Archive FAQ > विस्तारासाठी कल्पनाबीज

विस्तारासाठी कल्पनाबीज हे काय आहे?

विस्तारासाठी कल्पनाबीज हे एक आव्हान आहे ज्याच्यात सहभागी एक किंवा जास्त रसिककृती लेखनबीज सादर करू शकतात जे बाकीचे सहभागी पूर्ण करायचं ठरवू शकतात.

मला विस्तारासाठी कल्पनाबीज कुठे मिळेल?

विस्तारासाठी कल्पनाबीज हे शोधायला:

  1. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या कोणत्याही मूलभूत पृष्ठमांडणी वापरणाऱ्या पृष्ठावर सर्वात वर (साइट लोगो च्या खाली) दिसणारं मेनू मधून "Browse" (ब्राऊज) आणि मग "Collections" (संकलन) निवडा.
  2. तिथुन, गणकयंत्रावर उजव्या बाजुला दिसणाऱ्या गाळणी मधून, संकलन प्रकार मध्ये "Prompt Meme Challenge" (विस्तारासाठी कल्पनाबीज आव्हान) निवडा, किंवा मोबाइल वर पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारा "Filters" (गाळणी) बटण निवडा. जर तुम्हाला एका निश्चित विस्तारासाठी कल्पनाबीज चं नाव माहीत असेल तर, तुम्ही त्याचा शोध "Filter by title or name" (शीर्षक किंवा नावाची गाळणी लावून निवडणे) ह्याच्या खाली नाव प्रविष्ट करून शोधू शकता.

जर तुम्ही एका विस्तारासाठी कल्पनाबीज मधले लेखनबीज प्रस्तुत केले किंवा कल्पनाविस्तार करायला दावा केला आहे तर, त्याला शोधण्याचा एक आणखीन सोप्पा उपाय आहे. आणखीन माहिती साठी कृपया हे बघा मी ज्या विस्तारासाठी कल्पनाबीज साठी नोंद केली आहे ती मला कुठे मिळेल ?

मी ज्या विस्तारासाठी कल्पनाबीज साठी नोंद केली आहे ती मला कुठे मिळेल ?

जर तुम्ही एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये लेखनबीज प्रस्तुत केले आहेत तर :

  1. लॉग इन करून "Hi, [सदस्यनाम]!" आणि मग मेनू मधून "My Sign-ups" (माझ्या नोंदी) हे निवडून तुम्ही नोंदी पृष्ठावर पोचाल.
  2. तुमच्या नोंदीच्या यादी मधून तुम्ही शोधत असलेलं विस्तारासाठी कल्पनाबीज चं नाव निवडा.
  3. पृष्ठाच्या डाव्या बाजुला असलेल्या दर्शनी फळ मेनू मधून (किंवा जर मोबाइल वर असाल तर सर्वात वर) "My Prompts" (माझे लेखनबीज) निवडा.

जर तुम्ही एक विस्तारासाठी कल्पनाबीज मधलं एक लेखनबीज वर कल्पनाविस्तार करणे दावा केलेला आहे तर:

  1. लॉग इन करून "Hi, [सदस्यनाम]!" आणि मग मेनू मधून "My Dashboard" (माझे दर्शनीफळ) हे निवडून, किंवा तुमची खात्याचे चित्र निवडून तुमच्या दर्शनी फळावर जा.
  2. पृष्ठाच्या डाव्या बाजुला (मोबाइल मध्ये सर्वात वर) च्या मेनू मधून "Claims (#)" (कल्पनाविस्तार (#)) हे निवडा.
  3. मुलभूतरित्या नी, हे तुम्हाला तुमच्या अपूर्ण राहलेल्या कल्पनाविस्तार कडे घेऊन जाईल. तुमचे पूर्ण केलेले कल्पनाविस्तार बघायला पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं "Fulfilled Claims" (पूर्ण कल्पनाविस्तार) बटण निवडा.
  4. दिसणाऱ्या सारांश मधून तुमच्या कल्पनाविस्तार लेखन बीज च्या संकलन चं नाव निवडा.

मी बिना एका AO3 खात्याचं विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी होऊ शकते का?

नाही. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरच्या एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये भाग घ्यायला तुम्हाला एका खात्याची गरज आहे. एक खातं कसं बनवायचं ह्याच्याबद्दल माहिती साठी, हे बघा: मी एक खातं कसं बनवू?

विस्तारासाठी कल्पनाबीज चालवणारे लोकं तुम्हाला एक आमंत्रण देऊ शकतात, किंवा तुम्ही थेट आमंत्रणाची विनंती करू शकता Invite Requests (आमंत्रण विनंती) च्या पृष्ठावर जाऊन तुमचं ईमेल देऊन. आणखीन माहिती साठी, कृपया हे बघा: आमंत्रण वाविप्र.

जर तुम्ही एक विस्तारासाठी कल्पनाबीज चालवत आहात आणि तुम्हाला भाग घेणाऱ्या लोकां कडणं आमंत्रणाची विनंती करून घ्यायची आहे तर, कृपया हे बघा मी एक आव्हान चालवत आहे तर त्याच्यासाठी मी आमंत्रण विनंती कशी करू?

मी एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये लेखनबीज कसं जोडु?

एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी व्हायला तुमच्याकडे एक Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चं खातं असायला पाहिजे. आणखीन माहिती साठी, कृपया हे बघा मी बिना एका AO3 खात्याचं विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी होऊ शकते का? .

जेव्हा नोंदी उघडल्या जातील, तेव्हा एक Prompt Form (लेखनबीज फॉर्म) ची दुवा विस्तारासाठी कल्पनाबीज च्या दर्शनी फळावरच्या डाव्या बाजुला (मोबाइल वर सर्वात वर) असलेल्या मेनू मध्ये दिसेल. सूचनेनुसार फॉर्म भरा आणि मग "Submit" (प्रवेश करा) निवडा. अतिरिक्त सूचना किंवा आवश्यकतांसाठी विस्तारासाठी कल्पनाबीज ची खाते-रेखाचित्र पृष्ठ आणि नोंद फॉर्मच्या सर्वात वर तपासण्याचे सुनिश्चित करा आणि आपले लेखनबीजतयार करताना त्यांना लक्षात ठेवा!

मी एका विस्तारासाठी कल्पनाबीजमध्ये अनामिक लेखनबीज कसे जोडु शकते?

एका विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी व्हायला तुमच्याकडे एक Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चं खातं असायला पाहिजे. आणखीन माहिती साठी, कृपया हे बघा मी बिना एका AO3 खात्याचं विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये सहभागी होऊ शकते का? .

जेव्हा नोंदी उघडल्या जातील, तेव्हा एक Prompt Form (लेखनबीज फॉर्म) ची दुवा विस्तारासाठी कल्पनाबीज च्या दर्शनी फळावरच्या डाव्या बाजुला (मोबाइल वर सर्वात वर) असलेल्या मेनू मध्ये दिसेल. सूचनेनुसार फॉर्म भरा आणि मग "Submit" (प्रवेश करा) निवडा. अतिरिक्त सूचना किंवा आवश्यकतांसाठी विस्तारासाठी कल्पनाबीज ची खाते-रेखाचित्र पृष्ठ आणि नोंद फॉर्मच्या सर्वात वर तपासण्याचे सुनिश्चित करा आणि आपले लेखनबीजतयार करताना त्यांना लक्षात ठेवा!

एक लेखनबीज ला अनामिक करायला, "Semi-anonymous Prompt?" (अर्ध-अनामिक लेखनबीज?) च्या बाजुला दिसणारं बॉक्स टिक करा. जे लेखन बीज हे बॉक्स टिक करून प्रस्तुत केले जातील ते "by Anonymous" (अनामिक द्वारे) अशे दिसतील.

जर तुम्हाला तुमचं सदस्यनाम तुमच्या लेखनबीज सोबत जोडायचं असेल तर, "अर्ध-अनामिक लेखनबीज?" च्या बाजुला दिसणारं बॉक्स टिक नका करू.

एकदा आपण फॉर्म भरला आणि आपण आपला लेखनबीज अनामिक ठेवू इच्छिता की नाही हे निवडल्यानंतर, "Submit" (प्रवेश करा) निवडा.

कृपया लक्षात घ्या की अनामिक वैशिष्ट्य पूर्णपणे सुरक्षित नाही. वापरकर्ते अद्याप त्यांनी तयार केलेल्या लेखनबीज द्वारे एकमेकांच्या ओळखीचा अंदाज लावू शकतात.

मी माझे लेखनबीज संपादित कसं करू?

तुमचे लेखनबीज संपादित करायला:

  1. लॉग इन करून पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं "Hi, [सदस्यनाम]!" मेनू मधून "My Sign-ups" (माझ्या नोंदी) हे निवडा. जर तुम्ही तुमच्या दर्शनी फळावर आहात तर तुम्ही नॅविगेशन साइडबार (मोबाइल वर पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं) मधून "Sign-ups (#)" (नोंदी (#)) पण निवडू शकता.
  2. तुम्हाला जी नोंद संपादित करायची आहे त्याच्या बाजुला किंवा खाली दिसणारं "Edit Sign-up" (नोंद संपादित करा) हे बटण निवडा. हे तुम्हाला एका फॉर्म ला घेऊन जाईल जिकडे तुम्ही तुमचं लेखनबीज संपादित करू शकता.
  3. एकदा तुम्ही हवे तसे बदल करून झाले के पृष्ठाच्या खाली दिसणारं "Update" (अद्यतन करा) हे बटण निवडा.
    • आधीपासून कल्पनाविस्तार करायला दावा केलेली लेखनबीज संपादित करताना कृपया सावधगिरी बाळगा. तुम्ही आधीच दावा केलेला एखादा लेखनबीज संपादित केल्यास कोणताही संदेश दिला जाणार नाही आणि दावेदाराला त्यांच्या लेखनबीज संपादित केल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा इशारा मिळणार नाही.

तुम्ही वैयक्तिक लेखन बीज पण संपादित करू शकता:

  1. लॉग इन करून पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं "Hi (नमस्कार), [सदस्यनाम]!" मेनू मधून "My Sign-ups" (माझ्या नोंदी) हे निवडा.
  2. विस्तारासाठी कल्पनाबीज चे नाव निवडून त्यांच्या दर्शनी फळावर जा.
  3. ह्या विस्तारासाठी कल्पनाबीज च्या तुमच्या वर्तमान लेखनबीज ला संपादित करण्यासाठी "My Prompts" (माझे लेखनबीज) हे निवडा .
  4. तुम्हाला जे लेखनबीज संपादित करायचं आहे त्याच्या सारांश च्या खाली असलेलं "Edit Prompt" (लेखनबीज संपादित करा) हे निवडा.
  5. एकदा तुमचे बदल करून झाले की पृष्ठाच्या खाली असलेला "Update" (अद्यतन) बटण निवडा.
    • आधीपासून कल्पनाविस्तार करायला दावा केलेली लेखनबीज संपादित करताना कृपया सावधगिरी बाळगा. तुम्ही आधीच दावा केलेला एखादा लेखनबीज संपादित केल्यास कोणताही संदेश दिला जाणार नाही आणि दावेदाराला त्यांच्या लेखनबीज संपादित केल्याबद्दल कोणत्याही प्रकारचा इशारा मिळणार नाही.

जोपर्यंत नोंदी उघड्या आहेत तो पर्यन्त तुम्ही केव्हाही तुमच्या लेखनबीज संपादित किंवा उडवू शकता. मालक आणि नियंत्रक त्यांचे लेखनबीज कधीही संपादित किंवा उडवू शकतात. लेखनबीज कसे उडवायचे ह्याच्यावर आणखीन माहीत साठी, हे बघा मी माझे लेखन बीज कसे उडवू?

मी माझे लेखन बुज कसे उडवू?

तुमचे सगळे लेखनबीज उडवायला:

  1. लॉग इन करून पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं "Hi, [सदस्यनाम]!" मेनू मधून "My Sign-ups" (माझ्या नोंदी) हे निवडा. जर तुम्ही तुमच्या दर्शनी फळावर,आहात तर तुम्ही नॅविगेशन साइड बार (मोबाइल वर पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं) मधून "Sign-ups (#)" (नोंदी (#)) हे पण निवडू शकता.
  2. आव्हानाच्या यादी मधून तुमच्या विस्तारासाठी कल्पनाबीज चं नाव शोधा.
  3. विस्तारासाठी कल्पनाबीज च्या बाजुला किंवा खाली असलेलं "Delete Sign-up" (नोंद उडवा) हे निवडा.
  4. या नोंदी मधील सर्व लेखनबीज उडवण्याच्या आपल्या निर्णयाची पुष्टी करण्यास एक संवाद बॉक्स दिसेल. आपण पुढे जावू इच्छित असल्यास, निवडा "OK" (ठीक आहे).
    • आधीपासून कल्पनाविस्तार करायला दावा केलेली लेखनबीज उडवताना कृपया सावधगिरी बाळगा. तुम्ही आधीच दावा केलेला एखादा लेखनबीज उडवल्यास कोणताही संदेश दिला जाणार नाही आणि दावेदाराला त्यांच्या लेखनबीज उडवण्या बद्दल कोणत्याही प्रकारचा इशारा मिळणार नाही.

वैयक्तिक लेखनबीज उडवायला:

  1. लॉग इन करून पृष्ठाच्या सर्वात वर दिसणारं "Hi, [सदस्यनाम]!" मेनू मधून "My Sign-ups" (माझ्या नोंदी) हे निवडा.
  2. विस्तारासाठी कल्पनाबीज च्या दर्शनी फळावर जायला त्याचं नाव निवडा.
  3. ह्या विस्तारासाठी कल्पनाबीज च्या तुमच्या वर्तमान लेखनबीज बघायला "My Prompts" (माझे लेखनबीज) हे निवडा.
  4. जे लेखन बीज तुम्हाला उडवायची इच्छा आहे त्याच्या सारांश च्या खाली असलेलं "Delete Prompt" (लेखनबीज उडवा) हे निवडा.
  5. या नोंदी मधील सर्व लेखनबीज उडवण्याच्या आपल्या निर्णयाची पुष्टी करण्यास एक संवाद बॉक्स दिसेल. आपण पुढे जावू इच्छित असल्यास, निवडा "OK".
    • आधीपासून कल्पनाविस्तार करायला दावा केलेली लेखनबीज उडवताना कृपया सावधगिरी बाळगा. तुम्ही आधीच दावा केलेला एखादा लेखनबीज उडवल्यास कोणताही संदेश दिला जाणार नाही आणि दावेदाराला त्यांच्या लेखनबीज उडवण्या बद्दल कोणत्याही प्रकारचा इशारा मिळणार नाही.

जर तुम्ही किमान आवश्यक संख्येपेक्षा जास्त तयार केले असेल तरच तुम्ही वैयक्तिक लेखनबीज उडवू शकता (उदा. विस्तारासाठी कल्पनाबीज तुम्हाला दोन ते तीन लेखनबीज तयार करण्याची परवानगी देते आणि तुम्ही तीन तयार करता). तुम्ही फक्त किमान क्रमांकासाठी नोंद केले असल्यास, तुम्ही तुमचे सर्व लेखनबीज एकाच वेळी उडवू शकता किंवा त्याऐवजी तुमचे लेखनबीज संपादित करू शकता. आणखीन माहिती साठीमी माझे लेखनबीज संपादित कसं करू? हे बघा.

जोपर्यंत नोंदी उघड्या आहेत तो पर्यन्त तुम्ही केव्हाही तुमच्या लेखनबीज संपादित किंवा उडवू शकता. मालक आणि नियंत्रक त्यांचे लेखनबीज कधीही संपादित किंवा उडवू शकतात.

मी लेखनबीजचा कल्पनाविस्तार कसे करू?

विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये भाग घेण्यासाठी आपल्या कडे आपलं स्वतःचा Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) खाते असले पाहिजे. अजून माहितीसाठी कृपया विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये मी AO3 खाते शिवाय भाग घेऊ शकतो का? हे पहा.

आपण विस्तारासाठी कल्पनाबीजच्या दर्शनी फळा मधून "Prompts (#)" (लेखनबीज) निवडून मुक्त लेखनबीज मध्ये प्रवेश करू शकता. जे कोणतं लेखनबीज आपल्याला कल्पनाविस्तार करण्यास आवडेल, त्याच्या बाजूचं "Claim" (कल्पनाविस्तार) बटण वापरा. तुम्हाला जेवढे पण लेखनबीज पूर्ण करावेशे वाटतात तेवडे तिम्ही पीर्ण करू शकता. एका लेखनबीजचा कल्पनाविस्तार एका वेळेस अनेक लोकं करू शकतात, व लेखनबीजचा कल्पनाविस्तार करण्यासाठी ते लेखनबीज प्रस्तुत करण्याची गरज़ नाही आहे. आपण कल्पनाविस्तार केलेल्या प्रत्येक लेखनबीजच्या खाली आपले वापरकर्त्याचे नाव दावेदार म्हणून प्रदर्शित केले जाईल. निनावी विस्तारासाठी कल्पनाबीजच्या खाली केवळ निनावी दावेदार केवढे आहेत हे दिले जाईल.

आपले कल्पनाविस्तार करून पण अपूर्ण असलेले लेखनबीज आपण आपल्या दर्शनी फळावर उपलब्ध केलेल्या My Claims (माझे कल्पनाविस्तार) ह्या पृष्ठावर बघू शकता. हे कसे करायचे ते जाणून घेण्यासाठी मी माझे अपूर्ण कल्पनाविस्तार कुठे बघू शकतो? हा पृष्ठ पहा.

लेखनबीज पूर्ण कसे करायचे ह्या बद्दल माहितीसाठी मी माझा कल्पनाविस्तार केलेला लेखनबीज कसा पूर्ण करू? हे पहा.

विस्तारासाठी कल्पनाबीज कसे शोधेयचे ह्या बद्दल माहितीसाठी मला विस्तारासाठी कल्पनाबीज कुठे मिळतील? हे पहा.

मी माझे अपूर्ण कल्पनाविस्तार कुठे बघू शकतो?

आपले अपूर्ण कल्पनाविस्तार बघण्यासाठी:

  1. लॉग इन करा, मग "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" निवडा. त्यानंतर मेनू मध्ये "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) दाबून तुमच्या दर्शनी फळाला जावा. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्राच्या प्रतिमेवर दाबून पण पूर्ण करू शकता.
  2. भ्रमण यंत्रावरती पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला असलेल्या मेनूमधून "Claims (#)" (कल्पनाविस्तार) निवडा.

डीफॉल्टनुसार, ही प्रक्रिया तिम्हाला तिमचे अपूर्ण कल्पनाविस्तार दाखवेल. तुमचे पूर्ण केलेले कल्पनाविस्तारांचे पुनरावलोकन करण्यासाठी, पृष्ठाच्या शीर्षस्थानी असलेले "Fulfilled Claims" (पूर्ण कल्पनाविस्तार) बटण दाबा.

मी माझा कल्पनाविस्तार केलेला लेखनबीज कसा पूर्ण करू?

आपले अपूर्ण कल्पनाविस्तार बघण्यासाठी, मी माझे अपूर्ण कल्पनाविस्तार कुठे बघू शकतो? हे बघा.

आपण कुठलेही कल्पनाविस्तार केलेले लेखनबीज त्याच्या बाजूला असलेलं "Fulfill" (पूर्तता) बटण दाबून पूर्ण करू शकता. ही प्रक्रिया 'नवं लेखनाचं प्रकाशन' पत्र उघडेल, ज्याच्या आत कामाचे तपशील आधीपासून भरलेले असतील, संकलन आधीच निवडल गेलं असेल, व माहितीपत्रामध्ये लेखनबीज आधीच दिले जाईल. विस्तारासाठी कल्पनाबीज जर संपादित असेल, तर कुठलंतर लेखन संकलनला प्रस्तुत केले जाईल, परंतु ते सार्वजनिकरीत्या जोडण्यापूर्वी मंजूरी मिळवणे आवश्यक आहे.

ह्या शिवाय आपण आपले काम Post New Work (नवं लेखनाचं प्रकाशन) पत्राला जाऊन पूर्ण करू शकता. Associations (संदर्भ) ह्या विभागात आपण जो कल्पनाविस्तार पूर्ण करताय त्यासाठीचा चेकबॉक्स निवडा. आपण लेखनाचं प्रकाशिन किंवा पूर्वावलोकन करताना विस्तारासाठी कल्पनाबीज व प्रॉम्प्टर बाबतच्या तपशील आपोल्याआप तुमच्यासाठी भरले जातील. ते लेखन त्या विस्तारासाठी कल्पनाबीजच्या संकलन मध्ये जोडले जेईल; तथापि, ते लेखनबीज स्वतः आपल्याआपण माहितीपत्र भागाच्या सुरुवातीला नाही प्रदर्शित होणार.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रहा) वरती लेकन कसे प्रकाशित करायचे ह्या बद्दल अजून तपशीलवार सूचनांसाठी कृपया ट्यूटोरियल: AO3 वर लेखन प्रकाशित करणे हे पहा.

मी एक कल्पनाविस्तार केलेली लेखनबीज कशी रद्द करू?

आपण लेखनबीजची पूर्ती आपलं कुठलं तर लेखन प्रकाशित करून केली असली तरी आपण केव्हा पण किठलं तर एक कल्पनाविस्तार रद्द करू शकता. आपण कल्पनाविस्तार केलेलं किठलं तर लेखनबीज काढण्यासाठी:

  1. लॉग इन करा, मग "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" निवडा. त्यानंतर मेनू मध्ये "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) दाबून तुमच्या दर्शनी फळाला जावा. ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या खाते-रेखाचित्राच्या प्रतिमेवर दाबून पण पूर्ण करू शकता.
  2. भ्रमण यंत्रावरती पृष्ठाच्या शीर्षस्थानी किंवा बाजूला असलेल्या मेनूमधून "Claims (#)" (कल्पनाविस्तार) निवडा.
  3. आपल्याला जो कल्पनाविस्तार रद्द करायचा आहे, त्याला जाऊन "Drop Claim" (कल्पनाविस्तार रद्द करणे) बटण दाबा.
  4. एक पुष्टीकरण संवाद बॉक्स उघडेल, जे खात्री करून घेईल की तिम्हाला खरचं कल्पनाविस्तार रद्द करायचा आहे की नाही. "OK" (हो) बटण दाबा.
  5. आपल्याला त्या कल्पनाविस्तार मधून रद्द केलं जाईल, व रीफ्रेस केल्यास आपल्या कल्पनाविस्तार सूची मध्ये तो कल्पनाविस्तार नाही दाकवला जाईल. आपण जर पूर्ण केलेला कल्पनाविस्तार रद्द केला असेल तर ते लेखन त्या विस्तारासाठी कल्पनाबीजच्या संग्रह मध्ये तसेच राहील पण त्या लेखन व लेखनबीजच्या मधले इतर सारे संबंध/दुवे काढले जातील.

माझ्या लेखनबीजवर आधारित लेखन मला कुठे सापडेल?

आपण प्रस्तुत केलेल्या लेकनबीजवर आधारित लेखन बघण्यासाठी:

  1. लॉग इन करा, मग "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" निवडा. त्यानंतर मेनू मध्ये "My Sign-ups" (माझ्या नोंदणी) निवडून आपल्या नोंदणींच्या पृष्ठाला जावा.
  2. आपल्या विस्तारासाठी कल्पनाबीजच्ं नाव निवडा, जेणेकरून आपल्याला त्याच्या दर्शनी फळा मध्ये प्रवेश मिळेल.
  3. आपल्या सद्यकालीन लेखनबीज मध्ये प्रवेश मिलवण्यासाठी "My Prompts" (माझे लेखनबीज) बटण दाबा.
  4. आपल्या प्रत्येक लेखनबीज नंतर त्या लेखनबीजच्या संबंधित लेखन सूचीबद्ध केले जातील.

आपल्या लेखनबीजच्या प्रतिसादात जेव्हा पण कुठलं तर लेखन प्रकाशित केले जाईल, तेव्हा आपल्याला ईमेल द्वारे एक सूचना दिली जाईल. कृपया हे ध्यानात घ्या की जर आपण आपल्या प्राधान्यखुणांमध्ये हे जाहीर केले असेल की आपल्याला ईमेल द्वारे सूचना नको आहेत, तर आपल्याला ह्या सूचना नाही पाठवल्या जातील.

माझ्या लेखनबीजसाठी लिहिलेल्या लेखनामध्ये गड़बड़ आहे!

आपल्या लेखनबीजवर आधारित लेखनामध्ये चूका असतील तर त्या चूकां बद्दल आपण त्या लोकांना सांगू शकता जे तो विस्तारासाठी कल्पनाबीज चालवत आहेत. जर ते लेखन आमच्या नियम आणि ध्येयधोरणांना भंग करत असेल तर आपण Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) च्या तळटीप मध्ये असलेल्या दुवेचा वापर करून नियम आणि तक्रारनिवारण समिती कडे आपली तक्रारनोंद प्रस्तुत करू शकता.

आपण एक लेखन नाकारू पण शकता जर ते आपल्याला भेटच्या नाते त्या निर्मात्यानी दिले असेल. हे कसे करायचे ह्या बद्दल अजून माहितीसाठी, कृपया मी एक भेट कशी नाकारू? हे पहा.

मी एक विस्तारासाठी कल्पनाबीज कशी तयार करू?

एक विस्तारासाठी कल्पनाबीज तयार करण्यासाठी पहिला आपल्याला एक होस्टिंग संग्रह किंवा पोटसंकलन तयार कराव लागेल. हे कसे करायचे ह्याच्यासेठी शिकवणी: संग्रह तयार करणे हे पहा. संग्रह तयार करताना प्राधान्यखुणांच्या मेनूमधल्या "Type of challenge, if any" (जर कोणता असेल तर, आव्हानचा प्रकार) मधून "Prompt Meme" (विस्तारासाठी कल्पनाबीज) निवडा.
आपलं आव्हान प्रस्थापित कसे करायचे हे जणून घेण्यासाठी आमचं शिकवणी: AO3वर विस्तारासाठी कल्पनाबीज चालवणे हे पहा.

मी जी विस्तारासाठी कल्पनाबीज चालवतोय त्याच्यासाठी मी आमंत्रणांची विनंती कशी करू?

आपण एक Pविस्तारासाठी कल्पनाबीज चालवत असाल आणि आपल्याला सहभागींसाठी आमंत्रणांची विनंती करायची असेल तर कृपया आव्हानचं नाव व दुवा, नोंदणीच्या तारखा, कोणत्या खात्यांना आमंत्रणे पाठवायची आहेत, आणि किती आमंत्रणे हवी आहेत, ह्या सर्व माहिती सकट संपर्क समितीशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी, कृपया मी जे आव्हान चालवताेय त्यासाठी मी आमंत्रणांची विनंती कशी करू? हे पहा.

मी AO3मध्ये टाचणखूणांची भर कसी करू जेणेकरून सहभागी त्यांचा वापर माझ्या विस्तारासाठी कल्पनाबीज मध्ये करतील?

आपल्या विस्तारासाठी कल्पनाबीजसाठी तुम्ही एक टाचणखुणसंच बनवून Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये नवीन टाचणखूणांची भर करू शकता. अधिक माहितीसाठी, टाचणखुणसंच वाविप्र हे पहा.

एका निनावी व/किंवा अज्ञात विस्तारासाठी कल्पनाबीजच्या निर्माते व लेखनांना कसे जाहीर करू?

एका निनावी व/किंवा अज्ञात विस्तारासाठी कल्पनाबीजच्या निर्माते व/किंवा लेखनांना कसे जाहीर करण्यासाठी:

  1. आपल्या Collection Settings (संग्रह सेटिंग्स) पृष्ठाला जाऊन आपल्या Preferences (प्रादान्यखुणा) विभागाला जावा. हे कसे करायचे ते आपल्याला माहिती नसेल तर मी माझ्या संग्रह सेटिंग्स पृष्ठाला कसे परत जाऊ? हे पहा.
  2. लेखन जाहीर करण्यासाठी, "This collection is unrevealed" (हा संग्रह अज्ञात आहे) ह्याचा बाजूचा किंवा खालचा डब्ब्यातली खूण काढा. निर्माता जाहीर करण्यासाठी, "This collection is anonymous" (हा संग्रह निनावी आहे) ह्याचा बाजूचा किंवा खालचा डब्ब्यातली खूण काढा.
  3. योग्य असलेल्या डब्ब्यांमधल्या खूणा काढल्यावर, पृष्ठाच्या तळाशी असलेलं "Update" (अद्यतन) बटण दाबा.

अधिक माहितीसाठी माझ्या स्वतःच्या संग्रहा मध्ये मी लेखन कसे जाहीर करू किंवा त्यांची निनावी कशी काढू?

अनोग्य लेखनबीज किंवा लेखनां बद्दल मी काय करू?

जर कुठले अनोग्य लेखनबीज असतील, तर आपण "Delete Prompt" (लेखनबीज हटवा) किंवा "Delete Sign-up" (नोंदणी हटवा) बटण दाबून ते लेखनबीज किंवा ते नाव नोंदणी पत्र हटवू शकता. लेखनबीज हटवल्याने तो एक लेखनबीज काढला जाईल. नोंदणी हटवल्याने त्या वेपरकर्त्याने विनंती केलेल्या सर्व नोंदणी हटवल्या जातील, ज्याच्यात त्यानी बनवलेले सर्व निनावी लेखनबीजं पण पकडले जातील.

जर सहभागीने किमान आवश्यक संख्येच्या वर गेले असतील (उदाहरणसाठी, जर एक विस्तारासाठी कल्पनाबीज आपल्याला दोन ते तीन विनंती बनवीण्यास परवानगी देत असेल आणि त्यानी तीन बनवले), तरचं आपण वैयक्तिक लेखनबीज हटवू शकता. जर कोणी तर फक्त किमान संख्येसाठी नाव नोंदवलं असेल तर आपण त्यांच्या सर्व विनंत्या व/किंवा प्रस्ताव एकाच वेळेला हटवणार.

जर लेखनबीजशी असंबंधित लेखन आपल्याला सापडले, तर आपण इतरांचे लेखन हटवू तर नाही शकत पण, आपण ते लेखन त्या संग्रहातून काढू शकता. अधिक माहितीसाठी मी अका संग्रहातून एक लेखन किंवा वाचनखूण कशी काढू शकतो? हे पहा.

मी एक वीस्तारासाठी कल्पनाबीज कशी हटवू?

एक विस्तारासाठी कल्पनाबीज हटवण्यासाठी, पहिला आपल्या Challenge Settings (आव्हान सेटिंग्स) ला जावा. पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवी कडे असलेलं (किंवा भ्रमण ध्वनी वर "Setting Up the [Name] Prompt Meme" ([नाव] वीस्तारासाठी कल्पनाबीजचं प्रस्थापन) ह्यात्या खाली असलेलं) "Delete Challenge" (आव्हान हटवा) बटण दाबा. ह्या प्रक्रिये मुळे एक संवाद डब्बा उघडेल ज्याला आपण खात्री देऊन "OK" (हो) बटण दाबावं लागेल. जर आपल्याला ह्या पृष्ठा पर्यंत कसे पोचायचे हे माहित नसेल, तर कृपया मी माझ्या आव्हान सेटिंग्सला कसं परत जाऊ? हे पहा.

आपण आपलं वीस्तारासाठी कल्पनाबीज जरी हटवलं असेल तरी आपले सर्व लेखन त्या संग्रहात राहतील.

जर आपण एक संग्रह हटवूइच्छित असाल, तर कृपया मी एक संग्रह कसं हटवू? हे पहा.

मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?

जर संग्रह किंवा आव्हान निर्मिती संबंधित कुठल्या तर एका भागासाठी आपल्याला मार्गदर्शन हवं असेल, तर कृपया हे बघून घ्या:

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्‍या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. ह्या वाविप्र किंवा शिकवणीं मध्ये काही तर राहून गेलं असेल आणि आपल्याला त्या संबंधित तुमच्या एका वीस्तारासाठी कल्पनाबीज सोबत मदत लागली, तर कृपया AO3_Support ला सह-मालक म्हणून हक्क द्या आणि मग आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू तिमची मदत करायला.