AO3 कोणत्या प्रकारच्या आकडेवारी बद्दलच्या माहितीची नोंदणी ठेवतय?
आपल्याला आपल्या कलाकृतींबाबतची संख्यात्मक माहितीचं सारांश The Statistics (आकडेवारी) ह्या पृष्ठावर सारडेल. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)च्या आकजेवारीचं उदाहरण म्हणजे शब्द संख्या, एका कृतीसाठीच्या वाचनखूणांची संख्या, वापरकर्तांच्या वर्गण्या, कृतीसाठीच्या वर्गण्या, पानटिचक्या आदि. ही माहिती दोन प्रकारात प्रदर्शित केली जाईल – संख्यात्मक व चित्रलेखीय. ही माहिती अनेक स्तरांवर एकत्रीत केली जाऊ शकते, जसकी – आपल्या सर्व कलाकृती, एका विशिष्ठ रसिकगटाशी संबंधित काही कृती, किंवा एक मात्र कृती.
कोणत्याही एका कृतीची आकडेवारी पृष्ठावरची माहिती त्याच्या कृती पृष्ठावरच्या सारांशमधल्या माहिती सारखीच अशणार (ही माहिती कधी बदलू शकते, हे जाणून घेण्यासाठी, कृपया आकडेवारी पृष्ठावरची वाचनखूण संख्या कृती सारांश मधल्या संख्ये पेक्षा का वेगळी आहे? हे पहा). परंतु, आकडेवारी पृष्ठ ती एकच जागा आहे जिथे आपल्याला अनेक कृतींची एकत्रीत केलेली माहिती सापडेल.
मला आकडेवारी कुठे सापडेल?
लॉग इन केल्यावर, "Hi (नमस्कार), [वापरकर्त्याचे नाव]!" हे अभिवादन निवडा. आपल्या Dashboard (दर्शनी फळा)ला जाऊन मेनू मधून "Statistics" (आकडेवारी), हे निवडा.
आपल्याला केवळ एकाच कृतीची आकडेवारी हवी असेल, तर ती आपल्याला त्या कृतीच्या सारांश मध्ये सापडेल. हा सारांश आपण त्या कृतीचा पृष्ठ, एका वापरकर्त्याचा पृष्ठ, एका रसिकगटाचा पृष्ठ, एका संकलनाचा पृष्ठ, किंवा शोध यादी द्वारा पाहू शकता. ह्या प्रकारे मिलवलेली आकडेवारी मध्ये कृतीची शब्द संख्या, प्रकरण संख्या, टाळ्यांची संख्या, सार्वजनिक वाचनखूणांची संख्या, आणि पानटिचक्यांची संख्या, ह्या सर्वांचा समावेश केला जाईल. ही आकडेवारी एका कृती पृष्ठाचे सर्व अभ्यागत पाहू शकताक, त्याच्या कढे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रहा)चे खाते आसो किंवा नसो.
आकडेवारी कोणत्या प्रकारच्या माहितीची नोंदणी ठेवतय?
आपला Statistics (आकडेवारी) पृष्ठ आपल्या कृतीं बद्दलच्या वर्गण्या, पानटिचक्या, टाळ्या, टिप्पणी धागे, व वाचनखूणां बद्दलच्या माहितीची नोंदणी ठेवतय. ही माहिती आपल्या आकडेवारी पृष्ठावर प्रत्येक कृतीच्या आकडेवारी पेटी मध्ये सापडेल. आपण ह्या माहितीची क्रमवारी "Fandoms View" (रसिकगट दृश्या) द्वारे लावू शकता, जेणेेकरून क्रमवारी रसिकगटानुसार लावली जाईल. ह्याच्या व्यतिरिक्त आपण माहितीची क्रमवारी "Flat View" (फ्लॅट दृश्य) द्वारे पण करू शकता, ज्याच्या द्वारे रसिकगटाां बद्दलची माहिती एकत्रीत केली जाते. डीफॉल्ट तयार पृष्ठमांडणी मध्ये, "रसिकगट दृश्य" आणि "फ्लॅट दृश्य", ह्यांची निवड आकडेवारी पृष्ठाच्या मधोमध (चित्रलेखीय व कृतींच्या यादीच्या मध्ये) असलेल्या दोन बटनां द्वारे केली जाऊ शकते.
त्या सोबत, आकडेवारी पृष्ठ आपल्या खात्याची एकत्रीत केलेल्या माहितीची नोंदणी पण ठेवतय. पृष्ठाच्या शीर्षस्थानावर एक "Totals" (संपूर्ण माहिती) नावाची पेटी असते. ह्या पेटी मध्ये आपल्याला वापरकर्त्यांच्या वर्गण्यांच्या संख्ये सकट आपल्या सर्व स्युडोआयडीखाली असलेल्या सर्व कृतींसाठीच्या Kudos (टाळ्या), Comment Threads (टिप्पणी धागे), Bookmarks (वाचनखूणा), Subscriptions (वर्गण्या), Word Count (शब्द संख्या), आणि Hits (पानटिचक्यां) बद्दलची माहिती सापडेल. वर्गण्या, वापरकर्त्यांच्या वर्गण्या, व ह्या दोनी मधला फरक बद्दल अजून माहितीसाठी वर्गणी म्हणजे णजे काय? हे पहा.
वापरकर्त्याची वर्गणी म्हणजे काय?
वापरकर्त्याची वर्गणी एक सूचना प्रणाली आहे त्या वापरकर्त्यांसाठी ज्यांना आपण एक निर्माते म्हणून आवडता. आपण जेव्हा पण एका नवीन कृती किंवा कृतीच्या प्रकरणचं निर्माण करता, तेव्हा त्या वापरकर्त्यांना सूचना मिळते ज्यांनी आपल्याला वर्गणी दिली आहे. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये आपल्याला त्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रहाच्या) वापरकर्त्यांची संख्या मिळेल ज्यांनी आपल्याला वर्गणी दिली आहे. वापरकर्त्यांच्या वर्गण्या आपल्या खात्यासाठी दाखविले जातील, व त्यांचं वर्गीकरण कुठल्यातर एका स्युडोआयडी किंवा रसिकगटानुसार नाही केलं जाऊ शकत.
कृपया हे ध्यानात ठेवा की वापरकर्त्याची वर्गणी आणि केवळ वर्गणी, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; वापरकर्त्यांच्या वर्गण्या एका निर्मात्याच्या सर्व भरांसाठी सूचना उत्पन्न करतात, जेव्हा वर्गण्या फक्त एकाच कृती किंवा लेखमालेसाठी सूचना उत्पन्न करतात. वर्गण्यां बद्दल जर आपल्याला अजून जाणून घ्याचं असेल, तर कृपया वर्गणी म्हणजे काय? हे पहा.
वापरकर्त्यांच्या वर्गण्यां बद्दल अजून माहितीसाठी, कृपया मी एका निर्मात्याला वर्गणी कशी देऊ, किंवा ती कशी मागे घेऊ? हे पहा.
टाळ्या म्हणजे काय?
टाळ्या त्या खूणा आहेत जे हे निर्दिश्ट करतात की एका अभ्यागताला आपली कृती पसंत पडली आहे. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेली टाळ्यांची संख्या म्हणजे आपल्याला आपल्या सर्व कृतींसाठी मिळालेल्या टाळ्यांची एकूण संख्या आहे. टाळ्या म्हणजे काय व ते अपलं कार्य कसं पार पाडतात, ह्या बद्दल अधिक माहितीसाठी कृपया टिप्पणी आणि टाल्या वाविप्र हे पहा.
टिप्पणी धागा म्हणजे काय? टिप्पणी धाग्यांची नोंदणी कशी ठेवली जाते?
टिप्पणी धागे कुठल्यातर संवादा सारखे असतात: एकजण एक टिप्पणी देतो, आणि त्या टिप्पणीसाठी जे सर्व उत्तरे येतात ते सगळेच एका टिप्पणी धाग्याटे भाग बनतात. उदाहरण म्हणजे, जर समजे कोणीतरी आपल्या कृती वरती टिप्पणी दिली आणि म्हणले की "वाह! खूप सुरेख, आपण ह्या साईट वरती अजून काहीतर प्रकाशित केलं आहे का?" आणि मग आपण ह्याचं उत्तर दिलं की "हो! माझ्या इतर कृतींसाठीची ही दुवा!", तर मग ती मूळ टिप्पणी व त्याला आलेली उत्तरे एक टिप्पणी धागा म्हणून पकडली जातात. त्या धाग्याची सुरुवात केलेल्या टिप्पणीला उच्च-स्तराची टिप्पणी पण म्हण्तले जाते.
एका टिप्पणी धाग्या मध्ये फक्त एकच टिप्पणी असू शकते, किंवा अनेक टिप्पण्या पण असू शकतात. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेल्या टिप्पणी धाग्यांची संख्या म्हणजे आपल्या सर्व कृतींच्या टिप्पणी धाग्यांची एकूण संख्या आहे. टिप्पणी धागे व टिप्पण्यां बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया टिप्पणी आणि टाल्या वाविप्र हे पहा.
वाचनखूणा म्हणजे काय? वाचनखूणांची नोंदणी कशी ठेवली जाते?
एक वाचनखूण म्हणजे एक दुवा आहे जी आपल्याला एका कृती मध्ये पटकन प्रवेश मेळवून देते, ती कृती Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चे भाग असो किंवा नसो. वाचनखूणा खूपवेळा त्या कृतींची नोंदणी ठेवायला वापरल्या जातात जे आपल्याला परत वाचायचे आहेत. वाचनखूणा सार्वजनिक असू शकतात किंवा खाजगी पण असू शकतात. सार्वजनिक वाचनखूणा AO3च्या सर्व वापरकर्त्यांना दाखविले जातात. खाजगी वाचनखूणा फक्त त्या AO3च्या वापरकर्त्याला दाखविले जातात ज्यानी ती वाचनखूण बनवली आहे.
एका कृतीच्या सारांश मध्ये त्या कृतीच्या सार्वजनिक वाचनखूणांची संख्या आहे. याउलट, आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेल्या वाचनखूणांची संख्या म्हणजे आपल्या सर्व कृतींसाठी इतरांनी बनविलेल्या वाचनखूणांची एकूण संख्या आहे, ज्याच्यात खाजगी वाचनखूणा पण पकडले जातात. ह्यातल्या फरक बद्दल अजून महितीसाठी, कृपया आकडेवारी पृष्ठावरची वाचनखूण संख्या कृती सारांश मधल्या संख्ये पेक्षा का वेगळी आहे? हे पहा.
वाचनखूणा, आणि सार्वजनिक व खाजगी वाचनखूणां मधल्या फरक बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वाचनखूणा वाविप्र हे पहा.
वर्गणी म्हणजे काय?
वर्गणी, ही एक सूचना प्रणाली आहे त्या वापरकर्त्यांसाठी ज्यांना एका कुठल्यातर कृती किंवा लेखमाले मध्ये रस आला आहे. जेव्हा पण कुठलातर निर्माता एका वर्गणी दिलेल्या कृती किंवा लेखमाले मध्ये एका नवीन प्रकरण किंवा कृतीची भर करतो, तेव्हा त्या सर्व वापरकर्त्यांना एक सूचना मिळते ज्यांनी त्या कृती किंवा लेखमालेला वर्गणी दिली आहे. खूपवेळा वर्गण्या त्या कृती किंवा लेखमालेची नोंदणी ठेवायला वापरल्या जातात जे प्रगतीपथावर आहेत.
कृपया हे ध्यानात ठेवा की वर्गणी आणि वापरकर्त्याची वर्गणी, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; वर्गण्या फक्त एकाच कृती किंवा लेखमालेसाठी सूचना उत्पन्न करतात, जेव्हा वापरकर्त्यांच्या वर्गण्या एका निर्मात्याच्या सर्व भरांसाठी सूचना उत्पन्न करतात. वापरकर्त्यांच्या वर्गण्यां बद्दल जर आपल्याला अजून जाणून घ्याचं असेल, तर कृपया वापरकर्त्याची वर्गणी म्हणजे काय? हे पहा.
आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेल्या वर्गण्यांची संख्या म्हणजे इतरांनी आपल्या सर्व कृतींसाठी दिलेल्या वर्गण्यांची एकूण संख्या आहे. ह्या संख्येत लेखमालेसाठी आलेल्या वर्गण्या नाही पकडले जात. वर्गण्यां बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वर्गण्या आणि फीड वाविप्र हे पहा.
शब्द संख्या म्हणजे काय?
शब्द संख्या आपल्याला हे सांगते की आपल्या कुठल्यातर एका कृती मध्ये किती शब्द आहेत. आपल्याला ही शब्द संख्या एका कृतीच्या सारांश मध्ये मिळू शकते किंवा ती आपल्या आकडेवारी पृष्ठा वरती त्या कृतीच्या शीर्षकाच्या बाजूला मिळेल. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेली शब्द संख्या आपल्या सर्व कृतीं मध्ये असलेल्या शब्दांची एकूण संख्या आहे.
पानटिचकी म्हणजे काय?
पानाटिचक्या हे मोजतात की एका कृती मध्ये कितीदा प्रवेश केला गेला आहे. जेव्हा पण एक अभ्यागत एका कृतीच्या पृष्ठावर जातो, तेव्हा एक पानाटिचकी नोंदविली जाते. ह्याला काही अपवाद आहेत, जसे की:
- जेव्हा एकाच IP पत्त्यावरून सलग दोन वेळा प्रवेश केला जातो, तेव्हा फक्त पहिल्या भेटीची नोंदवणी केली जाते.
- एकाच कृतीच्या प्रकरणांमध्ये पुढे-मागे केल्यास एकच पानाटिचकी नोंदविली जाते; प्रत्येक प्रकरणासाठी एक नाही.
- लॉग इन केल्यास आपण आपल्याच कुठल्यातर कृती मध्ये प्रवेश केल्यावर पानाटिचकी नाही नोंदविली जाणार.
कृपया हे ध्यानात ठेवा की पानाटिचक्या केवळ एखाद्या कृती मध्ये कितीदा प्रवेश केला गेला आहे ह्याची नोंदणी ठेवतात; कुठल्यातर भेटीची कालावधीची नोंदणी इथे नाही केली जात. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये असलेली पानाटिचक्यांची संख्या म्हणजे आपल्याला आपल्या सर्व कृतींसाठी मिळालेल्या पानाटिचक्यांची एकूण संख्या आहे.
मला वर्गणी कोणी दिली आहे, ह्याचा शोध मी करू शकतो का?
आपण हे तर जाणून नाही घेऊ शकत की आपल्याला कोणी वर्गणी दिली आहे, पण आपल्याला किती जणांनी वर्गणी दिली आहे हे आपण नक्कीच जाणून घेऊ शकता. आपल्या Statistics (आकडेवारी) पृष्ठा (सूचनांसाठी कृपया मला आकडेवारी कुठे सापडेल? हे पहा) वरती असलेल्या Totals (संपूर्ण माहिती) पेटी मध्ये आपल्याला आपल्या वापरकर्त्यांच्या वर्गण्या आणि वर्गण्यांची एकूण संख्या सापडेल. ह्या वैशिष्ट्यां बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वर्गणी म्हणजे काय? आणि वापरकर्त्याची वर्गणी म्हणजे काय? हे पहा.
फक्त एका कृतीच्या वर्गणीदारांची संख्या आपल्याला आकडेवारी पृष्ठा वरती थोड़ खाली त्या कृतीच्या आकडेवारी पेटी मध्ये सापडेल. उदाहरण म्हणजे, पेटी मध्ये "Subscribers: 5" (वर्गणीदार: ५) असे दिले जाऊ शकतय. जर एका कृतीला कोणी वर्गणी दिली नसेल, तर मग त्या कृतीच्या आकडेवारी पेटी मध्ये वर्गणीदार, हा भागच दाखविला जाणार नाही.
माझ्या कृतीला वाचनखूण कोणी लावली आहे, ह्याचा शोध मी करू शकतो का?
हो, आपल्या कृतीला कोणी सार्वजनिक वाचनखूण लावली आहे, हे आपण जाणून घेऊ शकता. एका किठल्यातर कृतीच्या सारांश मध्ये आपल्याला त्या लोकांची यादी मिळेल ज्यांनी त्या कृतीसाठी सार्वजनिक वाचनखूण लावली आहे. हा सारांश आपल्याला त्या कृतीचं पृष्ठ, एका वापरकर्त्याचं खाते-रेखाचित्र पृष्ठ, एका रसिकगटाचं पृष्ठ, एका संकलनाचं पृष्ठ, किंवा शेध यादी द्वारे मिळू शकतो. उदाहरण म्हणजे, एका कृतीच्या सारांश मध्ये "Bookmarks: 9" (वाचनखूणा: ९) असे दिले जाऊ शकतय. हा आकडा त्या सूचीसाठी एक दुवा आहे ज्याच्यात त्या कृतीसाठीच्या सर्व वाचनखूणा आहेत. खाजगी वाचनखूणा इथे नाही दाखविले जाणार. जर सारांश किंवा माहिती पेटी मध्ये "Bookmarks" (वाचनखूणा) भागच नसेल, तर ह्याचा अर्थ हा आहे की एक पण सार्वजनिक वाचनखूणा नही आहेत.
वाचनखूणां बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वाचनखूणा वाविप्र हे पहा.
आकडेवारी पृष्ठावरची वाचनखूण संख्या कृती सारांश मधल्या संख्ये पेक्षा का वेगळी आहे?
एका कृतीचं सारांश एक वेगळी वाचनखूण संख्या दाखवतय कारण ते केवळ त्या कृतीसाठी बनवलेल्या सार्वजनिक वाचनखूणांची संख्या दाखवतय. Statistics (आकडेवारी) पृष्ठ प्रत्येक कृतीसाठीच्या वाचनखूणांची एकूण संख्या दाखवतय, ज्याच्यात खाजगी वाचनखूणा पण असतात.
वाचनखूणां बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया वाचनखूणा वाविप्र हे पहा.
मी आकडेवारीची क्रमवारी कशी लावू?
आपण आकडेवारीची क्रमवारी कृतींच्या प्रकाशण वर्ष, भरांचा तारीख, Hits (पानटिचक्या), Kudos (टाळ्या), number of Comment Threads (टिप्पणी धाग्यांची संख्या), Bookmarks (वाचनखूणा), Subscriptions (वर्गण्या), or Word Count (शब्द संख्या) अनुसार लावू शकता, जी चढत्या किंवा उतरत्या क्रमात असू शकतात. हे पर्याय (जे तयार पृष्ठमांडणी मध्ये बटण म्हणून उपलब्ध असतात) Totals (संपूर्ण माहिती) पेटीच्या खाली असतात. निवडलेलं बटण तो पर्याय दाखवतय ज्याच्या प्रमाणे आपण सध्या क्रमवारी लावत आहात.
प्रत्येक पर्यायासाठी एक बाणाचं चिन्ह असतय जे हे सांगतय की कृतींची क्रमवारी चढत्या (सर्वात कमी ते सर्वोच्च) क्रमात लावली जाणार की उतरत्या (सर्वोच्च ते सर्वात कमी). हा क्रम बदलण्यासाठी तो पर्याय (जो तयार पृष्ठमांडणी मध्ये बटण म्हणून उपलब्ध असतो) परत निवडा ज्याच्यामुळे तो क्रम बदलेल.
आपण आपल्या आकडेवारी पृष्ठाची क्रमवारी अशी लावली जाऊ शकते की फक्त कुठल्यातर एका वर्षात प्रकाशित केलेल्या कृतींची क्रमवारी दाखवली जाईल. हे पर्याय (जे तयार पृष्ठमांडणी मध्ये बटण म्हणून उपलब्ध असतात) संपूर्ण माहिती पेटीच्या वरती असतात. आपण एक वर्ष (किंवा सर्व वर्षे) निवडू शकता आणि मग वरती दिलेल्या कुठल्यातर पर्यायानुसार आपल्या आकडेवारीची क्रमवारी लावू शकता.
जेव्हा आपण आपल्या आकडेवारी पृष्ठाची क्रमवारी एका विशिष्ठ वर्षानुसार करता, तेव्हा केवळ त्या कृती दाखविल्या जाणार ज्या त्या वर्षात समाप्त झाल्या होत्या. परंतु, अशी क्रमवारी लावून मिळवलेल्या कृतींची आकडेवारी मात्र सध्याचीच असणार. उदाहरण म्हणजे, जर आपण आकडेवारी पृष्ठाची क्रमवारी फक्त २०१२ मध्ये समाप्त झालेल्या कृतींची आकडेवारी दाखवली जाणार अशी लावली, तर मग इतर वर्षांमध्ये संपलेल्या कृती नाही दाखविल्या जाणार. जे कृती दाखविले जातील, त्यांची पानटिचक्या, टाळ्या आदिंची संख्या २०१२ ऐवजी आजच्या तारखेसाठी दाखवली जाणार.
संपूर्ण माहिती पेटी मध्ये असलेली वापरकर्त्यांच्या वर्गण्यांची संख्या नेहमी सध्याच्या वापरकर्त्यांच्या वर्गण्यांची संख्याच दाखवणार जरी क्रमवारी कुठल्यातर वर्षानुसार लावली असेल.
एका रसिकगट पृष्ठ किंवा शोध परिणाम पृष्ठा वरती कृतींची क्रमवारी आकडेवारीनुसार लावली जाऊ शकते. कृती चाळताना किंवा शोधताना आकडेवारीचा उपयोग कसा केला जाऊ शकतो, ह्या बद्दल अधिक माहितीसाठी, कृपया "Search Within Results" (मिळालेल्या यादीतून शोधणे) फील्ड शिकवणीl हे पहा.
मी रसिकगटानुसार माझ्या आकडेवारीची क्रमवारी कशी लावू?
"Fandoms View" (रसिकगट दृश्य) आणि "Flat View" (फ्लॅट दृश्य), हे बटण आपल्याला आपली आकडेवारी वेगवेगळ्या प्रकारे बघू देतात. जेव्हा आपण "रसिकगट दृश्य" निवडता, तेव्हा आपल्या कृती व त्यांच्या आकडेवारीचं वर्गीकरण रसिकगटानिसार केलं जाईल. त्या कृती ज्यांच्यासाठी अनेक टाचनखूणांचा वापर केला गेला आहे, ते त्या प्रत्येक रसिकगटासाठी एकएकदा दाखविल्या जातील, ज्यांच्या टाचनखूणांचा वापर त्या कृतींसाठी केला गेला आहे. याउलट, जेव्हा आपण "फ्लॅट दृश्य" निवडता, तेव्हा आपल्या कृती व त्यांच्या आकडेवारीचं वर्गीकरण एकत्रच केलं जाईल
मला माझ्या प्रश्नाचे उत्तर इथे नाही सापडलं, तर ते कुठे मिळु शकतय?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिले गेले आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे आपल्याला नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.
