माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कोणती माहिती असते?
डीफॉल्टनुसार, आपले खाते-रेखाचित्र आपले स्युडोआयडी , आपण Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चे सदस्य बनल्याची तारीख, आणि आपली वापरकर्त्यांची आयडी सूचीबद्ध करते. अन्य कोणतीही माहिती आवश्यक नसली, तरी आपल्या इच्छेनुसार आपण पुढील माहिती प्रविष्ट करू शकतात:
- Title (शीर्षक)
- हे म्हणजे तुम्हाला तुमच्या खाते-रेखाचित्रास जे कुठल नाव देऊ इच्छित असाल ते असतय. हे तुमच वापरकर्त्याचे नाव किंवा कुठलतर सुवचन असू शकतय.
- Location (स्थान)
- आपण राहात असलेले सद्य स्थान, रसिक संदर्भ जसे की "हॉगवर्ट्स" किंवा "पोकेबॉलच्या आत", किंवा आपल्या आवडीची कुठलीतर दुसरी गोष्ट प्रविष्ट करू शकतात.
- Date of Birth (जन्म तारीख)
- येथे, आपण आपली जन्म तारीख प्रविष्ट करू शकता. ही माहिती योग्य पद्धतीत प्रदर्शित होण्या साठी, आपल्याला ह्याच्यात एक दिवस, महिना, आणि वर्ष करावे लागतील. जर आपल्याला आपल्या जन्म तारखेतला थोडाच भाग समाविष्ट करणे पसंत पडतय, तर त्याऐवजी आपण ही माहिती About Me (माझ्या बद्दल) उपशाखेत प्रविष्ट करू शकतात. जर आपण एक दिवस, महिना, आणि वर्ष घातलं असेल, आणि आपल्या Preferences (प्राधान्यखुणां) मध्ये "Show my date of birth to other people" (इतरांना माझी जन्मतारीख प्रदर्शित करा) निवडले असल्यास, आपल्या खाते-रेखाचित्रवर आपली जन्म तारीख दिसून येईल. अजून माहिती साठी, कृपया माझ्या खाते-रेखाचित्रावर कोणती वैयक्तिक माहिती सूचीबद्ध आहे हे मी कसे बदलू? हे पहा.
- Email Address (ईमेल पत्ता)
- डीफॉल्टनिसार, आपला ईमेल आपल्या खाते-रेखाचित्रावर नाही दिले जात. प्राधान्यखुणां मध्ये आपण "Show my email address to other people" (इतरांना माझा ईमेल पत्ता प्रदर्शित करा) निवडू शकता आणि मग आपल्या खात्याशी संबंधित ईमेल तुमच्या खते-रेखाचित्रावर दिसून येईल. अजून माहिती साठी, कृपया माझ्या खाते-रेखाचित्रावर कोणती वैयक्तिक माहिती सूचीबद्ध आहे हे मी कसे बदलू? आणि मी माझ्या खात्याशी संबंधित ईमेल कसे बदलू? हे बघून घ्या.
- About Me (माझ्या बद्दल)
- येथे, आपण स्वतःबद्दलची माहिती प्रविष्ट करू सकता. ह्यात तुमचे सर्वनाम, तुम्ही कोणत्या फॅन्डममध्ये आहात, आपले आपल्या कृतींच्या रीमिक्स, अनिवादित कृती, आणि पॉडफिक बाबतचे धोरण, किंवा आपण इतर कोठे ऑनलाइन असता ही सर्व माहिती समाविष्ट असू सकते. आपल्या "माझ्याबद्दल" मध्ये मर्यादित HTML स्वरूपनासह जास्तीत जास्त २००० वर्ण असू शकतात. AO3 वरती परवानगी असलेल्या HTML स्वरूपनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी AO3 वरील HTML बघून घ्या.
हे लक्षात ठेवा की आपले खाते-रेखाचित्र उर्वरित साइट प्रमाणेच नियम आणि ध्येयधोरणे च्या अधीन आहे. कृपया AO3 वरती काय करायची परवानगी आहे व काय नाही याची जाणीव ठेवा. अजून माहिती साठी कृपया नियम आणि ध्येयधोरणे व नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र हे पहा.
मी माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कसे प्रवेश करू?
तुमच्या खाते-रेखाचित्रा मध्ये प्रवेश करण्या साठी:
- लॉग इन करा, मग "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" निवडा. त्यानंतर मेनू मध्ये "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) दाबून तुमच्या दर्शनी फळाला जावा. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्राच्या प्रतिमेवर दाबून पण पूर्ण करू सकता.
- भ्रमण यंत्रावरती पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला असलेल्या मेनूमधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा. तुमच्या खाते-रेखाचित्र पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेल्या बटणांमधून, तुम्ही:
- नवीन कृती पोस्ट करू शकता. अजून माहिती साठी कृपया मी नवीन कृती कशी पोस्ट करू? हे पहा.
- एकाच वेळी अनेक कृती संपादित करू शकता. अजून माहिती साठी कृपया मी एकाच वेळी अनेक कृती कशी संपादित करू किंवा हटवू? हे पहा.
- स्वतःचे वर्गणीदार होऊ शकता किंवा स्वतःची वर्गणी रद्द करू शकता. अजून माहिती साठी कृपया मी एका वापरकर्त्याचा वर्गणीदार कसा होऊ किंवा ती वर्गणी कशी रद्द करू? हे पहा.
- तुमच्याकडे असल्यास, तुमच्या आमंत्रणांमध्ये प्रवेश करू शकता. अजून माहिती साठी कृपया आमंत्रण वाविप्र हे पहा.
तुमच्या खाते-रेखाचित्र पृष्ठाच्या तळाशी असलेल्या बटनांमधून, तुम्ही हे देखील करू शकता:
- एकाच वेळी अनेक कृती संपादित करू शकता.
- तुमच खाते-रेखाचित्र संपादित करू शकता. अजून माहिती साठी कृपया मी माझे खाते-रेखाचित्र कसे संपादित करू? हे पहा.
- तुमच्या प्राधान्यखुणा निवडून निश्चित करू शकता. अजून माहिती साठी कृपया प्राधान्यखुणा वाविप्र हे पहा.
- तुमचे स्युडोआयडी, ह्यांच नियंत्रण करू शकता. अजून माहिती साठी कृपया स्युडोआयडी वाविरप्र हे पहा.
- तुमचे खाते हटवू शकता. अजून माहिती साठी कृपया मी माझे खाते कसे हटवू? हे पहा.
मी माझे खाते-रेखाचित्र कसे संपादित करू?
तुमचे खाते-रेखाचित्र संपादित करण्या साठी:
- लॉग इन करा, मग "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" निवडा. त्यानंतर मेनू मध्ये "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) दाबून तुमच्या दर्शनी फळाला जावा. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्राच्या प्रतिमेवर दाबून पण पूर्ण करू सकता.
- भ्रमण यंत्रावरती पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला असलेल्या मेनूमधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- तुमच्या खाते-रेखाचित्र माहिती खाली असलेलं "Edit My Profile" (माझ्या खाते-रेखाचित्राच संपादन) निवडा.
- माझ्या खाते-रेखाचित्राच संपादन पत्रामध्ये जे पाहिजे ते बदल करा, आणि ते बदल जतन करण्यासाठी "Update" (अद्यतन) बटन दाबा.
तुमच्या खाते-रेखाचित्रा मध्ये कसल्या प्रकारची माहिती समाविष्ट असतते हे जाणून घेण्या साठी माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कोणती माहिती असते? हे पहा.
तुमच्या माझ्या खाते-रेखाचित्राच संपादन पत्राच्या शीर्षस्थानी असलेल्या बटणांमधून, तुम्ही हे देखील करू शकता:
- तुमचं आयता स्युडोआयडी व चित्रखूण संपादित करू शकता.
- तुमचे वापरकर्त्याचे नाव बदलू शकता. तुमचे वापरकर्त्याचे नाव बदलायचा आधी कृपया माझ्या खात्यावर मी माझे वापरकर्त्याचे नाव बदल्याचा काय परिणाम होतो? हे बघून घ्या.
- तुमचा संकेतशब्द बदलू शकता.
- तुमच्या Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खात्याशी संबंधित ईमेल पत्ता बदलू शकता.
स्युडोआयडी बद्दल अधिक माहिती हवी असेल, तर तुम्ही कृपया स्युडोआयडी वाविप्र हे पहा. तुमच वापरकर्त्याच नाव, संकेतशब्द, किंवा ईमेल पत्ता कसा बदलायचा, ह्याच्या बद्दल अधिक माहिती साठी आपण कृपया खाते वाविप्र हे पहा.
मी माझं खाते-रेखाचित्र कसं हटवू?
Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरती ज्यांचे-ज्यांचे खाते आहेत त्या सर्वांना साठी आपोआप एक खाते-रेखाचित्र निर्माण केले जाईल. तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्र वरील वैकल्पिक माहिती ते खाते-रेखाचित्र संपादित करून हटवू शकता. तुमच्या खाते-रेखाचित्र मध्ये कोणती वैकल्पिक माहिती समाविष्ट असू शकते, हे जाणून घेण्यासाठी आपण कृपया माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कोणती माहिती असते? हे पहा, आणि त्या माहिती मध्ये बदल कसे घडवून आणायचे, हे जाणून घेण्यासाठी आपण कृपया मी माझे खाते-रेखाचित्र कसे संपादित करू? हे पहा.
जर तुम्हाला कुठली तर एक स्युडोआयडी पूर्णपणे हटवायची असेल, तर तुम्ही कृपया मी एक स्युडोआयडी कशी हटवू? हे पहा.
जर तुम्हाला यापुढे AO3 वरती तुमचे खाते नको असेल, तर आपण कृपया मी माझे खाते कसे हटवू? हे पहा.
मी इतर लोकांच्या खाते-रेखाचित्र मध्ये कसे प्रवेश करू?
एका वापरकर्त्याच्या खाते-रेखाचित्रा मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी:
- तुम्हाला जिथे दिसते तिथे त्यांच्या स्युडोआयडी वर दाबा. ही स्युडोआयडी तुम्हाला एका कृतीच्या पृष्ठावरती कृतीच्या शीर्षकाच्या खाली असलेल्या कृतीच्या सारांश मध्ये शीर्षकाच्या बाजूला, एका टिप्पणी मध्ये, एका टाळ्यांच्या सूची मध्ये, साईट वरती वापरकर्त्यांसाठी शोध केल्यावर शोध परिणाम सूची मध्ये, किंवा इतर ठिकाणी सापडेल. मी प्रक्रिया तुम्हाला त्या वापरकर्त्याच्या दर्शनी फळाला घेऊन जाईल.
- भ्रमण यंत्रांच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला जो मेनू असतो त्यामधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
माझ्या खाते-रेखाचित्र वरील माहिती कोणाला उपलब्ध असेल?
तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्र वरती जी कोणती माहिती देता ती माहिती सर्वांना उपलब्ध असते, त्यांच्या कडे Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरती खाते असो किंवा नसो. परंतु, डीफॉल्टनुसार केवळ तुमची स्युडोआयडी, तुम्ही AO3 चे सदस्य जेव्हा बनला ती तारीख, व तुमची वापरकर्त्यांची आयडी ह्यात समाविष्ट होते. तुम्ही तशी परवानगी दिली तरच कुठली तर अतिरिक्त माहिती तुमच्या खाते-रेखाचित्रावरती दाखवली जाईल. तुमच्या कडे अजून कुठले पर्याय आहेत हे जाणून घेण्यासाठी, कृपया माझ्या खाते-रेखाचित्रा मध्ये कोणती माहिती असते? हे पहा.
चित्रखूण म्हणजे काय?
चित्रखूण म्हणजे एक १०० गुणिले १०० पिक्सेल चित्र जे तुमचं Archive of Our Own - AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरती प्रतिनिधित्व करतय. तुमच्या dashboard (दर्शनी फळा), Profile (खाते-रेखाचित्र), व Pseuds (स्युडोआयडी) च्या पृष्ठां वरती, साईट वरती कोणत्या तर वापरकर्त्यासाठी शोध केल्यावर शोध परिणाम पृष्ठा वरती, आणि तुम्ही कुठली तर टिप्पणी दिली तर त्याच्या बाजूला ही चित्रखूण प्रदर्शित केली जाईल. चित्रखूणांसाठी संबंधित वैकल्पिक मजकूर ची व्यवस्था आहे. हे वैकल्पिक मजकूर आपल्याया एका प्रतिमेचं मजकूर विकल्प तेव्हा देतय जेव्हा ती प्रतिमा प्रदर्शित होत नसते किंवा जेव्हा एक वापरकर्ता AO3 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रवेशयोग्यता साधनांचा वापर करतो.
माझ्याकडे किती चित्रखूणा असू शकतात?
आपल्याकडे असलेल्या प्रत्येक स्यूडोआयडी साठी आपण एक चित्रखूण अपलोड करू शकता. हे कसे करावे या सूचनांसाठी मी माझे चित्रखूण कसे अपलोड किंवा बदलू? चा संदर्भ घ्या.
चित्रखूणेवर कोणते प्रतिबंध आहेत?
चित्रखूण अपलोड करताना तुम्हाला थोड्या प्रतिबंधांचा आदर करावा लागेल.
- परिमाण:
- चित्रखूणचा आकार १०० गुणिले १०० पिक्सेल असणे आवश्यक आहे. आपण मोठ्या किंवा लहान प्रतिमा अपलोड करू शकता परंतु त्यांचा आकार १०० गुणिले १०० मध्ये बदलला जाईल हे लक्षात असुद्या. चौरस नसलेल्या प्रतिमा विकृत आकारात प्रदर्शित केले जातील..
- आकार:
- चित्रखूण फाइल चा आकार ५१२ किलोबाइटपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
- स्वरूप:
- प्रतिमा jpeg, png, किंवा gif स्वरूपात असणे आवश्यक आहे.
- विषय सामग्री:
- आमच्या नियम आणि ध्येयधोरणे नमूद करतात की "चित्रखूणा सर्वसामान्य प्रेक्शकांच्या दृश्यासाठी योग्य असायला पाहिजेत. त्यामध्ये जननेंद्रिय नग्नता किंवा स्पष्ट लैंगिक क्रियेचे वर्णन असू नये." कृपया नियम आणि ध्येयधोरणे आणि नियम आणि ध्येयधोरणे वाविप्रचा सदस्य चित्रखुणांचे विभाग पहा.
- आपण एका स्युडोआयडीसाठी एक चित्रखूण अपलोड करू शकता. स्यूडोआयडीबद्दल आणि त्यांना कसे तयार करावे किंवा कसे संपादित करावे याबद्दल अधिक माहितीसाठी स्यूडोआयडी वाविप्र हे पहा.
- स्वामित्व:
- चित्रखूण आमच्या स्वामित्व धोरणाच्या अधीन आहेत. अधिक माहितीसाठी आमच्या नियम आणि ध्येयधोरणेच्या स्वामित्व आणि ट्रेडमार्क विभागाचा संदर्भ घ्या.
मी माझी चित्रखूण कशी अपलोड करू किंवा बदलू?
कोणत्याही स्युडोआयडीसाठी चित्रखूणेचा भर करण्यासाठी किंवा ती बदलण्यासाठी, आपण आपल्या यंत्रावरनं एका नवीन प्रातिमेची फाईल अपलोड करू शकता:
- लॉग इन करा आणि आपल्या दर्शनी फळावर जा. ही प्रतिक्रीया तुम्ही "Hi (नमस्कार), [सदस्यनाम]!" हे अभिवादन निवडून आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) निवडून पूर्ण करू शकता, किंवा आपल्या खाते-रेखाचित्राची प्रतिमा निवडून पूर्ण करू शकता.
- भ्रमण यंत्रांच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला जो मेनू असतो त्यामधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- तुमच्या खाते-रेखाचित्र माहितीच्या खाली "Manage My Pseuds" (माझे स्यूडोआयडी व्यवस्थापित करा) असलेला पर्याय निवडा.
- आपण अपलोड किंवा चित्रखूण बदलू इच्छित असलेले चिन्ह शोधा आणि "Edit" (संपादन) बटण निवडा. आपल्याला स्यूडोआयडी तयार करण्यात मदतीची आवश्यकता असल्यास मी नवीन स्यूडोआयडी कसे तयार करू? हे पहा.
- "Upload a new icon" (नवीन चित्रखूण अपलोड करा) शीर्षकाच्या बाजूचं बटन दाबा. तुम्ही वापरणाऱ्या ब्राऊजर अनुसार हे बटन "Browse" (ब्राऊज), "Choose File" (फाईल निवडा), किंवा ह्या सारखं काहीतरी असू शकतंय.
- तुमच्या यंत्रावर इच्छित चित्रखूणशोध आणि मग ती निवडा. लक्षात घ्या की प्रतिमा आपल्या यंत्रावर असणे आवश्यक आहे; आपण इतरत्र होस्ट केलेली चित्रखूण अपलोड किंवा दुवेने जोडू नाही शकत.
- आपण इच्छित असल्यास "Icon alt text:" (चित्रखूण वैकल्पिक मजकूर:) फील्डमध्ये वर्णन भरू शकता. वैकल्पिक मजकूरचा उद्देश प्रतिमेस मजकूर विकल्प प्रदान करणे आहे, जेव्हा प्रतिमा प्रदर्शित होत नसते किंवा आपल्या खाते-रेखाचित्रा मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी एका वापरकर्ता प्रवेशयोग्यता साधनांचा वापर करत असतो. चित्रखूण वैकल्पिक मजकूर २५० वर्णांपर्यंत मर्यादित आहे. कारण वापरकर्त्यांना एकतर वैकल्पिक मजकूर किंवा चित्रखूण सादर करू शकतो, पण दोन्ही नाही, त्यामुळे कृपया प्रतिमेच्या निर्मात्याला श्रेय देताना वैकल्पिक मजकूरचा वापर करू नका.
- आपण इच्छित असल्यास "Icon comment text" (चित्रखूण टिप्पणी मजकूर) फील्ड मध्ये एखादी विशेषता किंवा इतर कोणतीही टिप्पणी, ५० वर्णांच्या मर्यादेपर्यन्त भरू शकता. सध्य-स्थितीत, या क्षेत्रात जे काही प्रविष्ट केले आहे ते साईटवर दिसत नाही.
- फॉर्मच्या तळाशी असलेले "Update" (अद्यतनित करा) निवडा.
- आपली नवीन प्रतिमा आता आपल्या स्युडोआयडीच्या बाजूला दिसून याला पाहिजे, व "Pseud was successfully updated" (स्यूडोआयडी यशस्वीपणे अद्यतनित झाली) हा पुष्टीकरण संदेश पण प्रदर्शित व्हायला हवा.
आपण काय अपलोड करू शकता व काय नाहीं करू शकत याबद्दल माहितीसाठी चित्रखूणवर कोणते प्रतिबंध आहेत? हे पहा.
मी माझी चित्रखूण कशी हटवू?
आपल्या स्युडोआयडीसाठी असलेली चित्रखूण हटविण्यासाठी:
- लॉग इन करा आणि आपल्या दर्शनी फळावर जा. ही प्रतिक्रीया तुम्ही "Hi (नमस्कार), [सदस्यनाम]!" हे अभिवादन निवडून आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) निवडून पूर्ण करू शकता, किंवा आपल्या खाते-रेखाचित्राची प्रतिमा निवडून पूर्ण करू शकता.
- भ्रमण यंत्रांच्या पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला जो मेनू असतो त्यामधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा.
- पृष्ठाच्या तळाशी असलेला "Manage My Pseuds" (माझे स्यूडोआयडी व्यवस्थापित करा) पर्याय निवडा.
- ती स्यूडोआयडी शोधा ज्याची चित्रखूण तुम्हाला हटवायची आहे आणि मग "Edit" (संपादन) निवडा.
- "Icon" (चित्रखूण) फील्डवर जाऊन "Delete your icon and revert to our default" (आपले चित्रखूण हटवा आणि आमच्या डीफॉल्टवर परत या) चेकबॉक्स निवडा.
- आपण निश्चित असल्यास, फॉर्मच्या तळाशी असलेला "Update" (अद्यतनित करा) पर्याय निवडा.
आपले चित्रखूण आमच्या डीफॉल्टवर परत येईलः Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) लोगोची ग्रेस्केल आवृत्ती.
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.
