Archive FAQ > इतिहास व नंतर साठी खूण

माझा इतिहास काय आहे?

तुमचा इतिहास म्हणजे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वरील आपण लाॅग्ड इन असताना प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्याची नोंद आहे. ही नोंद तारखेच्या क्रमवारी प्रमाणे केली जाते (नुकतेच बघितलेले कार्य यादीमध्ये पहिल्यांदी दिसतात). कार्य ब्लर्ब च्या खाली आपण ते कार्य शेवटी कधी बघितले याची तारीख व एकूण किती वेळा बघितले आहे याची नोंद सापडेल. जर आपण "Mark for Later" (नंतरसाठी खुणित) हे वैशिष्ट्य वापरलेले असेल तर कंसामध्ये "Mark for Later" (नंतर साठी खुणित) ही टिप्पणी दर्शविलेली असेल. या वैशिष्टयावरील अधिक माहितीसाठी "Mark for Later" बटण काय करते? इथे जा.

इतिहास नोंद ही मूलत: समर्थित केलेली असते. बंद करण्यासाठी, आपल्या Preferences (प्राधान्ये) पृष्ठाच्या Miscellaneous (संकीर्ण) विभागात जा व "Turn on Viewing History" (इतिहास नोंद दिसणे चालु करा) याच्या शेजारचा चेकबॉक्स अनचेक करा, व नंतर पृष्ठाच्या खालील भागतील "Update" (अद्यतनीत करा) हे बटण निवडा. त्यापुढे आपण जे कार्य बघाल त्याची नोंद होणार नाही, व आपला भूत-इतिहास उपलब्ध होणार नाही. ह्या मुळे आपले नंतरसाठी खुणित हे वैशिष्ट्य ही बंद होईल व नंतरसाठी खुणित यादी ही उपलब्ध होणार नाही याची नोंद असू द्या. अधिक माहितीसाठी कृपया Preferences FAQ याचा संदर्भ घ्या.

माझा इतिहास मला कुठे सापडेल?

जेव्हा आपण लाॅग्ड इन असाल, ("Hi (नमस्कार), [वापकर्ता नाव]!") हा स्वागतसंदेश निवडा व मेन्युतून "My History" (माझा इतिहास) बघा. जर आपण Dashboard (दर्शनीफळा) वर असाल, तर आपण संकेतदर्शनी तक्त्यावरून (जो पृष्ठाच्या वरील भागात सापडेल जेव्हा आपण मोबाईल वापरत असाल) "History" निवडा. जर आपल्या "Marked for Later" (नंतरसाठी खुणित) यादी मध्ये कार्य असतील, तर आपण ती यादी आपल्या इतिहास पृष्ठावरील "Marked for Later" हे बटण वापरून उपलब्ध करून घेऊ शकता. आपल्या गृहपृष्ठावर नंतरसाठी खुणित कार्यांची निवडक यादी असेल, तसेच "My History" साठी दुवा सुद्धा असेल. कृपया, या वैशिष्ट्या बद्दल अधिक माहितीसाठी "Mark for Later" (नंतरसाठी खुणित) हे बटण काय करते? याचा व पुढील प्रश्नांचा संदर्भ घ्या.

मी माझ्या इतिहासात बदल कसा करू शकतो?

आपण आपल्या इतिहासात जाऊन वैयक्तिक कार्य हटवा हे करू शकता, नोंदी पूर्ण साफ करू शकता, किंवा नोंद पूर्ण बंद करू शकता.

पूर्ण साफ करण्यासाठी, आपल्या इतिहास पृष्ठावर जा व "Clear History" (इतिहास साफ करा) बटण निवडा. हा पर्याय निवडल्यावर तो पूर्वव्रत होणार नाही व आपली Marked for Later (नंतरसाठी खुणित) यादी सुद्धा खोडला जाईल याची नोंद असू द्या.

इतिहास नोंद ही मूलत: समर्थित केलेली असते. बंद करण्यासाठी, आपल्या Preferences (प्राधान्ये) पृष्ठाच्या Miscellaneous (संकीर्ण) विभागात जा व "Turn on Viewing History" (इतिहास नोंद दिसणे चालु करा) याच्या शेजारचा चेकबॉक्स अनचेक करा, व नंतर पृष्ठाच्या खालील भागतील "Update" (अद्यतनीत करा) हे बटण निवडा. त्यापुढे आपण जे कार्य बघाल त्याची नोंद होणार नाही, व आपला भूत-इतिहास उपलब्ध होणार नाही. ह्या मुळे आपले Mark for Later (नंतरसाठी खुणित) हे वैशिष्ट्य ही बंद होईल व नंतरसाठी खुणित यादी ही उपलब्ध होणार नाही याची नोंद असू द्या. अधिक माहितीसाठी कृपया Preferences FAQ याचा संदर्भ घ्या.

जर आपण इतिहास नोंद परत चालू केलीत, तर आपल्या भूत इतिहास नोंदी व नंतरसाठी खुणित यादी परत उपलब्ध होईल. जर आपल्याला सर्व पूर्णत: हटवायचे असेल तर आपण नोंद बंद करण्याआधी इतिहास पूर्ण साफ केला आहे याची खात्री करा.

पूर्ण इतिहास न खोडतां मी काहीच कार्य कशी हटवू शकतो?

History (इतिहास) पृष्ठावर, आपल्याला हटवायची नोंद शोधा व ब्लर्ब मधील "Delete from History" (इतिहासातून हटवा) बटण निवडा. जर आपण ते कार्य Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादी मध्ये घातलेले असेल, तर आपल्या इतिहासातून हटविल्यावर ते या यादीतूनही हटवले जाईल.

आपण कार्य आपल्या इतिहासातून किंवा नंतरसाठी खुणित यादीमधून हटवू शकता जर ती गृहपृष्ठाच्या "Is it later already?" (हे नंतर आहे का?) या विभागात दिसत असतील तर. तसे करण्यासाठी, कार्य ब्लर्ब च्या खालचे "Delete from History" बटण निवडा. असे केल्याने ते कार्य आपल्या इतिहासातून तसेच नंतरसाठी खुणित यादीतून हटविले जाईल.

मी इतिहास नोंदींमध्ये शोधू शकतो का?

सध्यातरी इतिहास नोंदीत शोधणे शक्य नाही आणि सध्या तरी ते वैशिष्ट्य उपलब्ध करण्याची काहीही योजना नाही. आपण, आपल्या ब्राउजर चे शोध वैशिष्टय वापरून पृष्ठावरील मुख्य शब्द शोधू शकाल.

"Mark for Later" (नंतरसाठी खुणित) बटण काय करते?

जेव्हा आपण कार्याच्या पृष्ठावरील "Mark for Later" बटण वापरता, ते कार्य आपल्या Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादी मध्ये घातले जाईल. एकदा ते कार्य घातले गेले कि ते बटण "Mark as Read" (वाचले म्हणून खुणित) या मध्ये बदलेल.

आपली "Marked for Later" यादी हि हा आपल्या History (इतिहास) याचा उपविभाग आहे आणि ती आपल्याला कार्य जी आपण नंतर च्या वेळी परत पाहू इच्छिता ती खूण करून ठेवण्यास परवानगी देते. आपण लॉग्ड-इन असाल तर, आपल्या गृहपृष्ठावर अनियत निवडलेली तीन कार्य जाहिरात केली जातील, किंवा आपण ती यादी जिथे इतिहास दिसतो तिथे बघू शकत. अधिक माहिती साठी नंतरसाठी खुणित केलेली कार्य मी कशी बघू शकतो? याचा संदर्भ घ्या.

माझी इतिहास नोंद व नंतरसाठी खुणित यादी कोण बघू शकते?

फक्त आपणच आपली इतिहास नोंद व नंतरसाठी खुणित यादी बघू शकता. ऍडमिन सकट, ती इतर कोणालाही उपलब्ध नसते.

नंतरसाठी खुणित कार्य मी कशी बघू शकतो?

आपण आपली Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादी आपल्या History (इतिहास) पृष्ठावरून बघू शकता. जेव्हा आपण लाॅग्ड इन असाल, ("Hi (नमस्कार), [वापकर्ता नाव]!") हा स्वागतसंदेश निवडा व मेन्युतून "My History" (माझा इतिहास) बघा. जर आपण Dashboard (दर्शनीफळा) वर असाल, तर आपण संकेतदर्शनी तक्त्यावरून (जो पृष्ठाच्या वरील भागात सापडेल जेव्हा आपण मोबाईल वापरत असाल) "History" निवडा. आपल्या गृहपृष्ठावरून, आपण "Is it later already?" (हे नंतर आहे का?) या विभागातून "My History" दुवा निवडू शकता.

जेव्हा आपण इतिहास पृष्ठावर असाल, तेव्हा पृष्ठाच्या वरच्या भागातील "Marked for Later" बटण निवडा.

आपण नंतरसाठी खुणित कार्य थेट आपल्या गृहपृष्ठावरून निवडू शकता- जर ते अनियत व्युत्पन्न झालेल्या "Is it later already?" यादी मध्ये दिसत असेल- तिथे दिसत असलेली दुवा निवडून.

कार्यावर "Mark for Later" (नंतरसाठी खुणित) बटण का नसते?

नंतरसाठी खुणित वैशिष्ट्य, "Mark for Later" व "Mark as Read" (वाचले म्हणून खुणित) बटणांसकट, हे इतर वापरकर्त्याच्या कार्यावर फक्त तेव्हाच कार्यरत असते जेव्हा आपण लाॅग्ड-इन असाल व आपली इतिहास नोंद चालू असेल (मी माझी इतिहास निंद्य चालू किंवा बंद कशी करू शकतो?).

जर आपण लाॅग्ड-इन असाल व आपली इतिहास नोंद चालू असेल तर आपण कदाचित ते कार्य आधीच आपल्या नंतरसाठी खुणित यादीमध्ये घातलेले असू शकते. हे तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अध्याय किंवा कार्य बघा. जर आपण ते आधी यादी मध्ये घातलेले असेल तर अध्याय/कार्याच्या वरील किंवा खालील भागात “वाचले म्हणून खुणित” बटण असेल.

मी आत्ताच नंतरसाठी खुणित केलेले कार्य माझ्या यादी मध्ये का नाही?

नवीन नोंदी लगेचच आपल्या Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादी मध्ये दिसणार नाहीत, अर्धा तास लागू शकतो. नंतर परत तपासा आणि ते कार्य यादीवर दिसायला लागेल.

मी कार्य Mark for Later (नंतरसाठी खुणित) यादीतून कसे काढू शकतो?

कार्य Marked for Later यादीतून काढून टाकण्यासाठी, कार्याचे ब्राऊज पृष्ठ शोधा व पृष्ठाच्या वरील किंवा खालील भागातील "Mark as Read" (वाचले म्हणून खुणित) बटण निवडा. ते कार्य आपल्या नंतरसाठी खुणित यादीतून काढले जाईल, पण आपल्या इतिहासात राहील. आपली यादी अद्यतनीत व्हायला थोडा वेळ लागू शकतो याची नोंद असुद्या.

नंतरसाठी खुणित यादीतून आणि इतिहासातून कार्य काढून टाकण्यासाठी, आपण आपल्या नंतरसाठी खुणित पृष्ठाच्या ब्लर्ब मधील, किंवा आपल्या गृहपृष्ठावरील ब्लर्ब च्या खालच्या "Is it later already?" (हे नंतर आहे का?) विभागातून "Delete from History" (इतिहासातून हटवा) बटण निवडू शकता. नंतरसाठी खुणित यादीतून कार्य काढल्याने ते अप्लाय इतिहासातून काढले जाईल व उलटही तसेच होईल याची नोंद असुद्या.

मी माझी इतिहास नोंद साफ, पण Mark for Later (नंतरसाठी खुणित) तशीच कशी ठेऊ शकतो?

सध्या, या दोन गोष्टी जुडलेल्या असल्यामुळे Marked for Later यादी साफ केल्याशिवाय History (इतिहास) नोंद साफ करणे शक्य नाही.

मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.