / Challenges" (संकलने/आव्हाने मध्ये पोस्ट करा) च्या बाजूस असलेले आपल्याला हटवायचे असणाऱ्या संकलनाचे नाव लाल (×) निवडा.
  3. बदल लागू करण्यासाठी "Post" (पोस्ट करा) निवडा. ते कार्य संकलनामधून ताबडतोब हटवले जाईल.

जर आपण वाचनखुणेचे निर्माते असाल:

  1. जेव्हा आपण लॉग्ड-इन असाल, पृष्ठाच्या वरच्या बाजूच्या मेन्यू मधून "Hi, (नमस्कार) [सदस्यनाम]!" "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळ्यावर असाल, तर आपण दिशादर्शनी समासातील (मोबाईल वापरत असताना पृष्ठाच्या वरच्या भागात सापडणारे) "Bookmarks" (वाचनखुणा) सुद्धा निवडू शकता.
  2. वाचनखुणेच्या ब्लर्ब च्या खालचे "बदल करा" बटण निवडा.
  3. वाचनखूण ज्यातून हटवायची आहे त्या संकलनाच्या नावाच्या बाजूचे लाल (×) निवडा.
  4. बदल लागू करण्यासाठी "Update" (अद्यतनित करा) निवडा. ती वाचनखूण संकलनामधून ताबडतोब हटवली जाईल.

माझ्या मालकीच्या संकलनातील कार्य मी कसे उघड करू किंवा त्यांचे निनावीपण कसे घालवू?

आपण संपूर्ण संकलनात कार्य आणि निर्माते एकाच वेळी, किंवा प्रत्येक कार्य वेगवेगळे उघड करू शकता.

आपल्या संकलनातील सर्व कार्यांवर परिणाम करण्यासाठी:

  1. आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठाकडे मार्गस्थ व्हा आणि Preferences (प्राधान्ये) विभागाकडे खाली स्क्रोल करा. या पृष्ठावर कसे जावे या संदर्भात जर आपण साशंक असाल, तर मी माझ्या संकलन सेटीन्ग्स पृष्ठाकडे कसे जाऊ? याचा संदर्भ घ्या.
  2. "This collection is unrevealed" (हे संकलन अप्रदर्षित आहे) आणि/किंवा "This collection is anonymous" (हे संकलन निनावी आहे) अनचेक करा आणि मग "Update" (अद्यतनित करा) बटण निवडा.

याची नोंद असू द्या कि जर आपण आपल्या "संकलन सेटीन्ग्स" पृष्ठावर परत जाऊन हे पर्याय परत चेक केलेत, तर आपल्या संकलनात असलेली सर्व कार्य प्रदर्शित आणि ना-निनावी राहतील. फक्त अशी कार्य जी सेटींग सक्षम केल्यानंतर सामील केलेली असतील ती आपोआप अप्रदर्षित आणि निनावी असतील.

प्रत्येक कार्यावर वेगळा परिणाम करण्यासाठी:

  1. लॉग इन करा व पृष्ठाच्या वरच्या भागातील "Hi, (नमस्कार) [सदस्यनाम]!" मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळा वर असाल, तर दिशादर्शनी समासातून (मोबाईल वापरात असताना पृष्ठाच्या वरच्या भागात) सापडणाऱ्या मेन्यू मधून "Collections (#)" (संकलने (#)) सुद्धा निवडू शकता.
  2. प्रदान झालेल्या यादीतून संकलन निवडा.
  3. पृष्ठाच्या बाजूस, किंवा मोबाईल वर वरच्या बाजूस सापडणाऱ्या संकलनाच्या दर्शनीफळ्यावरून "Manage Items" (वस्तूंचे व्यवस्थापन) निवडा.
  4. दर्शनीफळ्यावर पृष्ठाच्या वरील उजव्या बाजूस (किंवा मोबाईल वर "[संकलन नाव] Items in (मधील वस्तू)" च्या खाली) असलेले "Approved" (स्वीकारले) बटण निवडा.
  5. आपल्याला बदल करायचे असलेले कार्य शोधा, आणि "Unrevealed" (अप्रदर्षित) आणि/किंवा "Anonymous" (निनावी) चेकबॉक्स चेक किंवा अनचेक करा. आपण एकाच वेळी अनेक कार्यांसाठी हे करू शकता.
  6. आपले बदल झाले कि बदल लागू करण्यासाठी "Submit" (प्रस्तुत करा) बटण निवडा.

नाकारलेले आणि हटवलेले या मध्ये काय फरक आहे?

जी गोष्ट संकलनामधून नाकारलेली असेल ती संकलनाचा भाग म्हणून दिसत नाही आणि परत संकलनामध्ये प्रस्तुत केली जाऊ शकत नाही. पण, ज्या व्यक्तीने ते नाकारले आहे त्याच्यामार्फत त्याची स्थिती बदलली जाऊ शकते (ते कार्याचे निर्माते असो वा संकलनाचे मालक वा व्यवस्थापक असो).

जी गोष्ट संकलनामधून हटवलेली असेल ती संकलनाशी संबंधित राहणार नाही व परत प्रस्तुत केली जाऊ शकते.

जर आपण संकलनाचे मालक वा व्यवस्थापक असाल आणि नाकारलेल्या गोष्टींचे आपल्याला पुनरावलोकन करायचे असेल, तर माझ्या मालकीच्या किंवा मी व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनातील कार्य व वाचनखुणा मी कश्या व्यवस्थापित करू? हे बघा.

जर आपण कार्याचे निर्माते असाल आणि नाकारलेल्या निमंत्रणांचे पुनरावलोकन करायचे असेल, तर संकलनात माझे कार्य सामील करण्याचे निमंत्रण मी कसे स्वीकारू किंवा नाकारू? हे बघा.

सदस्यतेचे कोणते स्तर संकलनांसाठी उपलब्ध आहेत?

Owner (मालक):
यांना संकलनाच्या सर्व पैलूंवर नियंत्रणाची परवानगी असते.
Moderator (व्यवस्थापक):
संकलनासाठी प्रस्तुत गोष्टींसाठी मंजुरी यासारख्या काही संकलन सेटीन्ग्स वर नियंत्रण असते.
Member (सदस्य):
यांना संकलन सेटिंग वर काहीही नियंत्रण नसते, पण व्यवस्थापकाच्या परवानगीशिवाय ते संकलनामध्ये गोष्टी प्रस्तुत करू शकतात.
Invited (आमंत्रित):
सध्यस्थितीत, वापरकर्त्यांना संकलनाचे निमंत्रण मंजूर करण्याचा कोणताही मार्ग नाही, म्हणून हा स्तर नाही च्या समान च आहे.
None (काहीच नाही):
संकलनाचा सदस्य नाही. ही कोणाचाही मूलभूत सदस्यता स्तर आहे जे व्यवस्थापित संकलनासाठी "Join" (सामिल व्हा) निवडतात.

जर आपल्याला आपण सामिल असलेले कोणतेही संकलन सोडायचे असेल व आपण मालक किंवा व्यवस्थापक नसाल, तर संकलनाच्या दर्शनीफळा वरील, डेस्कटॉप वर वरील उजवीकडील (किंवा मोबाईलवर [संकलन नाम] शीर्षकाच्या खालील) "Leave" (सोडा) बटण निवडा. अधिक माहितीसाठी एखाद्या संकलनामध्ये मी माझी सदस्यता कशी बदलू? हे बघा.

मालकी व व्यवस्थापन परवानग्यांबद्दल अधिक विशिष्ट माहितीसाठी, एका मालकांमध्ये व व्यवस्थापकामध्ये काय फरक आहे? याचा संदर्भ घ्या.

मी माझ्या संकलनामध्ये सदस्य कसे सामिल करू?

आपल्या संकलनामध्ये सदस्य सामिल करण्याकरिता:

  1. संकलनाच्या दर्शनीफळा याकडे मार्गस्थ व्हा:
    • आपण लॉग्ड-इन असताना, पृष्ठाच्या वरील भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" या मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळ्यावर असाल तर दिशादर्शनी समासामधून (मोबाईल वापरत असताना पृष्ठाच्या वरच्या भागात सापडू शकणारे) "Collections (#)" (संकलने (#)) निवडा.
    • ज्या संकलनामध्ये आपल्याला सदस्य सामिल करावयाचे आहेत ते निवडा.
  2. डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरच्या भागातील (किंवा मोबाईल वर " [संकलन नाम] Items in (मधील वस्तू)" शीर्षकाच्या खालील) "Membership" (सदस्यता) बटण निवडा.
  3. पृष्ठ शीर्षकाच्या खालच्या भागातील फील्ड मध्ये आपल्या नवीन सदस्याचे नाव किंवा स्यूडोआयडी घालण्यास सुरुवात करा. आपण ऑटोकंप्लिट मधून योग्य सदस्य निवडू शकता, किंवा त्यांचे पूर्ण वापरकर्तानाम/स्यूडोआयडी स्वतः घालू शकता.
    • आपण एका वेळी अनेक वापरकर्ते घालू शकता
  4. "Submit" (प्रस्तुत करा) निवडा. वापरकर्ते संकलन सदस्य म्हणून सामिल केले जातील.

एकदा कोणी सदस्य झाले की, आपण त्यांच्या नावाच्या वर जाऊन त्यांच्या नियंत्रण परवानग्या बदलू शकता. त्यांच्या नावाच्या खाली किंवा बाजूला असलेल्या मेन्यू मधून त्यांना लागू करावयाची असलेली भूमिका निवडा व बदल लागू करण्यासाठी "Update" (अद्यतनित करा) निवडा.

विशेषतः व्यवस्थापित संकलन यामध्ये एखाद्याला सदस्य म्हणून सामिल करणे उपयोगी ठरते, कारण यामुळे सदस्यांना आपली कार्य व्यवथापकाच्या मंजुरीशिवाय संकलनामध्ये सामिल करण्याची परवानगी मिळते. ज्या इतर वापरकर्त्यांना आपण व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये सामिल होण्यास रस असेल ते संकलनाच्या दर्शनीफळ्यावरील "Join" (सामिल व्हा) हे बटण निवडून स्वतःला सामिल करून घेऊ शकतील. जेव्हा एखादा वापरकर्ता यापद्धतीने सामिल होतो, त्यांना सुरुवातीला "काहीही नाही" या स्तराचे नियंत्रण दिले जाते आणि त्यांच्या परवानग्या जे सदस्य नाहीत त्यांच्या एवढ्याच असतात. त्यांना आपल्या संकलनामध्ये सदस्य म्हणून सामिल करण्यासाठी, आपल्याला त्यांच्या नियंत्रण परवानग्या "सदस्य", "व्यवस्थापक", किंवा "मालक" यामध्ये बदलाव्या लागतील.

अधिक माहितीसाठी, संकलनांसाठी सदस्यतेचे कोणते स्तर उपलब्ध आहेत? किंवा सह-मालक किंवा व्यवस्थापक यामध्ये काय फरक आहे? याचा संदर्भ घ्या.

माझ्या संकलनामध्ये मी व्यवस्थापक किंवा मालक कसे सामिल करू किंवा हटवू?

कोणताही नवीन मालक किंवा व्यवस्थापक संकलनाचा सदस्य असणे आवश्यक आहे. त्यांना कसे सामिल करावे याबद्दल मदतीसाठी मी माझ्या संकलनात सदस्य कसे सामील करू? हे बघा.

एकदा का आपण त्यांना सदस्य म्हणून सामिल केले, की आपण त्यांच्या नावावर स्क्रोल करून त्यांच्या नियंत्रण परवानग्या बदलू शकता. त्यांच्या नावाच्या बाजूस किंवा खाली असलेल्या मेन्यू मधून "Owner" (मालक) or "Moderator" (व्यवस्थापक) निवडा, आणि मग बदल लागू करण्यासाठी "Update" (अद्यतनित करा) निवडा.

फक्त मालकच नवीन मालक किंवा व्यवस्थापक सामिल करू शकतात. मालक दुसऱ्या मालकांना आणि व्यवस्थापकांना हटवूही शकतात, मूळ मालकासह. व्यवस्थापक इतर व्यवस्थापकांची घटती करू शकतात पण सामिल करू शकत नाहीत. या भूमिकांमधील फरकांच्या पूर्ण यादी साठी, एक मालक व एक व्यवस्थापक यांमध्ये काय फरक आहे? याचा संदर्भ घ्या.

एक मालक व एक व्यवस्थापक यांमध्ये काय फरक आहे?

संकलनाच्या व्यवस्थापक स्तराच्या नियंत्रण स्तरावरचे कोणिही हे करू शकतात:

  • सदस्य सामिल करणे
  • व्यवस्थापक किंवा त्याहून खालच्या स्तराच्या सदस्यांना हटवू शकतात
  • व्यवस्थापकांची घटती (पण बढती नाही)
  • कार्यांना संकलनामध्ये निमंत्रित करणे
  • प्रस्तुत वस्तूंचे पुनरावलोकन (मंजुरी, नकार, वा हटवणे)

कोणीही ज्याला मालक स्तराचे नियंत्रण आहे त्याला व्यवस्थापकाच्या सर्व परवानग्या असतात, आणि त्या बरोबरच हे ही करू शकतात:

  • संकलनाच्या सेटीन्ग्स मध्ये बदल करणे (कार्य व निर्माते उघड करणे किंवा संकलनात होस्ट होत असलेल्या कुठल्याही आव्हान या साठी सेटीन्ग्स या सह)
  • सर्व सदस्यांना सामील करणे, हटवणे व नियंत्रण परवानग्या स्थापित करणे (मूळ मालकासह)
  • संकलन हटवणे

नियंत्रण परवानग्यांमध्ये कसे बदल करावे यावरील अधिक माहितीसाठी माझ्या संकलनात सदस्य कसे सामिल करू? याचा संदर्भ घ्या.

मी एखाद्या सदस्याचा नियंत्रण स्तर कसा बदलू, किंवा त्यांना माझ्या संकलनातून कसे हटवू?

एखाद्या सदस्याचा नियंत्रण स्तर बदलण्यासाठी, किंवा त्यांना संकलमधून काढून टाकण्यासाठी:

  1. संकलनाच्या दर्शनीफळा या कडे मार्गस्थ व्हा:
    • आपण लॉग्ड-इन असताना, पृष्ठाच्या वरील भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" या मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळ्यावर असाल तर दिशादर्शनी समासामधून (मोबाईल वापरत असताना पृष्ठाच्या वरच्या भागात सापडू शकणारे) "Collections (#)" (संकलने (#)) निवडा.
    • आपल्याला ज्या संकलनाच्या सदस्यांच्या नियंत्रण स्तरांमध्ये बदल करायचे आहेत ते संकलन निवडा.
  2. डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरच्या भागातील (किंवा मोबाईल वर "[संकलन नाम] Items in (मधील वस्तू)" शीर्षकाच्या खालील) "Membership" (सदस्यता) बटण निवडा.
    • जर आपल्याला त्यांची नियंत्रण परवानगी वेगळ्या स्तरात बदलावयाची असेल, तर त्यांचे नाव सापडवा आणि त्याच्या खाली किंवा बाजूस असलेल्या मेन्यू मधून जी भूमिका आपल्याला लागू करावयाची आहे ती निवडा. बदल लागू करण्यासाठी "Update" (अद्यतनित करा) निवडा. नियंत्रण स्तरांवरील अधिक माहितीसाठी, संकलनांसाठी कोणते सदस्यता स्तर उपलब्ध आहेत? याचा संदर्भ घ्या.
    • जर आपल्याला त्यांना संकलनामधून पूर्णतः काढून टाकायचे असेल, तर त्यांच्या नावाच्या शेजारील "Remove" (हटवा) बटण निवडा आणि मग पुष्टीकरण संवाद बॉक्स मधील "OK" (होय) निवडा.
    • आपण संकलनाचा एकमेव मालक हटवू शकत नाही.

मी एखाद्या संकलनामध्ये माझी सदस्यता कशी बदलू शकतो?

एका व्यवस्थापित संकलन यामध्ये सामिल होण्यासाठी, संकलनाच्या दर्शनीफळा पृष्ठाकडे या कडे मार्गस्थ व्हा आणि डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजवीकडील भागातील (किंवा मोबाईल वर "[संकलन नाम] Items in (मधील वस्तू)" शीर्षकाच्या खालील) "Join" (सामिल व्हा) बटण निवडा. संकलन दर्शनीफळ्यावरून दूवा घेऊन, लोक पृष्ठावर आपले स्यूडोआयडी सार्वजनिक प्रदर्शित केले जातील; पण संकलनात आपल्याला पोस्ट करण्याचे विशेषाधिकार मिळावे म्हणून, मालक किंवा व्यवस्थापकाने आपला नियंत्रण स्तर "Member" (सदस्य) म्हणून बदलणे आवश्यक आहे. नियंत्रण स्तरांवरील अधिक माहितीसाठी, संकलनांसाठी कोणते सदस्यता स्तर उपलब्ध आहेत? याचा संदर्भ घ्या.

एखाद्या संकलनाचा सदस्य असणे तेव्हाच विशेषाधिकार प्राप्त करून देते जेव्हा आपण एक मालक किंवा व्यवस्थापक असाल, किंवा जर संकलन व्यवस्थापित असेल. आपण एका अव्यवस्थापित संकलनामध्ये सामिल होऊ शकत नाही, पण संकलनाचा मालक आपल्याला ते व्यवस्थापित करण्याचे नियंत्रण देऊ शकतो.

जर आपण एक सदस्य असाल, तर आपण संकलनाच्या दर्शनीफळ्यावरचे, डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजवीकडचे (किंवा मोबाईल वर "[संकलन नाम] Items in (मधील वस्तू)" शीर्षकाच्या खालील) "Leave" (बाहेर पडा) बटण निवडून संकलन सोडू शकता.

जरआपण मालक किंवा व्यवस्थापक असाल, व आपण एकमेव मालक नसाल, तर आपण कधीही संकलनातून बाहेर पडू शकता किंवा आपला सदस्यता नियंत्रण खालच्या स्तरात बदलू शकता. अधिक माहितीसाठी, मी एखाद्या सदस्याचा नियंत्रण स्तर कसा बदलू, किंवा त्यांना माझ्या संकलनातून कसे हटवू?

माझ्या मालकीच्या किंवा मी व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये मी कार्य किंवा वाचनखूणा कश्या व्यवस्थापित करू?

आपल्या संकलनामध्ये कार्य आणि/किंवा वाचनखुणा व्यवस्थापित करण्याकरिता:

  1. लॉग-इन करा आणि पृष्ठाच्या वरील भागातील "Hi, (नमस्कार) [वापरकर्तानाम]!" या मेन्यू मधून "My Collections" (माझी संकलने) निवडा. जर आपण आपल्या दर्शनीफळ्यावर असाल तर दिशादर्शनी समासामधून (मोबाईल वापरत असताना पृष्ठाच्या वरच्या भागात सापडू शकणारे) "Collections (#)" (संकलने (#)) निवडा.
  2. प्रस्तुत यादीतून संकलन निवडा.
  3. पृष्ठाच्या बाजूस किंवा मोबाईल वर वरच्या भागात सापडणाऱ्या संकलनाच्या दर्शनीफळ्या मधून "Manage Items" (वस्तूंचे व्यवस्थापन) निवडा. आपोआपच, हे आपल्याला संकलनामध्ये सामिल होण्यास व्यवस्थापकाच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत वस्तूंच्या यादी पृष्ठावर घेऊन जाईल.
  4. संकलनामध्ये सामिल होण्यासाठी निमंत्रित आणि सध्यस्थितीत निर्मात्याच्या मंजुरीसाठी प्रतीक्षेत सर्व कार्यांच्या यादीसाठी, डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजवीकडचे (किंवा मोबाईल वर "[संकलन नाम] Items in (मधील वस्तू)" शीर्षकाच्या खालील) "Invited" (आमंत्रित) बटण निवडा.
    • आपण आधीच निर्णय घेतलेल्या वस्तूंचे पुनरावलोकन करण्यासाठी "Rejected" (नाकारलेले) आणि "Approved" (मंजूरी असलेले) बटणे वापरू शकता.
  5. आपल्याला सुधारित करावयाची वस्तू शोधा आणि तिची नवीन स्टेटस निवडा. आपण हे एकाच वेळी अनेक कार्यांसाठी करू शकता.
    • एखादे कार्य मंजूर व नाकारण्यासाठी, कार्य शीर्षकाच्या खालील "Details" (तपशील) बटणाच्या उजवीकडील मेन्यू मधून त्याचे नवीन स्टेटस निवडा.
    • संकलनामधून एखादे कार्य काढण्यासाठी, "Remove" (हटवा) चेकबॉक्स चेक करा
    • एखाद्या अप्रदर्षित किंवा निनावी संकलनामध्ये आपल्या कार्याचे कार्य-स्टेटस बदलण्यासाठी, "Unrevealed" (अप्रदर्षित) or "Anonymous" (निनावी) चेकबॉक्स चेक किंवा अनचेक करा.
  6. आपले बदल जतन करण्यासाठी "Submit" (प्रस्तुत करा) निवडा.

एखादी संकलन वस्तू नाकारणे व हटवणे याबद्दल अधिक माहितीसाठी, नाकारले जाणे आणि हटवले जाणे यामध्ये काय फरक आहे ? याचा संदर्भ घ्या.

माझ्या मालकीच्या किंवा मी व्यवस्थापित करीत असलेल्या संकलनामध्ये कोणीतरी वस्तू सामील केली आहे हे मला कसे समजेल?

नवीन कार्य किंवा वाचनखूण संकलनामध्ये सामिल झाले असेल तर ते आपल्याला सूचित होण्याची व्यवस्था संकलनामध्ये करू शकता:

  1. आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठाकडे मार्गस्थ व्हा. या पृष्ठाकडे कसे याबद्दल जर आपण गोंधळलेले असाल, तर मी माझ्या संकलन सेटीन्ग्स पृष्ठाकडे कसा परत जाऊ? याचा संदर्भ घ्या.
  2. शीर्षक विभागात, "Collection email" (संकलन ईमेल) फील्ड मध्ये एक ईमेल पत्ता घाला.
    • जो ईमेल पत्ता आपण इथे घालाल तो सार्वजनिकपणे संकलनाच्या पृष्ठावर प्रदर्शित होईल याची जाणीव असू द्या, व आपल्याला कदाचित वैयक्तिक ईमेल पत्ता देणे टाळायचे असू शकते. जर आपल्याला अनेक लोकांना सूचित करावयाचे असेल, तर आपल्याला एक सामायिक ईमेल पत्ता निर्मित करावा लागेल किंवा मेलिंग यादी बनवून तिचा पत्ता इथे घालावा लागेल.
  3. Preferences (प्राधान्ये) विभागापर्यंत स्क्रोल करा आणि "Send a message to the collection email when a work is added" (कार्य सामील झाल्यावर संकलन ईमेल वर संकेत पाठवा) पर्याय बॉक्स वर चेक करा..
  4. पृष्ठाच्या खालच्या भागातील "Update" (अद्यतनित करा) बटण निवडा.

आपल्याला ईमेल घालून मग "कार्य सामिल झाल्यावर संकलन ईमेल वर संकेत पाठवा" हा बॉक्स चेक करावा लागेल याची नोंद असू द्या. दोन्ही पैकी एकच गोष्ट केल्याने संकलनाच्या सूचनांवर काहीही परिणाम होणार नाही.

ईमेल प्रस्तुत केलेला नसला, तरीही भेट देवाण-घेवाण ईमेल्स पाठवल्या जातील. अधिक शिकण्यासाठी, मी नवीन भेट देवाण-घेवाण स्थापित करीत असताना मी ईमेल प्रदान केला नसेल तर काय होईल? याचा संदर्भ घ्या.

माझ्या संकलनामध्ये वस्तू सामिल झाल्या आहेत याच्या सूचना थांबवण्यासाठी काय करावे?

जर कोणी त्यांचे कार्य किंवा वाचनखूण आपल्या संकलनामध्ये सामिल केल्याची सूचना आपल्याला नको असेल:

  1. आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठाकडे मार्गस्थ व्हा. या पृष्ठावर कसे जायचे या बाबत आपण साशंक असाल तर, मी परत माझ्या संकलन सेटीन्ग्स पृष्ठाकडे कसा जाऊ? याचा संदर्भ घ्या
  2. Preferences (प्राधान्य) विभागापर्यंत स्क्रोल करा आणि "Send a message to the collection email when a work is added" (कार्य सामिल झाल्यावर संकलन ईमेल वर संकेत पाठवा) या पर्यायाचा बॉक्स अनचेक करा.
  3. पृष्ठाच्या खालच्या भागातील "Update" (अद्यतनित करा) बटण निवडा.

आपल्या संकलन सेटीन्ग्स पृष्ठावरील "Collection email" (संकलन ईमेल) फील्ड मधून आपला ईमेल पत्ता हटवाल्याने सुद्धा, आपल्याला ईमेल प्राप्त होणे बंद होईल, "कार्य सामिल झाल्यावर संकलन ईमेल वर संकेत पाठवा" हा पर्याय चेक केलेला असेल तरीही.

संकलन आणि आव्हान सूचना वेगवेगळ्या आहेत याची नोंद असु द्या. जर आपले संकलन एक भेट देवाण-घेवाण ही असेल, तर संभवनीय नेमलेली कार्य तयार असताना, नेमलेली कार्य पाठवल्यावर, आणि जेव्हा वापरकर्ता त्यांची कार्य अपुरी ठेवत असेल तरीही आपल्याला ईमेल प्राप्त होईल,

मी एखादे संकलन कसे हटवू?

आपल्या मालकीचे संकलन हटविण्यासाठी:

  1. आपल्या "Collection Settings" (संकलन सेटीन्ग्स) पृष्ठाकडे मार्गस्थ व्हा. या पृष्ठावर कसे जायचे या बाबत आपण साशंक असाल तर, मी परत माझ्या संकलन सेटीन्ग्स पृष्ठाकडे कसा जाऊ? याचा संदर्भ घ्या
  2. डेस्कटॉप वर पृष्ठाच्या वरील उजवीकडील भागात (किंवा मोबाईल वर "Edit Collection" (संकलन बदल) शीर्षकाच्या खाली) असलेले "Delete Collection" (संकलन हटवा) बटण निवडा.
  3. एक पॉप-अप दिसेल जो म्हणेल "काय आपल्याला खात्री आहे की आपल्याला हे संकलन हटवायचे आहे? सर्व संकलन सेटीन्ग्स जातील. (Works will not be deleted.)" (कार्य हटवली जाणार नाहीत) पुढे जाण्यासाठी "OK" (होय) निवडा.

हे कायमसाठी हटविले जाईल याची नोंद असू द्या. एकदा हटविलेले संकलन पुनःस्थापित होणार नाही.

जर आपले संकलन एक प्रॉम्प्ट मीम किंवा भेट देवाण-घेवाण होस्ट करित असेल, तर आपल्याला ते आधी हटवावे लागेल. हे कसे करावे यावर अधिक जाणण्यासाठी, मी प्रॉम्प्ट मीम कशी हटवू? किंवा मी भेट देवाण-घेवाण कशी हटवू? याचा संदर्भ घ्या.

एखादे पालक संकलन हटविल्याने उपसंकलने हटविली जात नाहीत; परंतु, त्यानंतर उपसंकलने गटबद्ध असणार नाहीत. एखादे संकलन हटविल्याने संबंधित कार्य किंवा वाचनखुणा सुद्धा हटविल्या जाणार नाहीत.

जर माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे प्राप्त झाले नसेल तर मला अधिक माहिती कुठे मिळू शकेल?

आपल्याला संकलन किंवा आव्हान निर्मितीच्या एखाद्या विशिष्ट भागाकरिता मार्गदर्शन हवे असेल, तर कृपया हे बघा:

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्‍या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. या वाविप्र आणि शिकवण्यांमध्ये सामिल न झालेल्या विशिष्ट आव्हाना संदर्भातील मदतीसाठी, AO3_मदत यांना उप-मालक म्हणून सामिल करा व समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा आणि आम्ही आमच्या परीने आपल्याला सर्वोत्तम मदत देण्याचा प्रयत्न करू.