Archive FAQ > वर्गण्या आणि फीड

वर्गण्या काय आहेत आणि त्याचा उपयोग काय?

वर्गण्या Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर नव्या कलाकृतींचं लक्ष ठेवण्याचा मार्ग आहे. तुम्ही वर्गण्या वैयक्तिक वापरकर्ता, वैयक्तिक रसिककृती, आणि लेखमालेच्या अद्ययावत चे लक्ष ठेवायला वापरू शकता. जेव्हा तुम्ही एका वापरकर्त्या चे वर्गणीदार होता, तेव्हा तुम्हाला ईमेल अधिसूचना मिळेल ज्याच्यात त्यांनी प्रकाशित केलेल्या नव्या रासिककृती किंवा प्रकरण्याच्या दुवा असतील. जेव्हा तुम्ही एका वैयक्तिक रासिककृती किंवा लेखमाला चे वर्गणीदार होता, तेव्हा तुम्हाला ईमेल अधिसूचना मध्ये दुवा मिळतील ज्या तुम्हाला त्या अद्ययावत केलेल्या भागावर घेऊन जातील. आम्ही या विशिष्ट गुणाचा सतत विकास करत आहोत.

मी माझ्या वर्गण्या कसं सांभाळू शकते?

जेव्हा तुम्ही येण्याची नोंद करता, ही ग्रीटिंग निवडा "Hi, (सदस्यनाम)!" आणि नॅविगेशन मेनू मधून निवडा "My Subscriptions" (माझ्या वर्गण्या). जर तुम्ही तुमच्या Dashboard (दर्शनी फळा) वर आहात, तर तुम्ही नॅविगेशन मेनू मधून "Subscriptions" (वर्गण्या) पण निवडू शकता जे तुम्हाला तुमच्या मूलभूत पृष्ठमांडणी च्या डावीकडे किंवा तुमच्या मोबाइल चाळकाच्या सगळ्यात वरती मिळेल. तुमच्या वर्गण्याच्या पृष्ठावर, तुम्हाला त्या वापरकर्ते आणि रासिककृत्यांची यादी मिळेल ज्यांना तुम्ही वर्गणीदार आहात. सगळ्या रासिककृती आणि लेखमाला दुवा म्हणून प्रदर्शित आहेत, ज्या तुम्हाला त्या रासिककृती च्या पृष्ठावर घेऊन जातील. सगळे वापरकर्ते दुवा म्हणून प्रस्तुत आहेत ज्या तुम्हाला त्यांच्या दर्शनी फळा वर घेऊन जातील. तुम्ही या पृष्ठावर वापरकर्ते, रासिककृती किंवा लेखमाला ची वर्गणी रद्द करू शकता, "Unsubscribe" (वर्गणी रद्द करणे) ह्या बटण ला निवडून जी तुम्हाला दर नोंदीच्या बाजुला दिसेल.

तुम्ही तुमच्या यादी ला आमचे वर्गीकरण तंत्र वापरुन या गोष्टी पर्यंत मर्यादित करू शकता : "Series Subscriptions" (लेखमाला वर्गण्या), "User Subscriptions" (वापरकर्ता वर्गण्या) "Work Subscriptions" (रासिककृती वर्गण्या), तर तुम्ही सहजपणे तुम्हाला जे हवं ते शोधू शकता. तुमच्या वर्गण्या गाळणी लावून निवडण्यासाठी बटण मूलभूत पृष्ठमांडणी मध्ये 'माझ्या वर्गण्या' या पृष्ठाच्या सगळ्यात वरती मिळेल.

मी एका वापरकर्त्या ला वर्गणीदार कसं किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?

तुम्ही एका वापरकर्त्याला वर्गणीदार त्यांच्या दर्शनी फळा वरून करू शकता (http://archiveofourown.org/users/वापरकर्ता). "Subscribe" (वर्गणीदार होणे) या बटण ला निवडून जेव्हाही वापरकर्ता एक नवं प्रकरण किंवा रासिककृती प्रकाशित करतील, तेव्हा तुम्हाला ईमेल प्राप्त होईल. त्यामुळे त्या वापरकर्त्यांनी कोणतंही स्युडोआयडी वापरुन नवं रासिककृती प्रकाशित केली असेल तरीही तुम्हाला ईमेल अधिसूचना प्राप्त होईल. स्युडोआयडी कशे वापरले जातात ह्यावर आणखीन माहिती साठी, हे बघा स्युडोआयडी काय असते?

जेव्हा तुम्ही एका वापरकर्त्या चे वर्गणीदार असता, त्यांच्या दर्शनी फळा च्या पृष्ठावर सगळयात वरती एक "Unsubscribe" (वर्गणी रद्द करा) हे बटण असेल. हे निवडून तुम्ही तुमची वर्गणी रद्द करू शकता आणि ईमेल प्राप्त करणे थांबवू शकता. तुम्ही तुमच्या My Subscriptions (माझ्या वर्गण्या) या पृष्ठावर पण त्या वापरकर्त्या ची वर्गणी रद्द करू शकता, "Unsubscribe from [वापरकर्ता]" (वापरकर्त्यांची वर्गणी रद्द करणे) हे बटण निवडून. वर्गणी रद्द करण्या साठी एक दुवा तुमच्या वर्गणी च्या ईमेल मध्ये सगळयात खाली पण उपलब्ध आहे.

वर्गण्या कशा सांभाळायच्या ह्याच्यावर अधिक माहिती साठी, कृपया हे बघा मी माझ्या वर्गण्या कशा सांभाळू शकते?

मी एका रासिककृती किंवा लेखमाला ला वर्गणीदार किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?

ज्या रासिककृती किंवा लेखमाला ला तुम्हाला वर्गणीदार व्हायचं आहे त्याच्या पृष्ठावर जाऊन त्याच्या सगळ्यात वर असणारं "Subscribe" (वर्गणीदार होणे) हे बटण निवडा म्हणजे जेव्हाही नवं प्रकरण किंवा रासिककृती प्रकाशित होईल तेव्हा तुम्हाला ईमेल अधिसूचना प्राप्त होईल.

जेव्हा तुम्ही कोणत्याही रासिककृती किंवा लेखमाला चे वर्गणीदार असता, तेव्हा पृष्ठाच्या सगळ्यात वरती असलेले "Subscribe" च बटण, हे "Unsubscribe" (वर्गणी रद्द करणे) या बटण मध्ये बदलून जातं. ह्याला निवडून तुम्ही तुमची वर्गणी रद्द करू शकता आणि ईमेल अधिसूचना प्राप्त करणे थांबवू शकता. तुम्ही तुमची वर्गणी रद्द My Subscriptions (माझ्या वर्गण्या) या पृष्ठावर जाऊन "Unsubscribe from [रासिककृती शीर्षक]" (रासिककृतीची वर्गणी रद्द करणे) हे बटण निवडून पण करू शकता. एक वर्गणी रद्द करण्याची दुवा सगळ्या वर्गणीच्या ईमेल मध्ये सगळ्यात खाली पण उपलब्ध आहे.

वर्गण्या कशा सांभाळायच्या ह्याच्या आणखीन माहिती साठी, कृपया हे बघा मी माझ्या वर्गण्या कशा सांभाळू शकते?

मी संकलन किंवा आव्हान ला वर्गणीदार होऊ शकते का?

सध्या नाही.

संकलन बद्दल आणखीन माहिती साठी, कृपया हे बघा संकलन वाविप्र.

मी माझ्या वरगाण्यांचं लक्ष ईमेल प्राप्त न करता ठेवू शकते का?

सध्या वर्गण्या ह्या केवळ ईमेल सेवा आहे.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरती असलेल्या रासिककृतींचा आनंद घ्यायला आणि त्यांचा मागोवा ठेवायला आणखी काही मार्गांबद्दल जाणून घेण्या साठी – हे बघा शोधणे आणि ब्राउस वाविप्र,रासिककृती उपलब्ध करणे वाविप्र,वाचनखूण वाविप्र,इतिहास आणि नंतर वाचण्यासाठी खूण करणे वाविप्र,आणि उतरवलेले विदे वाविप्र.

वरगाण्यांच्या ईमेल अधिसूचना कशा पाठवल्या जातात?

ईमेल अधिसूचना ह्या संग्रहाने नियमितपणे पाठवले जातात. जर तुम्ही वर्गणीदार असलेल्या कोणतीही रासिककृती, लेखमाला किंवा वापरकर्ता अद्ययावत त्या कालावधी मध्ये झाले असेल तर तुम्हाला एक ईमेल प्राप्त होईल ज्याच्यात अद्ययावत केलेल्या गोष्टीची दुवा असेल. जर तुम्ही वर्गणीदार असलेल्या कोणत्याही रासिककृती, लेखमाला किंवा वापरकर्ता जर वेगाने अद्ययावत करतात तर तुम्हाला एक ईमेल मध्ये सगळ्या अद्ययावतांचे दुवा प्राप्त होतील.

कृपया नोंद घ्यावी की काही ईमेल प्रणाली वर्गणींच्या ईमेल ला गाळणी लावून निवडून कचरा फोल्डर मध्ये टाकून देतात. सगळे वर्गणीदार ईमेल [email protected] ह्या पत्त्यावरून येतात आणि तुम्ही या पत्त्याला विश्वासार्ह मान्य करू शकता म्हणजे तुम्ही ईमेल गमावणार नाही. एका पत्त्याला विश्वासार्ह मान्य कसे करायचे हे समजण्यासाठी कृपया तुमच्या ईमेल प्रदाता च्या मदत फाइल चा सल्ला घ्या.

एका वापरकर्त्या चं वर्गणीदार कसं व्हायचं हे जाणून घ्यायला कृपया बघा मी एका वापरकर्त्या ला वर्गणीदार कसं किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते? एका रासिककृती किंवा लेखमाला चं कसं वर्गणीदार व्हायचं हे जाणून घ्यायला कृपया बघा मी एका रासिककृती किंवा लेखमाला ला वर्गणीदार किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?

एक फीड काय असते आणि त्याचा उपयोग काय?

एक फीड वापरुन तुम्ही तुमचं स्वतःचं "बातम्या पृष्ठ" बनवू शकता जे वेगवेगळ्या टाचणखुणांचे अद्ययावत एका जागेवर तुम्हाला दाखवतील. तुम्ही एक फीड वापरुन सर्वाधिक सर्वसाधारण टाचणखुणा, यासह अधिटाचणखूणा, नात्यांचं टाचणखुणा, आणि व्यक्तिरेखा टाचणखुणांना वर्गणीदार होऊ शकता पण अतिरिक्त टाचणखुणांना नाही. या टाचणखुणांशी संबंधित जेवढेही रासिककृत्या असतील ते तुम्हाला तुमच्या फीड मध्ये दिसतील कारण सर्वसाधारण टाचणखुणा हे त्याच्याशी संबंधित सर्व समानार्थी टाचणखुणांना गोळा करतं - उदाहरणार्थ, हे समानार्थी #SPN tag आणि हे सर्वसाधारण Supernatural tag - एकत्र. पण जर काही बदललं गेलं आणि ज्या टाचणखुणांना तुम्ही वर्गणीदार आहात ते आता सर्वसाधारण म्हणून चिन्हांकित केलं जात नाही, तर तुमची फीड काम करेल पण ते टाचणखुण आता त्याच्याशी संबंधित समानार्थी टाचणखुणा गोळा करणार नाही. एक फीड तेव्हाच अद्ययावत होईल जेव्हा ती रासिककृती मूलतः प्रकाशित केली जाईल; जेव्हा वापरकर्ता रासिककृती ची अद्ययावत करेल तेव्हा अधिसूचना दिली जाणार नाही. एक फीड तुम्ही तुमच्या वैयक्तिक वापरासाठी समर्पित फीड वाचक मध्ये गोळा करू शकता किंवा फ़ीड वेगळ्या वेबसाइट उदाहरणार्थ - लाईव्हजर्नल, ड्रीमविड्थ आणि टंब्लर सारख्या साइटवर संयुक्तिक रित्या प्रसिद्ध केले जाऊ शकतात, ज्याचे अनुसरण कोणीही करू शकते. तुम्हाला Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) कडून कोणत्याही टाचणखूण बद्दल ईमेल अधिसूचना मिळणार नाही.

सर्वसाधारण टाचणखुणा बद्दल आधिक माहिती साठी, हे बघा 'सर्वसाधारण' टाचणखुणा कशे काम करतात?

मी एक फीड वाचक ची स्थापना कशी करू शकते?

काही चाळक मानक, समाकलीत फीड वाचक पुरवतात जे तुम्ही चाळकाच्या मेनू मध्ये उजवीकडून मिळवू शकता. सर्वाधिक चाळक मानक वैशिष्ट्ये च्या ऐवजी वरून जोडलेले फीड वाचक वापरतात, पण काही चाळकांना हे फीड वापरायला वरून जोडलेल्या वैशिष्ट्ये किंवा विस्तार ची गरज असते. तुम्ही ऑनलाइन फीड वाचक किंवा एप्प फीड वाचक वापरू शकता जे कोणत्याही चाळकाशी संबंधित नाहीत. एक फीड वाचक निवडणं हे बहुतांशी तुमच्या वैयक्तिक प्राधान्यावर अवलंबून आहे. Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चे फीड मिळवण्या साठी एकमात्र आवश्यकता ही आहे की तुमच्या फीड वाचक चे Atom फीड स्वरूपाला समर्थन असायला पाहिजे. कृपया नोंद घ्यावी की सगळे फीड वाचक वेगळ्या तऱ्हेने काम करतात. जर तुम्हाला काहीही अडचण येत असेल तर तुमच्या फीड वाचक च्या मदत फाइल तुम्हाला तुमचं फीड वाचक स्थापित करायला मदत करतील.

एकदा तुम्ही निवडलेलं फीड वाचक उतरवून घ्याल किंवा सक्रिय कराल, तेव्हा तुम्हाला फक्त ज्या टाचणखूणा हव्या आहेत त्याचे वर्गणीदार बना. पहा मी एका फीड ची वर्गणीदार किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते?

कृपया नोंद घ्यावी की वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही, आणि टाचणखूण संबंधित जेवढ्याही रासिककृती असतील त्या तुमच्या फीड मध्ये दिसतील.

सर्वसाधारण टाचणखुणा बद्दल आणखीन माहिती साठी, पहा 'सर्वसाधारण' टाचणखुणा कशे काम करतात?हा प्रश्न टाचणखुणा च्या वाविप्र मध्ये.

मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते?

तुमच्या फीड वाचक ला एक वर्गणी जोडायला, फक्त एक टाचणखुण निवडा - उदाहरणार्थ, the Naruto fandom tag-मग निवडा "RSS Feed" (RSS फीड) बटण, जे तुम्हाला मूलभूत पृष्ठमांडणी मधल्या टाचणखुणा च्या पृष्ठावर उजवीकडे सगळ्यात वर मिळेल. चाळक-एकात्मिक फीड वाचक साठी, सामान्यतः तुम्ही फक्त टाचणखुणा च्या पृष्ठावर "RSS फीड" चं बटण निवडलं की तुम्हाला वर्गणीदार व्हायला उद्युक्त केलं जाईल. ऑनलाइन फीड वाचक सोबत, आवश्यक असू शकतं की तुम्हाला फीड चं URL ला कॉपी करून तुमच्या फीड वाचक च्या "फीड जोडा" सर्च बॉक्स मध्ये प्रविष्ट करावं लागेल. फीड चं URL "RSS फीड" बटण ला निवडून जे पृष्ठ उघडतं त्याच्यावर उपलब्ध असतो.

जर तुम्हाला असं वाटतं आहे की तुम्हाला फीड वाचक वापरायचं आहे पण त्या संबंधी आणखीन माहिती हवी आहे, तर कृपया हे बघा मी एक फीड वाचक ची स्थापना कशी करू शकते?

एका वेगळ्या वेबसाइट, जसं लाईव्हजर्नल, ड्रीमविड्थ, किंवा टंब्लर वरची संयुक्तिक रित्या प्रसिद्ध केलेल्या फीड ला जर तुम्हाला वर्गणीदार व्हायचं असेल तर, तुम्हाला त्या फीड चा शोध घ्यावा लागेल, आणि मग त्या ब्लॉग किंवा नियतकालिक ला वर्गणीदार तुम्ही होऊ शकता. लाईव्हजर्नल आणि ड्रीमविड्थ दोन्ही कडे फीड विषयी मदत फाइल आहेत, आणि दोन्ही कडे अस्तित्वात असलेले फीड साठी शोध घ्यायला सोपे पर्याय आहेत. टंब्लर वर तुम्हाला फक्त तुमच्या आवडणाऱ्या अस्तित्वात असलेल्या फीड ब्लॉग साठी शोध घ्यायचा आहे, मग त्या ब्लॉग ला तुम्ही वर्गणीदार होऊ शकता, ज्या मुळे त्या टाचणखुणाशी संबंधित जेवढ्या पण रासिककृती असतील त्या तुम्हाला तुमच्या टंब्लर च्या दर्शनी फळावर दिसतील.

एका फीड ची वर्गणी तुम्ही रद्द करायची असल्यास तुम्ही ते तुमच्या फीड वाचक किंवा वापरलेल्या साइट वरून करू शकता. हे कसं करायचं हे तुमच्या फीड वाचक किंवा वापरलेल्या वेबसाइट वरती असलेल्या मदत फाइल बघून तुम्हाला कळेल.

कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या हे वापरकर्ते बनवतात आणि वेगळ्या वेबसाइट सादर करतात. Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चा संघ हे सांभाळत किंवा गाळणी लावून निवडत नाही. वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही, आणि टाचणखूण संबंधित जेवढ्याही रासिककृती असतील ते तुमच्या फीड मध्ये दिसतील.

फीड आणि लाईव्हजर्नल, ड्रीमविड्थ, टंब्लर (किंवा आणखीन कोणतीही साइट जी तुम्ही निवडली आहे) वरती प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या बद्दल आणखीन माहिती साठी, कृपया त्यांच्या मदत फाइल चा सल्ला घ्या.

मी एक संयुक्तिक रित्याची फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एकही अस्तित्वात नाही?

जर तुम्ही तुमच्या निवडलेल्या वेबसाइट वर शोध घेतलेला आहे आणि तुमच्या टाचणखूण साठी एकही संयुक्तिक रिती फीड अस्तित्वात नाही, तर तुम्ही एक बनवू शकता. फीड साठी कसं शोध घ्यायचा ह्यावर आणखीन जाणून घ्यायला, कृपया मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते?पहा. बरेच वेबसाइट प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्यांना समर्थन देतात, आणि सगळ्या वेबसाइट चे प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्यांसाठी वेग - वेगळ्या आवश्यकता किंवा प्रक्रिया असतात.

फीड आणि लाईव्हजर्नल, ड्रीमविड्थ, टंब्लर (किंवा आणखीन कोणतीही साइट जी तुम्ही निवडली आहे) वरती प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या बद्दल आणखीन माहिती साठी, कृपया त्यांच्या मदत फाइल चा सल्ला घ्या.

कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या हे वापरकर्ते बनवतात आणि वेगळ्या वेबसाइट सादर करतात. Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चा संघ हे सांभाळत किंवा गाळणी लावून निवडत नाही. वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही आहे, आणि टाचणखूण संबंधित जेवढेही रासिककृती असतील ते तुमच्या फीड मध्ये दिसतील.

मी अधिटाचणखूण वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?

हो. कृपया नोंद घ्या की जेव्हा तुम्ही अश्या अधिटाचणखूण ला वर्गणीदार होता ज्याच्यामद्धे खूप उप टाचणखूणा आहेत, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्यासंबंधित टाचणखूण चे अद्ययावत मिळतील.उदाहरणार्थ, जर तुम्ही Marvel fandom tag ला वर्गणीदार झाला तर त्याच्यात Captain America (Movies), X-Men: First Class (2011), Marvel 616, Iron Man (Comics), आणि इतर टाचणखूण ज्या या अधिटाचणखूणाशी संबंधित आहेत समाविष्ट होतील.

कृपया पहा मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते? फीड ला वर्गणीदार कसं वाहायचा ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला. किंवा पहा मी एक संयुक्तिक रित्याची फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एकही अस्तित्वात नाही? फीड कशी बनवायची ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला.

कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या हे वापरकर्ते बनवतात आणि वेगळ्या वेबसाइट सादर करतात. Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चा संघ हे सांभाळत किंवा गाळणी लावून निवडत नाही. वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही आहे, आणि टाचणखूण संबंधित जेवढेही रासिककृती असतील ते तुमच्या फीड मध्ये दिसतील.

अधिटाचणखूण बद्दल आणखीन माहिती साठी, पहा अधिटाचणखूण.

टाचणखूण बद्दल आणखीन माहिती साठी, तुम्ही हे बघू शकता शिकवणी: AO3 वर टाचणखूणा.

मी नात्यांचं टाचणखूण वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?

हो. ही फीड बाकी सगळ्या फीड सारखीच काम करेल आणि त्या सगळ्या रासिककृती सह अद्ययावत होईल ज्या त्या नात्यांचं टाचणखूण आणि त्या टाचणखूणी चे सर्व प्रकार जे त्या संबंधि आहेत.

कृपया पहा मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते? फीड ला वर्गणीदार कसं वाहायचा ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला. किंवा पहा मी एक संयुक्तिक रित्याची फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एक अस्तित्वात नाही? फीड कशी बनवायची ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला.

कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या हे वापरकर्ते बनवतात आणि वेगळ्या वेबसाइट सादर करतात. Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चा संघ हे सांभाळत किंवा गाळणी लावून निवडत नाही. वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही आहे, आणि टाचणखूण संबंधित जेवढ्याही रासिककृती असतील ते तुमच्या फीड मध्ये दिसतील.

टाचणखूण बद्दल आणखीन माहिती साठी, तुम्ही हे बघू शकता शिकवणी: AO3 वर टाचणखूण.

मी व्यक्तिरेखा टाचणखूण वापरणारे फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?

हो. ही फीड बाकी सगळ्या फीड सारखीच काम करेल आणि त्या सगळ्या रासिककृती सह अद्ययावत होईल ज्या त्या व्यक्तिरेखा टाचणखूण आणि त्या टाचणखूणी चे सर्व प्रकार जे त्या संबंधी आहेत.

कृपया पहा मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते? फीड ला वर्गणीदार कसं वाहायचा ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला. किंवा पहा मी एक संयुक्तिक रित्या प्रसिद्ध फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एक अस्तित्वात नाही? फीड कशी बनवायची ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला.

कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्ध केलेल्या संयुक्तिक रित्या हे वापरकर्ते बनवतात आणि वेगहल्या वेबसाइट सादर करतात. Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) चा संघ हे सांभाळत किंवा गाळणी लावून निवडत नाही. वापरकर्ता टाचणखूण कसं वापरतात ह्याच्यावर AO3 चं काही नियंत्रण नाही आहे, आणि टाचणखूण संबंधित जेवढ्याही रासिककृती असतील ते तुमच्या फीड मध्ये दिसतील.

टाचणखूण बद्दल आणखीन माहिती साठी, तुम्ही हे बघू शकता शिकवणी: AO3 वर टाचणखूण.

मी अतिरिक्त टाचणखुणा वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?

नाही, अतिरिक्त टाचणखुणा, ज्याला मुक्तघडण टाचणखुणा पण म्हटलं जातं, जे तुम्हाला Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर मिळतात, त्या वापरणाऱ्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकत नाही.

टाचणखूण बद्दल आणखीन माहिती साठी, तुम्ही हे बघू शकता शिकवणी: AO3 वर टाचणखूणा.

मी एका गाळणी लावून निवडलेल्या फीड ला वर्गणीदार होऊ किंवा नवं फीड बनवू शकते का?

नाही. उदाहरणार्थ, एक नवी फीड बनवणं जी फक्त works tagged Spock/Nyota Uhura गोळा करेल जे Star Trek: Alternate Original Series (Movies) fandom tagमध्ये आधारित असतील हे शक्य नाही. तुम्हाला ते सगळे रासिककृती मिळतील ज्या मध्ये "Spock/Nyota Uhura" नात्याचं टाचणखूण असेल, आणि ह्या टाचणखूण चे सर्व प्रकार तुमच्या फीड मध्ये मिळतील. जरी तुम्ही "RSS Feed" (RSS फीड) हे बटण अश्या पृष्ठावर निवडले ज्यात तुमच्या निवडलेल्या टाचणखूण चे गाळणी लावून निवडलेले शोध परिणाम असतील, तरीही तुम्हाला सगळेरासिककृती मिळतील जे त्या टाचणखूण ला समाविष्ट किंवा संबंधित असतील.

कृपया पहा मी एका फीड ला वर्गणीदार होऊ किंवा वर्गणी रद्द कशी करू शकते? फीड ला वर्गणीदार कसं वाहायचा ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला. किंवा पहा मी एक संयुक्तिक रित्या प्रसिद्ध फीड कशी बनवू शकते जर माझ्या रासिकगटासाठी एक अस्तित्वात नाही? फीड कशी बनवायची ह्याची प्रक्रिया जाणून घ्यायला.

मला अदृश्य किंवा अनामिक कलाकृती बद्दल ईमेल किंवा फीड अधिसूचना मिळेल का?

अदृश्य रासिककृती ती रासिककृती असते जी प्रकाशित केली गेली आहे पण दृश्यापासून लपलेली आहे. जर तुम्ही वर्गणीदार असलेल्या एका वापरकर्त्या ने अदृश्य रासिककृती प्रकाशित केली तर तुम्हाला तो पर्यन्त वर्गणी अधिसूचना नाही मिळणार जोपर्यंत ती रासिककृती दृश्य होत नाही. पूर्वी अदृश्य असणारे रासिककृती फीड मध्ये दिसणार नाही जरी ते दृश्य झाले तरी, कारण की प्रकाशित होण्याची तारीख निघून गेलेली आहे.

अनामिक रासिककृती ती रासिककृती असते ज्याच्या प्रकाशनाच्या वेळी 'अनामिक द्वारा' असं लेखकाची नामरेषा वर लिहलेलं असेल, आणि निर्माता चं सदस्यनाम लपलेलं असेल. जर तुम्ही वर्गणीदार असलेल्या एका वापरकर्त्या ने अनामिक रासिककृती प्रकाशित केली तर तुम्हाला वर्गणी अधिसूचना नाही मिळणार जोपर्यंत ते त्याला नामीक नाही करत. तरीही अनामिक रासिककृत्या फीड मध्ये दिसतील"अनामिक" या निर्माता च्या नावा खाली.

कृपया बघा मी एका वापरकर्त्या ला कसं वर्गणीदार कसं किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?वापरकर्त्यांना वर्गणीदार कसं होऊ शकतो ह्याच्या प्रक्रिया साठी.

मला प्रतिबंधित रासिककृती च्या ईमेल किंवा फीड अधिसूचना मिळतील का?

प्रतिबंधित रासिककृत्या त्या असतात ज्यात परवानगी अश्या ठेवल्या आहेत की फक्त येण्याची नोंद केलेले Archive of our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वापरकर्ते त्याला बघू शकतात. जर तुम्ही त्या रासिककृती, लेखमाला, किंवा वापरकर्त्या चे वर्गणीदार आहात तर तुम्हाला ईमेल अधिसूचना मिळेल, पण प्रतिबंधित रसिककृत्या फीड मध्ये समाविष्ट केल्या जात नाही.

कृपया बघा मी एका वापरकर्त्या ला कसं वर्गणीदार कसं किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?वापरकर्त्यांना वर्गणीदार कसं होऊ शकतो ह्याच्या प्रक्रिया साठी. पहामी एका रासिककृती किंवा लेखमाला ला वर्गणीदार किंवा वर्गणी कशी रद्द करू शकते?एका रासिककृती किंवा लेखमाला ला कसं वर्गणीदार व्हायचं ह्या प्रक्रिया साठी.

मला माझ्या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही, तर ते कुठे मिळु शकते?

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.