मी AO3 वरती यूजरस्क्रिप्टस कसे वापरू शकतो?
यूजरस्क्रिप्टस आपल्या ब्राऊजर च्या वेबपेजेस मध्ये भर आणि बदल करू शकतो, ज्यामुळे आपल्याला Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये काही छान गोष्टी करता येतील ज्या आपल्याला एरवी करता आल्या नसत्या. नोंद असूद्या की आपण खुद्द AO3 मध्ये बदल करीत नाही, तर फक्त आपला ब्राऊजर त्या बरोबर कसा संवाद करतो हे बदलता. फायरफॉक्स सोडता, मोबाईल वरच्या सर्वाधिक ब्राऊजरकडे यूजरस्क्रिप्टस वापरण्याचा पर्याय उपलब्ध नाही, व दुर्दैवाने ही साधने फक्त डेस्कटॉप किंवा लॅपटॅाप संगणकावरच वापरता येऊ शकतात. परंतु, आपण वाचनखुणवही चवळ-जवळ सर्व मोबाईल ब्राउजरस वर वापरू शकता.
युजर-स्क्रिप्ट्स चालवण्यासाठी आपल्याला ब्राउजर एक्स्टेंशन ची गरज असेल. आपण आपल्या आवडीचे कोणतेही एक्स्टेंशन वापरू शकता, पण सुरूवात म्हणून सर्वात लोकप्रिय ब्राउजरस च्या काही ज्ञात एक्स्टेंशन्स ची यादी बघा:
- क्रोम: टॅंम्परमंकी
- एज:टॅंम्परमंकी
- फायरफॉक्स: ग्रीसमंकी
- ओपेरा: टॅंम्परमंकी
- सफारी: टॅंम्परमंकी
आम्ही नोंद केलेल्या काही साधनांबद्दल तपशीलवार माहितीसाठी, आपण AO3 वापरकर्ता आर्डुइनाच्या अनधिकृत शिकवणी चा संदर्भ घेऊ शकता.
मी AO3 च्या पेहेरावात कसा बदल करू शकतो?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) च्या पेहेरावात बदल करण्याकरीता, आपण एक साईट पृष्ठमांडणी (पृष्ठमांडणी वर अधिक माहितीसाठी, पृष्ठमांडणी आणि AO3 इंटरफेस वाविप्र याचा संदर्भ घ्या).
AO3 साठी शोध इंजिन प्लगइन आहे का?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वापरकर्ता पंक ने एक AO3 शोध इंजिन प्लगइन निर्मित केले आहे. ते स्थापित करण्याकरीता, यादीतील "Archive of Our Own" लिंक निवडा आणि ते आपल्या शोध इंजिन मध्ये सामिल करण्याची पुष्टी द्या. हे प्लगइन फायरफॉक्स, इंटरनेट एक्सप्लोरर, व क्रोम बरोबर कार्य करेल व आपल्या ब्राउजर शोध बॅाक्स वरून थेट AO3 शोधण्याची परवानगी देईल.
कोणती साधने मला माझे शोध निकाल क्रमवारीने लावण्यात, फिल्टर करण्यात, किंवा सुधारित करण्यात मदत करेल?
- आमच्या कोणत्याही रसिकगट याद्या क्रमवारीत लावण्यासाठी, उदा. all Movies (सर्व सिनेमा), अक्षरक्रमाऐवजी कार्यांच्या आकड्यानुसार लावण्यासाठी, आपण कॅरीन वॅाटरमन ची रिॲार्डर रसिकगटाची वाचनखूणवही वापरू शकता.
- टाचणखुण फिल्टर्स वापरून काही सूचक-शब्द आपोआप वगळण्याकरीता, टफ_घोस्ट चे AO3 जतीत फिल्टर्स यूजरस्क्रिप्ट स्थापित करा व अलिकडे वजा खूण घालून नको असलेले शब्द घाला. आपण नंतर ह्या टाचणखूणा "Saved Filters" (जतित फिल्टर्स) बॅाक्स मध्ये घालू शकता, जो "Search Within Results" (निकालांमध्ये शोधा) च्या वर सामिल केलेला असेल.
- जर आपल्याला कार्य फक्त टाळ्यांच्या किंवा पानटिचक्यांच्या आकड्यांवर क्रमवारीने न लावता, टाळ्या प्रति पानटिचक्यांच्या प्रमाणामध्ये सुद्धा क्रमवार करावयाचे असतील, तर आपल्यासाठी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळा) च्या भाषांतर स्वयंसेवकाकडे टाळ्या/पानटिचक्या टक्के स्क्रिप्ट आहे!
- मिन चे AO3: टाळ्या व बघितलेले स्क्रिप्ट युजरस्क्रिप्ट आपल्याला सोप्या रितीने हे निश्चित करण्यास परवानगी देते की आपण एखाद्या कार्य यादीत कार्य बघितले आहे, टाळ्या दिल्या आहेत आणि/किंवा टाचणखुणित केले आहे वा नाही. मिन ने उपयुक्तपणे त्यांच्या ग्रिजीफोर्क पृष्ठावर हे स्क्रिप्ट कसे वापरावे यासंदर्भातील सूचना उपलब्ध केल्या आहेत.
- मिन ची आणखी एक उपयुक्त स्क्रिप्ट म्हणजे AO3 मागोवा, जी आपल्याला कुठलेही शोध वा फिल्टर कॅाम्बिनेशन जतन करण्याची आणि नंतर नवीन जोड्यांसाठी त्यांना तपासण्याची सोय करून देते. कृपया सूचनांसाठी AO3 मागोवा पृष्ठावरील लिहिणाऱ्याच्या वर्णनाचा संदर्भ घ्या.
कुठली साधने मला ट्रिगर करणारा, आक्षेपार्ह, किंवा नको असलेला मजकूर फिल्टर करू देतील?
- फ्रंट एंड कोडर सार्केन ने ब्लर्ब ब्लॅाकर युजरस्क्रिप्ट बनवली आहे जी जर कार्य ब्लर्बस मध्ये आपण स्क्रिप्ट मध्ये निर्दिष्ट केलेले एक वा अधिक शब्द असतील तर आपल्याला टाचणखुणा यादी, शोध निकाल, इत्यादी मधून ते लपवायला परवानगी देते.
- तसेच, फ्रंट एंड कोडर टफ_घोस्ट ने लोकप्रिय टंब्लर सेवियर युजरस्क्रिप्ट Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वर वापरासाठी हुबेहूब पुन:उत्पत्त केली आहे: AO3 सेवियर आपल्याला निर्माते, टाचणखुणा, किंवा सारांश सूचक-शब्द निर्दिष्ट करू देते आणि ह्यामधील एक वा अधिक शब्द असलेले सर्व कार्य ब्लर्बस लपवू देईल.
- जर विशिष्ट वापरकर्त्यांकडून किंवा निनावी टिप्पणीदाराकडून आपल्या कार्यांवर (किंवा AO3 वर कुठेही!) टिप्पण्या किंवा टाळ्या प्राप्त होणे आपल्याला नको असेल तर, आपण टफ_घोस्ट ची वैयक्तिक हेलबॅन स्क्रिप्ट वापरू शकता व पाहुणे अवरोधित करणे सक्षम करू शकता किंवा वापरकर्तानामांची यादी समाविष्ट करू शकता. ह्याने लोकांना टिप्पणी करण्यापासून वा टाळ्या देण्यापासून रोखता येणार नाही, परंतु आपण आपल्या ब्राउजर वर निर्दिष्ट केलेले काहीही लपवले जाईल.
AO3 वर पोस्ट करताना कुठली साधने मला मदत करू शकतील?
जर आपण मजकूर असलेल्या रसिक-कार्यांवर काम करताना गूगल ड्राईव्ह वापरत असाल, तर गूगल ड्राईव्ह वरून आमच्या रिच टेक्स्ट एडिटर वर कॅापी करत असताना आपल्याला फॅारमॅटींग समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुख्यकरून, इटॅलिक व बोल्ड मजकूर इकडून तिकडे बरोबर कॅापी होत नाही. ही समस्या सोडवण्यासाठी, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळा) च्या भाषांतर स्वयंसेवक मिन ने गूगल ड्राईव्ह साठी एक स्क्रिप्ट निर्मित केली आहे जी आपले अखंड कार्य घेऊन आपले मूळ फॅार्मॅटिंग HTML मध्ये रूपांतरीत करून देईल. आपण ते नमूना दस्तऐवज AO3 वर पोस्ट करण्या करीता इथे सापडवू शकता.
File (फाईल) मेन्यु मधून, "Make a copy..." (कॅापी बनवा) हा पर्याय निवडा, ज्याने या दस्तऐवजाची वैयक्तिक कॅापी आपल्या गूगल ड्राईव्ह खात्यात येईल. त्यानंतर नमूना मजकूर हटवून आपल्या कार्याकरीता कोरे दस्तऐवज वापरा. पूर्ण झाल्यावर, HTML एडिटर वर घालण्यासाठी "Post to AO3" (AO3 वर पोस्ट करा) मेन्यु वापरा. HTML टाचणखूणा आपल्यासाठी सामिल केल्या जातील! सर्वाधिक वेळी, रिच टेक्स्ट एडिटर वापरण्या ऐवजी हे वापरणे जास्त विश्वासार्ह असेल. जर आपण मोबाईल वरून पोस्ट करीत असाल, तर स्क्रिप्ट वापरण्याकरीता, आपल्याला गूगल ड्राईव्ह आपल्या ब्राउजर वर उघडून डेस्कटॉप आवृत्ती वापरावी लागेल.
कार्य बघण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी मला कोणती साधने मदत करू शकतात?
- काहीवेळा कार्यातील परिच्छेदांमध्ये खूप पांढरी जागा असू शकते, कदाचित शब्द प्रोसेसर मधून आमच्या रिच टेक्स्ट एडिटर मध्ये पोस्ट करताना आलेल्या समस्येमुळे. आपण कॅरिन वॅाटरमन ची स्ट्रिप एंप्टीज वाचनखूणवही वापरू शकता परिच्छेदांमधून तात्पुरत्या रिकाम्या ओळी काढून टाकण्यासाठी.
- आदेव्यिश ची AO3 लेझियर युजरस्क्रिप्ट बघा, जी अध्याय मेन्यु च्या शेजारी "latest chapter" (नवीनतम अध्याय) बटण सामिल करते.
- AO3 इ-बुक डाउनलोड हेल्पर एका शोध निकाल पृष्ठावरच्या, किंवा अनेक कार्यांची यादी दर्शविणाऱ्या कुठल्याही पृष्ठावरील (जसेकी मालिका वा संकलने) सर्व कार्यांची डाउनलोड दूवा प्रदर्शित करते, ज्यामुळे आपण जलद अनेक फाईल्स डाउनलोड करू शकता!
- टफ_घोस्ट ची AO3 डाउनलोड बटणे कार्य यादीतील प्रत्येक कार्याच्या ब्लर्ब वर डाउनलोड बटण सामिल करतात.
- फ्रिवेर इ-बुक व्यवस्थापक सॅाफ्टवेअर कॅलिबर मध्ये दोन प्लगिन्स आहेत, फॅनफिकफअर आणि इपबमर्ज, जी जेव्हा दोन्ही स्थापित केली असता, आपल्याला आपोआप Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मालिका एक इ-बुक म्हणून डाउनलोड करण्याची सोय प्रदान करतात. (एका AO3 पृष्ठावरच्या सर्व कार्य दूवा सुद्धा हे वापरून डाउनलोड करता येतात, ज्याने एका रसिकगटातील लेखकाच्या कार्य पृष्ठाची लिंक घालून आपण त्यांची सर्व कार्य एका इ-हुक मध्ये घेऊ शकाल.) मालिकेत नवीन कार्य सामिल झाल्यावर इ-बुक्स अद्यतनीतही केली जातील. एक ही प्लगिन्स वापरण्यासाठी मार्गदर्शक (जो लिहिली गेला होता जेव्हा ह्या प्लगिन ला फॅनफिक्शनडाउनलोडर म्हटले जात होते) आणिफॅनफिकफेअर विकी हे ही अस्तित्वात आहेत.
कुठली साधने AO3 वरून माझी आकडेवारी व इतर माहिती डाउनलोड करू देतील?
ul>
फ्लेमबिर्ड ची AO3 आकडेवारी CSV वाचनखूणवही आपल्याला आपली Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) कार्य आकडेवारी (पानटिचक्या, टाळ्या, वाचनखूणा, इ. चे आकडे) .csv फाईल च्या रुपाने डाऊनलोड करू देते, जी आपल्या स्वत:च्या आकडे पडताळणीकरीता नीट पद्धतीने स्प्रेडशीट वर आयत केली जाऊ शकते.
जर आपल्याला आपल्या सर्व कार्यांची यादी, शीर्षक, टाचणखूणा, न्यूनतम आकडेवारी, आणि URL सह, तर त्याऐवजी फ्लेमबिर्ड ची AO3 कार्य यादी CSV वाचनखूणवही बघा.
कुठली साधने मला माझी संकलने व आव्हाने व्यवस्थापित करण्यास मदत करतील?
फ्रंट एंड कोडर सार्केन ने साईन-अप सारांश क्रमवारी युजरस्क्रिप्ट निर्माण केली आहे जी कुठल्याही आव्हानाच्या Sign-up Summary (साईन-अप सारांश) पृष्ठावर क्रमवारी पर्याय सामिल करेल. हे आपल्याला रसिकगटनाम, ॲाफर्स चे आकडे, किंवा विनंत्यांचे आकडे चढत्या व उतरत्या क्रमात लावणे सोयीचे करेल.
कुठली साधने वापरून AO3 वरील कार्य दुसऱ्या साइटस् वर दर्शित करणे सोपे होईल?
- फ्लेमबिर्ड च्या कृपेने, आपण आपली स्वत:ची AO3 > पिनबोर्ड वाचनखूणवही बनवणे हे करू शकता ज्याने सोप्या रितीने Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) वरून आपल्या पिनबोर्ड वाचनखूणांवर आपण समर्पक माहितीसह कार्य सामिल करू शकाल!
- जलद टंब्लर किंवा ड्रिमविड्थ पोस्ट सर्व कार्य माहितीसह तयार करण्यासाठी (AO3 वरील आपले स्वत:चे किंवा इतर कोणाचे कार्य), आपण फ्लेमबिर्ड ची AO3 > ड्रिमविड्थ वाचनखूणवही किंवा AO3 > टंब्लर वाचनखूणवही बघू शकता.
मी आपल्याला आपण या यादीत नमून न केलेल्या एका उत्तम साधनाबद्दल कसे सांगू?
या वाविप्र मध्ये काही सामिल होण्यासारखी साधने आपल्या माहितीत असतील तर आपण समिती-संवाद समितीशी संपर्क करा हे करू शकता. आपला अभिप्राय योग्य ठिकाणी मार्गदर्शित होणेयासाठी आम्हाला मदत म्हणून ह्या वाविप्र चा उल्लेख करा.
माझ्या प्रश्नाचे उत्तर मला इथे मिळाले नसल्यास, मला अधिक माहिती कुठे मिळू शकते?
Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) या विषयाबद्दल वारंवार विचारल्या जाणार्या काही प्रश्नांची उत्तरे AO3 वाविप्र इथे मिळतील आणि काही सामान्य परिभाषा आमच्या शब्दकोशात लिहिलेल्या आहेत. नियम आणि ध्येयधोरण-विषयक प्रश्नोत्तरे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र इथे सापडतील. आमच्या ज्ञात अडचणी विभागातही ज्ञात अडचणी एकदा जरूर डोकावून पहा. अजून काही मदत हवी असेल तर समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.
