स्युडोआयडी म्हणजे काय?
Pseudonym (टोपणनाव) pseud (स्युडोआयडी) म्हणून दिले जाते. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रहा) वरती स्युडोआयडी म्हणजे ते कुठलेही नाव जे आपल्या वापरकर्त्याच्या नावा सह आपल्या खात्याशी संबंधित असेल.
काही निर्मात्यांनी अनेक नावांखाली स्वतःचे लेखन प्रकाशित केले आहे. स्युडोआयडी मुळे ह्या निर्मात्यांना आपले सर्व लेखन एका खात्या खाली एकजूट करता येईल, आणि एका लेखनाच्या संबंधित त्यांचे जे काही मूळ नाव होते, ते तसेच राहील. आपले टम्बलर URL, डिस्कॉर्ड वापरकर्त्याचे नाव, किंवा वेबो वापरकर्त्याचे नाव सारखे आपली इतर साईट्स वरच्या नावांना आपण आपले AO3वरचे लेखन आपल्या स्युडोआयडी द्वारे जोडू शकता.
उदाहरणार्थ: काही महिन्यांपासून pat_smith_1996 AO3 वरती रसिकध्वनिफीत प्रकाशित करत आहेत. आता त्यांना त्यांच्या 14th_doctor_lover लाईवजरनल वरून त्यांचे काम आयात करायचे आहे, आणि फॅनफिक्शन.नेट वरती high_school_drawer_fic ह्या नावा खाली आधी प्रकाशित केलेले त्यांचे थोडे लेखन पण प्रकाशित करायचे आहे. मग त्यांच्या कृतींसाठी दोन-तीन नवीन खाते उघडण्याच्या ऐवजी, ते pat_smith_1996 ह्याच खात्याच्या खाली वेगळे वेगळे स्युडोआयडी बनवू शकतात. 14th_doctor_lover व high_school_drawer_fic हे स्युडोआयडी तयार केल्या नंतर, तो वापरकर्ता आपल्या प्रत्येक लेखनाचं असं संपादन करू शकतात की त्या लेखन आधी ज्या नावाशी संबंधित होतं ते नाव त्या लेखनासह दिले जाईल. जर कोणी तरी ठरवलं की त्यांना AO3वरती 14th_doctor_lover ह्यांचे लेखन शोधायचे आहे, तर त्यांना ते लेखन नक्कीचं सापडेल जरी ते pat_smith_1996चे वापरकर्त्याचे नाव नाही आहे.
ह्याची काही गरज़ नाही आहे, की वापरकर्त्याचे नावाप्रमाणे स्युडोआयडी पण विलक्षित असायला पाहिजे. आपण कुठल्याही नावानी जाणले जाऊ शकता, जरी आपली स्युडोआयडी इतर AO3च्या वापरकर्त्यांच्या वापरकर्त्याचे नाव किंवा स्युडोआयडीशी समान असेल. आपले लेखन, लेखमाला, वाचनखूण, व टिप्पणींवर आपली कुठली स्युडोआयडी प्रदर्शित केली जाईल, हे आपण ठरवू शकता. ही नावे सार्वजनिकरूपी जोडली जातील—आपल्या खाते-रेखाचित्र पृष्ठावर आपल्या सर्व स्युडोआयडी दिल्या जातील. ह्या सकट, आपले वापरकर्त्याचे नाव नेहमी आपल्या स्युडोआयडीच्या बाजूला ह्या प्रकारे दिले जाईल:
स्युडोआयडी (वापरकर्त्याचे नाव)
आपली स्युडोआयडी कशी दाखवली जाईल ह्या बाबत अजून माहिलीसाठी, माझ्या स्युडोआयडीच्या बाजूला माझे वापरकर्त्याचे नाव कंसात का दाखवले जाते?
नवीन स्युडोआयडीची भर मी कशी करू?
एक नवी स्युडोआयडीची भर करण्यासाठी:
- लाॅग इन केल्यावर "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" हे अभिवादन निवडा आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) ह्यावर दाबून, किंवा आपल्या खाते-रेखाचित्र प्रतिमेवर दाबून आपल्या दर्शनी फळाला जावा.
- आपल्या स्युडोआयडी पृष्ठाला जावा. ह्या पृष्ठाला जाण्याचे दोन मार्ग आहेत, ज्यापैकी कोणता मार्ग निवडायचा हे यावर अवलंबून आहे आपण आधी कोणती स्युडोआयडी बनवली आहे की नाही:
- जर ही आपली पहिली स्युडोआयडी असेल तर मग आपल्या भ्रमण यंत्रावर पृष्ठावरती बाजूला किंवा त्याच्या शीर्षस्थानी असलेल्या मेनूमधून "Profile" (खाते-रेखाचित्र) निवडा. त्यानंतर आपल्या खाते-रेखाचित्राच्या नृमाहिती खाली असलेलंt "Manage My Pseuds" (माझ्या स्युडोआयडींची व्यवस्थापना) हे बटण दाबा.
- जर आपण आधी कधीतरी एक स्युडोआयडी मनवली असेल तर मग आपण स्युडोआयडी पृष्ठामध्ये प्रवेश आपल्या भ्रमण यंत्रावर पृष्ठावरती बाजूला किंवा त्याच्या शीर्षस्थानी असलेल्या मेनूमधून "Pseuds" (स्युडोआयडी) निवडून करू शकता. यामुळे एक सूची प्रकट होईल. त्या सूचीमध्ये "All Pseuds (#)" (सर्व स्युडोआयडी (#)) हे नीवडा.
- आपल्या डेस्कटाॅपवर पृष्ठाच्या शीर्षस्थानी उजवीकडे असलेलं किंवा भ्रमण यंत्रावर "Pseuds for [your username]" ([आपलं वापरकर्त्याचे नाव]साठीचे स्युडोआयडी) शीर्षकच्या खाली असलेलं "New Pseud" (नवीन स्युडोआयडी) बटण दाबा. सामुळे आपण नवीन स्युडोआयडी पत्रावर पोहचाल.
- आपली नवी स्युडोआयडी बनवण्यासाठी हे पत्र भरा:
- नवीन स्युडोआयडी पत्रावर केवळ "Name" (नाव) हे क्षेत्र भरणे अनिवार्य आहे, जिथे आपल्याल्या आपल्या नव्या स्युडोआयडीचं नाव भरावं लागेल. एका स्युडोआयडीमध्ये १-४०पैकी कितीही वर्ण असू शकतात. स्युडोआयडींमध्ये कुठले वर्ण वापरण्याची परवानगी आहे याबद्दल अधिक माहितीसाठी माझ्या स्युडोआयडी मध्ये मी कोणते वर्ण वापरू शकते? हे पहा.
- आपल्याकडे हा पर्याय आहे की आपण "Make this name default" (ह्या नावाला डीफाॅल्ट बनवा) हा चेकबाॅक्स निवडू शकता जेणेकरून आपण सध्या तयार करत असलेल्या स्युडोआयडीला आपली आयता डूआयडी (अधिक माहितीसाठी आयता डूआयडी म्हणजे काय? हे पहा) बनवू शकता.
- त्यानंतर, "Description" (वर्णन) खाली आपल्या नव्या स्युडोआयडीसाठी आपण एक स्युडोआयडी वर्णन घालू शकता.
- शेवटी, "Upload a new icon" (नवी चित्रखूण अपलोड करणे) खाली ह्या स्युडोआयडीसाठी एका चित्रखूणाची भर करू शकता. चित्रखूणांबद्दल अधिक माहिती खाते-रेखाचित्र वाविप्रवरती सापडेल, ज्याच्यात चित्रखूण म्हणजे काय?, चित्रखूणेवर कोणते निर्बंध आहेत?, आणि मी एक चित्रखूण कशी अपलोड करू किंवा ती कशी बदलू?
- पत्रामध्ये पाहिजे असलेली सर्व माहिती भरल्यानंतर "Create" (निर्माण) हे बटण दाबा.
माझ्या स्युडोआयडीमध्ये मी कुठले वर्ण वापरू शकतो?
स्युडोआयडीमध्ये कोणत्याही भाषेच्या लिपीमधले जवळ-जवळ सर्व अक्षरं आणि वर्ण, अंक, अधोरेखा, अवकाश, किंवा वियोगीचिन्ह समाविष्ट आहेत. अक्षरं व वर्णांमध्ये कोणतेही भेदक चिन्ह समाविष्ट असू शकतात, जसे की å, ç, ñ, ȑ, ώ, ӵ. हे फक्त उदापरण आहेत; कोणत्याही प्रकारचे भेदक चिन्ह वापरले जाऊ शकतात. स्युडोआयडीमध्ये एकतरी अक्षर, वर्ण, किंवा अंक समाविष्ट असला पाहिजे.
आयता डूआयडी म्हणजे काय?
आपली आयता डूआडी म्हणजे ती आयडी जी आपोआप आपल्या कृती, टिप्पण्या, आणि वाचनखूणांशी जोडली जाईल, जर आपण प्रकाशन प्रक्रियेच्या वेळेला दुसरा पर्याय निवडला नाही तर. जेव्हा आपण पहिल्यांदा आपलं खातं उघडता, तेव्हा आपलं वापरकर्त्याचे नाव हीच आपली आयता डूआयडी असते, पण आपण आपल्या इतर कोणत्यातर स्युडोआयडीला आपलं डीफाॅल्ट बनवायचा पर्याय निवडू शकता. सूचनांसाठी कृपया मी आयता डूआयडी कशी सेट करू? हे पहा.
कोणतीही स्युडोआयडी जी आपले वापरकर्त्याचे नाव नाही आहे, ती खालील स्वरूपात कृती, टिप्पण्या, किंवा वाचनखूणांवर प्रदर्शित केली जाईल:
स्युडोआयडी (वापरकर्त्याचे नाव)
आपली स्युडोआयडी कशी प्रदर्शित केली जाईल याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया Why does my username display in parentheses next to my pseud? हे पहा.
मी आयता डूआयडी कशी सेट करू?
जेव्हा आपण पहिल्यांदा आपलं खातं उघडता, तेव्हा आपलं वापरकर्त्याचे नाव हीच आपली आयता डूआयडी असते, पण आपण आपल्या इतर कोणत्यातर स्युडोआयडीला आपलं डीफाॅल्ट बनवायचा पर्याय निवडू शकता. हे आपण तेव्हा करू शकता जेव्हा आपण एका नव्या स्युडोआयडीचं निर्माण करता (अधिक माहितीसाठी नवीन स्युडोआयडीची भर मी कशी करू? हे पहा) किंवा स्युडोआयडी नर्माण केल्यानंतर केव्हाही.
जर आपण आधीच एक स्युडोआयडी तयार केली आहे जी आता आपल्याला आपली आयता डूआयडी बनवायची आहे, तर खालील प्रक्रिया पाळा:
- लाॅग इन केल्यावर "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" हे अभिवादन निवडा आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) ह्यावर दाबून, किंवा आपल्या खाते-रेखाचित्र प्रतिमेवर दाबून आपल्या दर्शनी फळाला जावा.
- पृष्ठावर कडेपाशी, किंवा भ्रमण यंत्रावर शीर्षस्थानी, असलेल्या मेनूमधून "Pseuds" (स्युडोआयडी) बटण दाबा. हे केल्यानी एक सूची प्रकट होईल. या सूचीमधून "All Pseuds (#)" (सर्व स्युडोआयडी (#)) निवडा. या मुळे आपल्याला आपण Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह)वरती तयार केलेले सर्व स्युडोआयडींची सूची सापडेल.
- जी स्युडोआयडी आपल्याला डीफाॅल्ट बनवायची आहे त्यासाठीचं "Edit" (संपादन) बटण दाबा. हे केल्याने आपल्या समोर परत एकदा ते पत्र उघडेल जे आपण स्युडोआयडी तयार करताना भरलेलं होतं.
- त्या पत्रावरती "Make this name default" (ह्या नावाला डीफाॅल्ट बनवा, हे दुसरा पर्याय म्हणून असेल. तो बाॅक्स चेक कराआणि पृष्ठाच्या तळाशी असलेलं "Update" (अद्ययावत करा) बटण दाबा.
आधीच्या आयता डूआयडी खाली प्रकाशित केलेल्या सर्व कृती, टिप्पणी, आणि वाचनखूणा त्याच नावाखाली राहतील, जर आपण परत जाऊन स्वहस्ते कृतीचं संपादन, टिप्पणींचं संपादन, किंवा वाचनखूणांचं संपादन करून त्यांची स्युडोआयडी नाही बदलली तर.
कुठल्या स्युडोआयडी खाली प्रकाशन करायचे ह्याची निवड मी कशी करू?
आपल्याला कुठल्या स्युडोआयडी खाली प्रकाशन करायचं आहे हे निवडण्याआधी आपल्याला एक किंवा त्याहून जास्त स्युडोआयडी तयार करावे लागतील. जर आपल्याला एक स्युडोआयडी खाली प्रकाशन करायचं आहे पण आपण कोणतीही तयार केली नसेल, तर पुढील प्रक्रिये आधी नवीन स्युडोआयडीची भर मी कशी करू? हे पहा. जर आपल्याकडे केवळ आपले वापरकर्त्याचे नाव आहे तर आपल्या सर्व कृती त्याखाली आपेआप प्रकाशित केल्या जातील.
जेव्हा आपण एका कृतीचं प्रकाशन किंवा संपादन करता, त्याच्या Post or Edit Work (कृती प्रकाशन किंवा संपादन) पृष्ठांच्या "Preface" (प्रस्तावना) भागात आपल्याकडे "Creator/Pseud(s)" (निर्माता/स्युडोआयडी) निवडायचा पर्याय असतो. आपल्याला हवी असलेली स्युडोआयडी निवडा आणि नेहमी प्रमाणे कृतीचं प्रकाशन करा. कृतीच्या निर्मातांच्या संख्ये प्रमाणे आपण स्युडोआयडी निवडताना आपल्या कीबोर्डवर "Ctrl" किंवा "control" बटण धरून अनेक स्युडोआयडी निवडू शकता. भ्रमण यंत्रावर अनेक स्युडोआयडी निवडण्यासाठी, "निर्माता/स्युडोआयडी" पेटीच्या बाजूला असलेलं मेनू निवडा. Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रहा)वर कृती कशी प्रकाशित करायची ह्याबद्दल अधिक माहितीसाठी, प्रकाशन व संपादन वाविप्र आणि AO3वर कृती प्रकाशित करणे ही शिकवणी पहा.
एका कृतीवर टिप्पणी सोडण्या किंवा वाचनखूण लावण्यासाठी मी कुठली स्युडोआयडी वापरू ह्याची निवड कशी करू?
जेव्हा आपण एका कृतीवर/ला टिप्पणी सोडता किंवावाचनखूण लावता, तेव्हा आपल्याकडे स्युडोआयडी निवडायचा पर्याय असतो. आपली आयता डूआयडी प्रदर्शित करणाऱ्या मेनू निवडून सूचीमधून आपल्याला हवी असलेली पर्यायी स्युडोआयडी निवडा आणि नेहमी प्रमाणे प्रकाशन करा. आपण अनेक स्युडोआयडींखाली एकाच कृतीला वाचनखूण नाही लावू शकत. पण आपण संपादन करताना सुचीमधून कोणतीतर दुसरी स्युडोआयडी निवडून त्या स्युडोआयडीला बदलू शकता ज्याखली एका टिप्पणी किंवा वाचनखूणेचं प्रकाशन केलं गेलं आहे. अधिक माहितीसाठी, कृपया मी माझ्या टिप्पणीचं संपादन करू शकतो का किंवा ती हटवू शकतो का? किंवा एका वाचनखूणेचं संपादन मी कसे करू? हे पहा. Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रहा)च्या कोणत्याही कृतीवर टिप्पणी सोडण्या किंवा त्याला वाचनखूण लावण्याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया टिप्पणी आणि टाळ्या वाविप्र किंवा वाचनखूण वाविप्र हे पहा.
टिप्पणी आणि वाचनखूणांच्या विपरीत, टाळ्या नेहमी आपल्या वापरकर्त्याच्य, आणि कोणत्याही एका स्युडोआयडीशी जोडली नाही जाऊ शकत. अधिक माहितीसाठी, कृपया टाळ्या म्हणजे काय? हे पहा.
एका स्युडोआयडीचे संपादन मी कसे करू?
जेव्हा आपण स्युडोआयडीचं संपादन करता, तेव्हा आपण त्या स्युडोआयडीचं विवरण किंवा चित्रखूण अद्ययवात करू शकता आणि त्याला आपली आयता डूआयडी बनवू शकता. स्युडोआयडीचं संपादन करायला:
- लाॅग इन केल्यावर "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" हे अभिवादन निवडा आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) ह्यावर दाबून, किंवा आपल्या खाते-रेखाचित्र प्रतिमेवर दाबून आपल्या दर्शनी फळाला जावा.
- पृष्ठावर कडेपाशी, किंवा भ्रमण यंत्रावर शीर्षस्थानी, असलेल्या मेनूमधून "Pseuds" (स्युडोआयडी) बटण दाबा. हे केल्यानी एक सूची प्रकट होईल. या सूचीमधून "All Pseuds (#)" (सर्व स्युडोआयडी (#)) निवडा. या मुळे आपल्याला आपण Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह)वरती तयार केलेले सर्व स्युडोआयडींची सूची सापडेल.
- ज्या स्युडोआयडीमध्ये आपल्याला बदल करायचे आहेत त्यासाठीचं "Edit" (संपादन) बटण दाबा. हे केल्याने आपल्या समोर परत एकदा ते पत्र उघडेल जे आपण स्युडोआयडी तयार करताना भरलेलं होतं.
- स्युडोआयडीची चित्रखूण बदलणे ह्या सारखे कोणतेही संपादन आपण करू शकता. ह्या पत्रावरचे पर्याय New Pseuds(नव्या स्युडोआयडी) पृष्ठा वरच्यांसारखेच आहेत, म्हणून अधिक माहितीसाठी, कृपया नवीन स्युडोआयडीची भर मी कशी करू? हे पहा. कृपया हे ध्यानात ठेवा की आपल्या वापरकर्त्याचे नावाशी समान असलेल्या स्युडोआयडीला आपण नाही बदलू शकत.
- संपादन झाल्यावर, पृष्ठाच्या तळाशी असलेलं "Update" (अद्ययवात करा) हे बटण दाबा.
हा मार्ग पाळल्यावर, आपल्या वापरकर्त्याचे नाव व्यतिरिक्त कोणत्याही स्युडोआयडीच्या नावाचं आपण संपादन करू शकता. ह्याच्यासाठी सहायता हवी असेल तर, कृपया खाते वाविप्रमध्ये मी माझे वापरकर्त्याचे नाव कसे बदलू? हे पहा.
हे ध्यानात ठेवा की आपली स्युडोआयडी बदल्यामुळे त्या स्युडोआयडीचे आधी प्रकाशित केलेल्या कृत्या, टिप्पण्या, आणि वाचनखूणावर अस्तित्वात असेलेले सर्व वापर सुद्धा बदलले जातील.
अजून कोणाची स्युडोआयडी माझ्या सारखी आहे! असं कसं झालं?
वापरकर्त्याचे नावांच्या विपरीत, स्युडोआयडी आगळे नसतात. त्याऐवजी, स्युडोआयडींमुळे आपण आपल्या रसिकगटांमधली ओळख Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह)वरच्या आपल्या कृतींशी जोडू शकता, जरी अजून कोणीतरी ही नावे आधी कधी तरी वापरली असतील किंवा ती सध्या वापरत असतील. स्युडोआयडी कशी वापरायची याबद्दल उदाहरणासाठी, स्युडोआयडी म्हणजे काय? हे पहा.
आपली स्युडोआय़डी कशी प्रदर्शित केली जाईल याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया माझ्या स्युडोआयडीच्या बाजूला माझे वापरकर्त्याचे वाव कंसात का दिसतंय? हे पहा.
माझ्या स्युडोआयडीच्या बाजूला माझे वापरकर्त्याचे नाव कंसात का दिसतंय?
वापरकर्त्याचे नावांच्या विपरीत, स्युडोआयडी आगळे नसतात. ह्याची खात्री करण्यासाठी की ज्या वापरकर्त्यांची स्युडोआयडी एख सारखी आहे त्यांच्या ओळखींबद्दल गैरसमज होणार नाही, स्युडोआयडीच्या बाजूला वापरकर्त्याचे नाव कंसात प्रदर्शित केले जाते.
एका मुक्त कलाकृती प्रकरणात, वापरकर्ते एकतर त्या कृतीशी अपली स्युडोआयडी जोडून ठेवू शकतात किंवा तिला काढू शकता. अधिक माहितीसाठी, मुक्त करणे वाविप्रमध्ये मी माझी कृती कशी मुक्त करू? हे पहा.
मी एक स्युडोआयडी कशी हटवू?
एक स्युडोआयडी हटवण्यासाठी:
- लाॅग इन केल्यावर "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" हे अभिवादन निवडा आणि मग मेनूमधून "My Dashboard" (माझा दर्शनी फळा) ह्यावर दाबून, किंवा आपल्या खाते-रेखाचित्र प्रतिमेवर दाबून आपल्या दर्शनी फळाला जावा.
- पृष्ठावर कडेपाशी, किंवा भ्रमण यंत्रावर शीर्षस्थानी, असलेल्या मेनूमधून "Pseuds" (स्युडोआयडी) बटण दाबा. हे केल्यानी एक सूची प्रकट होईल. या सूचीमधून "All Pseuds (#)" (सर्व स्युडोआयडी (#)) निवडा. या मुळे आपल्याला आपण Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह)वरती तयार केलेले सर्व स्युडोआयडींची सूची सापडेल.
- जी स्युडोआयडी हटवायची आहे तिच्यासाठीचं "Delete" (हटवणे) बटण दाबा.
- एक पाॅप-अप प्रकट होईल जे आपल्याला विचारेल "Are you sure?" (आपल्याला खात्री आहे का?). प्रक्रिया चालत ठेवण्यासाठी "OK" (हो) हे दाबा. ही स्युडोआयडी मग आपले खाते आणि AO3वरून हटवली जाईल. आपल्या कती, टिप्पण्या आणि वाचनखूणांचं काय होईल ह्याबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया refer to मी एक स्युडोआयडी हटवली तर काय होतय? हे पहा.
जर आपल्याला आपली आयता डूआयडी हटवायची आहे तर मग आपल्याला पहिला आपली डीफाॅल्ट बनविण्यासाठी एक अन्य स्युडोआयडी निवडावी लागेल. सूचनांसाठी मी आयता डूआयडी कशी सेट करू? हे पहा.
याव्यतिरिक्त, आपण ती स्युडोआयडी हटवू नाही शकत जी आपल्या वापरकर्त्याच्या नावा सारखी आहे, पण आपण तिला बदलू शकता. अधिक माहितीसाठी, कृपया मी माझे वापरकर्त्याचे नाव कसे बदलू? हे पहा. जर आपल्याला स्युडोआयडीच्या ऐवजी आपले खातेच हटवायचे असेल तर मग कृपया मी मझे खाते कसे हटवू? हे पहा.
मी एक स्युडोआयडी हटवली तर काय होतय?
जर आपण एक स्युडोआयडी हटवली तर त्याखाली प्रकाशित केलेल्या सर्व कृत्या आणि टिप्पण्या आपोआप आपल्या आयता डूआयडीखाली घातले जातील. आपल्याकडे हा पर्यायपण असेल की आपण एकतर ती स्युडोआयडी जी आपण हटवताय त्याखाली बनविलेले कोणत्याही वाचनखूणा किंवा त्याचं हस्तांतरण आपल्या आयता डूआयडीला करू शकता.
जर आपल्याला आपली आयता डूआयडी हटवायची असेल तर मग आपल्याला एक दुसरी आयडी डीफाॅल्ट बनविण्यासाठी नावडावी लागेल. सूचनांसाठी मी आयता डूआयडी कशी सेट करू? ह्याला जावा.
आपण ती स्युडोआयडी हटवू नाही शकत जी आपल्या वापरकर्त्याच्या नावा सारखी आहे, पण आपण तिला बदलू शकता. अधिक माहितीसाठी, कृपया मी माझे वापरकर्त्याचे नाव कसे बदलू? हे पहा. जर आपल्याला स्युडोआयडीच्या ऐवजी आपले खातेच हटवायचे असेल तर मग कृपया मी मझे खाते कसे हटवू? हे पहा.
स्युडोआयडी विवरण म्हणजे काय?
स्युडोआयडी विवरण म्हणजे आपल्या स्युडोआयडी बद्दचं एख छोटंसं स्पष्टीकरण. उदाहरणसाठी, आपल्या ते साईट्स किंंवा रसिकगट जिथे आपण ही स्युडोआयडी वापरली आहे त्यांना सूचीबद्ध करायचं असेल. हे विवरण त्या सर्वांना सापडेल जे साईटमध्ये जन शोध द्वारे प्रवेश करतायत. जर आपल्याला स्वतःबद्दल अजून तपशील द्याचे असतील, तर ते आपण आपल्या खाते-रेखाचित्र (अधिक माहितीसाठी खाते-रेखाचित्र वाविप्र हे पहा) खाली घालू शकता. आपण कधीही आपल्या स्युडोआयडीचं विवरणाची भर करू शकता किंवा त्याचं संपादन करू शकता एका स्युडोआयडीचे संपादन मी कसे करू? मध्ये दिलेला मार्ग पाळून.
मी एक निनावी स्युडोआयडी बनवू शकतो का?
सध्या स्युडोआयडी निनावी नाही बनवू शकत. सारख्या स्युडोआयडीमध्ये मधला फरक सांगण्यासाठी, Archive of Our Own – AO3 (आपला स्वतःचा संग्रह) त्यांना आपल्या वापरकर्त्याचे नावाशी जोडतात. तथापि, आपल्या AO3 खातेशी आपली कृती न जोडता तिचं प्रकाशन करण्यासाठी:
- आपण आपली कृती एका अनधिकृत निनावी संकलन, जसे की रसिककृती निनावी. एका संकलनात कृतीची भर कशी करायची हे शिकण्यासाठी, मी एका संकलनामध्ये कृतीची भर कशी करू? हे पहा. हे ध्यानात ठेवा की ह्या निनावी संकलनांची रचना परिपूर्ण आणि कायमची निनावी देण्यासठी नाही केली गेली होती. आपले वापरकर्त्याचे नाव किंवा स्युडोआयडी संपादकाला उपलब्ध असते आणि तो आपली कृती कोणत्याही वेळी उघडकीस आणू शकतो.
- आपण एक दुसरे AO3 खाते उघडू शकता एक वेगळा ईमेल पत्ता वापरून (अधिक माहितीसाठी मी एक खाते कसे उघडू? हे पहा). त्या दुसऱ्या खात्यावरती त्या कृत्या प्रकाशित करा जे आपल्याला आपल्या मूल खात्याशी संबंधित नको आहेत. हा पर्याय सर्वात सुरक्षित आहे.
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.
