मुक्त करणे म्हणजे काय?
मुक्त करणे हे एक लेखण हटविण्याचा पर्याय आहे जो आपण आपल्या अकाउंटशी निगडीत राहू इच्छित नाही.
मुक्त करणे आपल्याला निवडलेल्या कार्या पासून आपल्या सर्व ओळखण्यायोग्य डेटा कायमचे काढून टाकेल. डेटा कामातून दूर केला जातो, तसेच त्यांचे अध्याय, संबंधित श्रृंखला आणि कोणत्याही अभिप्राय प्रत्युत्तर आपण त्यावर सोडून दिले असतील, या उद्देशासाठी तयार केलेल्या orphan_account खात्यात हस्तांतरित केला जातो - Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह). कृपया लक्षात घ्या की हे कायम आणि अपरिवर्तनीय आहे — आपण कार्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, यात ते संपादित करण्याची किंवा हटविण्याची क्षमता समाविष्ट आहे आणि आपण ती पुन्हा प्राप्त करण्यास अक्षम आहात.
मुक्त करणे हे आपल्या खात्यातून आपल्या काही किंवा सर्व कृती दूर करण्यात असून, ते रसिकगटामधून एकदम दूर न ठेवण्याचा एक मार्ग आहे. आम्हाला आशा आहे की आपण आपल्या कार्याला AO3 मध्ये रहाण्यास अनुमती देण्यासाठी orphan_account अकाउंट वापरू शकाल, जरी आपण यापुढे त्यांच्याशी संबंद्ध ठेवू इच्छित नसाल किंवा आपल्या अकाउंटशी कनेक्ट करण्यास इछुक नसाल. भविष्यातील चाहत्यांना आनंद मिळवण्यासाठी अकोल्याची कार्ये AO3 द्वारे ठेवली जातील; विद्यमान वाचनखूण आणि दुवे खंडित होणार नाहीत.
त्याऐवजी आपले कार्य हटविण्याबद्दल अधिक माहितीसाठी, मी एक लेखण कसे हटवू? वर जा.
किंवा आपल्या मालिका संपादित करण्याच्या माहितीसाठी, मी एक लेखमाला कसे संपादित करू? वर जा.
कार्य मुक्त असताना काय माहिती काढून टाकली जाते?
- आपले वापरकर्ता नाव आणि / किंवा स्युडोआयडी कार्य आणि तिच्या सर्व अध्यायांवरून निषिद्ध काढले जाते.
- आपण कामावर सोडलेल्या कोणत्याही टिप्पण्यांवरून आपले वापरकर्ता नाव आणि / किंवा स्युडोआयडी काढून टाकले जाते.
मी माझे कार्य मुक्त कसे करू?
आपले कार्य मुक्त करण्याचे ठरविण्यापूर्वी आपण याची खात्री करा की आपण असे केल्याचे परिणाम तुम्हाला माहिती आहेत. अधिक माहितीसाठी मुक्त करणे काय आहे? पहा.
आपण हे करू शकता:
- कामाच्या Edit Page (संपादना पृष्ठावरून) Orphan Work (कार्य मुक्त करणे) बटणाचा वापर करून एक काम मुक्त करा. हे कसे करावे यावरील अधिक माहितीसाठी, मी कार्य संपादित कसे करू? येथे जा.
- एका लेखमाला मध्ये सारे कार्य मुक्त करायला, Series Index Page (लेखमाला पृष्ठावरून) किंवा Edit Series Page (लेखमाला संपादना पृष्ठावरून), Orphan Series (लेखमाला मुक्त करा) बटणाचा वापर करा. अधिक माहितीसाठी, लेखमाला वाविप्र पहा.
- आपल्या Dashboard (दर्शनी फळावरील) Preferences Page (प्राधान्ये पृष्ठावर), Orphan My Works (माझे कार्य मुक्त करा) बटण वापरून आपल्या सर्व कार्य मुक्त करा. अधिक माहितीसाठी, दर्शनीफळ वाविप्र पहा.
- आपल्या दर्शनी फळावर, Pseuds Page (स्युडोआयडी पृष्ठावरील), Orphan Works (कार्य मुक्त करणे) बटणाचा वापर करून एखाद्या विशिष्ट स्युडोआयडी अंतर्गत पोस्ट केलेल्या सर्व कार्य मुक्त करू शकता. अधिक माहितीसाठी स्युडोआयडी वाविप्र पहा.
आपण जे कार्य निवडले आहे ते मुक्त करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत:
- "Take my pseud off as well" (माझे स्युडोआयडी पण काढा)
- हा कार्य orphan_account खात्यात हस्तांतरीत केला जाईल जो Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चालू ठेवते आणि आयता orphan_account स्युडोआयडी च्या अंतर्गत संग्रहीत करुन ठेवला जाईल. कार्यातील निबंधात orphan_account वाचले जाईल.
- "Leave a copy of my pseud on" (माझ्या स्युडोआयडी ची एक प्रत ठेवा)
- कार्य AO3 द्वारे ठेवलेल्या orphan_account खात्यात हस्तांतरित केले जाईल, परंतु एक नवीन स्युडोआयडी त्याच नावासह तयार केले जाईल जे आपण कार्य तयार करण्यासाठी वापरलेला असेल. जर आपण फक्त मूळ आयता डूआयडी वापरत असाल तर तयार केलेला स्युडोआयडी आपल्या वापरकर्त्याचे नावाशी जुळेल. उदाहरणार्थ: जर आपण स्युडोआयडी किंवा आपले वापरकर्त्याचे नाव "awesomefangirl" वापरुन कार्य तयार केले असेल तर, कार्य मुत्त्क झाल्यानंतर, लेखकाच्या नामरेषावर "awesomefangirl (orphan_account)" दिसेल. स्युडोआयडी आपल्या AO3 खात्यात पुन्हा दुवा साधणार नसले तरी, एखादा वापरकर्ता विशिष्ट प्रकारचे स्युडोआयडी असल्यास आपण अद्याप निर्माता म्हणून ओळखू शकतात.
स्युडोआयडी बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया स्युडोआयडी वाविप्र वर जा.
दुसर्यासह सह-लेखित / सह-निर्माण केलेले कलाकृति मी मुक्त कसे करू?
आपले कार्य मुत्त्क करण्याचे ठरविण्यापूर्वी आपण याची खात्री करा की आपण असे केल्याचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. अधिक माहितीसाठी मुक्त करणे काय आहे? पहा.
आपण एकतर निर्माता म्हणून स्वत: ला काढू शकता किंवा आपल्या खात्याशी संबद्धता काढण्यासाठी कार्य मुत्त्क करू शकता. आपणास जे कोणी निवडावे, आपल्या सह-निर्मातीवर परिणाम होणार नाही आणि ती कलाकृतीचे सह-निर्माती राहील.
अधिक माहितीसाठी, मी माझे कार्य मुक्त कसे करू? वर जा.
एखाद्या कामाचा मुत्त्क होण्या नंतर मी माझे मत बदलल्यास मला माझे कार्य कसे परत मिळेल?
आपण करू शकत नाही — कार्य मुक्त करणे स्थायी आणि अपरिवर्तनीय आहे आपण आपल्या खात्यात कार्य पुन्हा संलग्न करण्याची कोणतीही पद्धत नाही आणि आम्ही आपल्यासाठी हे करू शकत नाही.
एक मुक्त कार्य Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये राहते, orphan_account खात्याशी संलग्न, आणि संपादित किंवा हटविले जाऊ शकत नाही.
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ह्यांचे उत्तर कुठे मेळु शकतात?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात ल्हिले आहेत. नियम आणि ध्येयधोरणविषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही (ज्ञात अडचणी) एकदा जरूर डोकावूनप हा. अजून काही मदत हवी असेल तर इथे (समिती-संवाद समिती) संपर्क साधा.
